अरे हा म्युच्युअल फंड आहे की नोटा छापण्याचे मशीन; 10 लाखांचे झाले इतके कोटी

Mutual Fund : देशात अनेक म्युच्युअल फंडांनी जबरदस्त परतावा दिला आहे. काही फंडांनी तर गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे. तर या म्युच्युअल फंडाने 22 वर्षांत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. ज्यांनी नियमीत एसआयपीद्वारे गुंतवणूक केली. त्यांना मोठा फायदा झाला आहे. ते कोट्याधीश झाले आहेत.

अरे हा म्युच्युअल फंड आहे की नोटा छापण्याचे मशीन; 10 लाखांचे झाले इतके कोटी
म्युच्युअल फंडची जोरदार कामगिरी
Follow us
| Updated on: Nov 13, 2024 | 3:54 PM

केवळ शेअरच नाही तर म्युच्युअल फंड पण गुंतवणूकदारांना कोट्याधीश करू शकतो. जर तुम्ही दीर्घकाळ म्युच्युअल फंडमध्ये नियमित गुंतवणूक करत असाल तर तुमची गुंतवणूक अनेक पट्टीत वाढेल. त्याचा तुम्हाला मोठा फायदा होईल. एक असाच एक म्युच्युअल फंड समोर आला आहे. या फंडने गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे. या फंडमध्ये दहा लाखांची गुंतवणूक आता 7 कोटींची झाली आहे. या फंडने गुंतवणूकदारांना श्रीमंत करण्यात कोणतीची कसर सोडली नाही. हा फंड गुंतवणूकदारांसाठी नोटा छापण्याची मशीन ठरला आहे.

या फंडने केले करोडपती

देशातील सर्वात मोठ्या फंडपैकी एक असलेल्या आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल मल्टि ॲसेट फंडने गुंतवणूकदारांना कोट्याधीश केले आहे. डेटानुसार, आयसीआयसीआयच्या या फंडमध्ये गुंतवणूकदारांनी 22 वर्षांपूर्वी 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचे मूल्य आज 7.26 कोटी रुपये असते. एका दाव्यानुसार, इतकीच रक्कम निफ्टी 200 टीआरआयमध्ये 3.36 कोटी रुपये इतकी झाली असती. 31 ऑक्टोबर, 2002 मध्ये आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल मल्टि ॲसेट फंडमध्ये 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर या वर्षी 30 सप्टेंबरपर्यंत वार्षिक 21.58 टक्के चक्रवाढ दराने त्याच्यावर परतावा मिळाला आहे. तर निफ्टी 200 टीआरआयचा परतावा या काळात केवळ 17.39 टक्के इतकाच होता. परताव्यात हा म्युच्युअल फंडने जोरदार कामगिरी बजावली आहे.

हे सुद्धा वाचा

SIP मधून किती फायदा?

SIP मधून गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना पण चांगला परतावा मिळाला आहे. जर गुंतवणूकदारांनी या फंडमध्ये दर महा 10,000 रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचे मूल्य 22 वर्षांत 2.9 कोटी रुपये इतकी झाली असती. या फंडमध्ये गुंतवणूकदारांनी केवळ 26.4 लाखांची गुंतवणूक केली असती. या फंडने गुंतवणूकदारांना 18.37 टक्क्यांचा परतावा दिला आहे. अर्थात गुंतवणूकदारांना वार्षिक 14.68 टक्के दराने परतावा मिळाला असता. या फंडवर गुंतवणूकदारांचा मोठा विश्वास असल्याचे दिसून येते.

सूचना : हा म्युच्युअल फंडचा केवळ लेखाजोखा आहे. या फंडची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.