बँकेचं लायसन्स रद्द झालं, तर तुमच्या पैशाचं काय होईल? जाणून घ्या नियम
DICGC म्हणजेच डिपॉझिट इंश्योरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या नियमांनुसार, ग्राहकांना 5 लाख रुपयांपर्यंत च्या सुरक्षेची गॅरंटी मिळते.
नवी दिल्ली : RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोल्हापूरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचं (Subhadra local area bank) लायसन्स रद्द केलं (Bank Licence Cancelled By RBI). या बँकेच्या ऑपरेशन्समध्ये गोंधळ झाल्याचं लक्षात येताच आरबीआयने हा निर्णय घेतला. बँकिंग नियमन कायदा 1949 (Banking regulation Act, 1949) च्या कलम 22, 4 अंतर्गत या बँकेचं लायसन्स रद्द करण्यात आलं आहे. आता त्या बँकेत ज्या लोकांचं खातं असेल त्यांच्या पैशांचं काय होईल (Bank Licence Cancelled By RBI).
चला जाणून घेऊ याबाबतची सर्व उत्तरं
आरबीआयच्या म्हणण्यानुसार, कराड बँकेचे 99 टक्के खातेधारकांना त्यांचे पैसे परत मिळेल. आरबीआयने सांगितलं की, या बँकेच्या व्यवस्थापन पद्धतीनुसार हे म्हटलं जाऊ शकतं की ठेवीदारांच्या सद्यस्थितीत आणि भविष्यावर याचा विपरित परिणाम होईल. लायसन्स रद्द केल्यानंतर आरबीआय आता उच्च न्यायालयात एक याचिकाही सादर करेल. आरबीआयने हे देखील सांगितलं की वर्तमान परिस्थितीत सुभद्रा लोकल एरिया बँकेजवळ सर्व ठेवीदारांना देय देण्यासाठी पुरेसं भांडवल आहे.
बँकेत जमा असलेल्या पैशांसाठी नियम काय?
DICGC म्हणजेच डिपॉझिट इंश्योरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या नियमांनुसार, ग्राहकांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या सुरक्षेची गॅरंटी मिळते. हा नियम बँकेच्या सर्व शाखांमध्ये लागू असतो. यामध्ये मुद्दल आणि व्याज दोन्ही समाविष्ट असतात. म्हणजेच, जर दोन्ही मिळून पाच लाखांच्या वर असेल तरीही पाच लाखच सुरक्षित मानले जातील.
आणखी कुठल्या बँकेचं लायसन्स रद्द झालंय का?
आरबीआयने डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील संकटात सापडलेल्या कराड बँकेचं (Karad Janta Sahakari Bank) लायसन्स रद्द केलं होतं (Bank Licence Cancelled By RBI).
बँकेतील एफडीचं काय होणार?
तुमचा जर एकाच बँकेतील अनेक शाखांमध्ये खातं असेल तर जमा ठेवीला जोडलं जाईल आणि त्यापैकी फक्त पाच लाखांपर्यंतच्या रकमेला सुरक्षित मानलं जाईल. जर तुमचे एका बँकेत एकापैक्षा जास्त खाते आणि एफडी असतील तर बँक डिफॉल्टर झाल्याने किंवा बुडाल्याने तुम्हाला तुमचे पाच लाख रुपये मिळण्याची गॅरंटी आहे. ही रक्कम कुठल्या पद्धतीने मिळेल हे DICGC च्या गाईडलाईन्सवरुन ठरवलं जातं.
आपल्या पैशांना सुरक्षित कसं ठेवाल?
बँकिंग एक्सपर्टनुसार, आपल्या पूर्ण सेव्हिंग्सला कधीही एका बँक किंवा त्याच बँकेच्या वेगवगळ्या शाखेत ठेवू नका. कारण, बँक बुडण्याच्या परिस्थितीत सर्व खात्यांना एकच मानलं जातं. त्यामुळे सेव्हिंग्स किंवा करंट खातं. एफडी किंवा इतर कुठलीही बचत ही वेगवेगळ्या बँकेच्या खात्यांमध्ये ठेवावी.
दैनंदिन जीवनाशी निगडीत ‘हे’ महत्त्वाचे नियम 2021मध्ये बदलणार, जाणून घ्या काय होणार…https://t.co/ZetcLrxlSF#NewRules #NewYear #NewYear2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 26, 2020
Bank Licence Cancelled By RBI
संबंधित बातम्या :
Income Tax Return भरण्यासाठी शेवटचे पाच दिवस, आयकर विभागाची ‘झटपट प्रोसेसिंग’ सुविधा
RTGS आणि NEFTद्वारे पैसे ट्रान्सफर करताय? मग या 8 गोष्टी माहीतच हव्यात!
बँक खात्यात निगेटिव्ह बॅलन्स आहे? जाणून घ्या ‘हे’ महत्त्वाचे नियम