कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी : नोकरी बदलल्यास आता पीएफप्रमाणे ग्रॅज्युएटीही होणार ट्रान्सफर
नवी दिल्ली : नोकरदार वर्गासाठी एक आनंदाची बातमी आहे. पीएफ प्रमाणेच आता आपण एका नोकरीतून दुसर्या नोकरीत प्रवेश केल्यास ग्रॅज्युएटी ट्रान्सफर करता येणार आहे. ईपीएफ खाते ज्या प्रकारे एका कंपनीमधून दुसऱ्या कंपनीत ट्रान्सफर केले जाते त्याच प्रकारे आपल्या ग्रॅज्युएटीची रक्कम देखील नोकरी बदलल्यानंतर ट्रान्सफर केली जाईल. या संदर्भातील नियम लवकरच लागू केले जातील, असे केंद्र […]

नवी दिल्ली : नोकरदार वर्गासाठी एक आनंदाची बातमी आहे. पीएफ प्रमाणेच आता आपण एका नोकरीतून दुसर्या नोकरीत प्रवेश केल्यास ग्रॅज्युएटी ट्रान्सफर करता येणार आहे. ईपीएफ खाते ज्या प्रकारे एका कंपनीमधून दुसऱ्या कंपनीत ट्रान्सफर केले जाते त्याच प्रकारे आपल्या ग्रॅज्युएटीची रक्कम देखील नोकरी बदलल्यानंतर ट्रान्सफर केली जाईल. या संदर्भातील नियम लवकरच लागू केले जातील, असे केंद्र सरकारच्या अधिसूचनेत म्हटले आहे. (If the job changes, now the graduaty will also be transferred like PF)
ग्रॅज्युएटी स्ट्रक्चरमध्ये बदलालाही मंजुरी कायम
केंद्र सरकार, कर्मचारी संघटना आणि उद्योग यांच्यातील विद्यमान ग्रॅज्युएटी रचनेत बदल करण्याबाबतही मान्यता देण्यात आली आहे. ग्रॅज्युएटी बदल्यांचा आता सामाजिक सुरक्षा संहितेत समावेश केला जाईल. सरकार-युनियन आणि उद्योग यांच्यातील विद्यमान ग्रॅज्युएटी स्ट्रक्चरमध्ये बदल करण्याबाबत सहमती झाली आहे. ग्रॅज्युएटीला सिटीसीचा एक आवश्यक भाग बनविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार पुढील महिन्यात याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली जाऊ शकते. तथापि, ग्रॅज्युएटीसाठी कामाचा दिवस वाढवण्याबाबत उद्योगांनी सहमती दर्शविली नाही. म्हणजेच, एका वर्षाच्या नोकरीवर 15 दिवसाच्या पगाराइतकी तुम्हाला ग्रॅज्युएटी मिळते. ही ग्रॅज्युएटी आता 30 दिवसांच्या पगाराइतकी करण्यास सांगण्यात आले, पण हे उद्योगांना मान्य नाही.
कोणत्याही संस्थेत सलग पाच साल नोकरी केल्यास मिळते ग्रॅज्युएटी
सध्या कंपनीत सलग पाच वर्षे काम करणार्या कर्मचार्याला ग्रॅज्युएटी मिळते. पगाराचा एक छोटासा भाग ग्रॅज्युएटीसाठी वजा केला जातो. तथापि, याचा मोठा भाग कंपनीकडून प्रदान केला जातो. ग्रॅज्युएटीची मात्रा दोन गोष्टींवर अवलंबून असते. प्रथम कर्मचार्यांनी किती काळ काम केले आहे. पाच वर्ष काम केल्यावर कर्मचाऱ्याला ग्रॅज्युएटी मिळते. दुसरे म्हणजे, त्याच्या शेवटच्या पगारामध्ये मूलभूत वेतन आणि महागाई भत्ता किती आहे. मूलभूत वेतन आणि महागाई भत्ता मिळून ग्रॅज्युएटी दिली जाते.
कोणत्या संस्थेत मिळतो ग्रॅज्युएटीचा फायदा
पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटी अॅक्ट 1972 नुसार ज्या कंपनीत दहा पेक्षा अधिक कामगार काम करतात, त्या प्रत्येक संस्थेमध्ये ग्रॅज्युएटीचा लाभ मिळवता येतो. जर कर्मचाऱ्याने नोकरी बदलली किंवा सोडली, निवृत्त झाला तर ग्रॅज्युएटीचे नियम पूर्ण केले असतील तर ग्रॅज्युएटीचा लाभ मिळतो. (If the job changes, now the graduaty will also be transferred like PF)
Phulala Sugandh Maticha | ‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम जिजी अक्का आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची सून https://t.co/00s6h5MoQj #PhulalaSugandhMaticha | #StarPravah | #StarPravahParivarAwards2021 | #JijiAkka | #AditiDeshpande
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 25, 2021
इतर बातम्या
मोठी बातमी! मोदी सरकारकडून पर्यायी इंधनाची घोषणा, सामान्यांना कसा होणार फायदा?
संसदेत आणखी एक सरकारी बँक तयार करण्यास मान्यता; सामान्य माणसाला काय फायदा?