या IPO ची जोरदार चर्चा, गुंतवणूकदारांना लागला जॅकपॉट

IREDA IPO | आईआरईडीएच्या गुंतवणूकदारांना जॅकपॉट लागला. या सरकारी कंपनीने त्यांचे चांगभलं केलं. त्यांना मोठा नफा मिळाला. बाजारात दमदार पाऊल टाकताच गुंतवणूकदारांनी या आयपीओवर उड्या टाकल्या. हा आयपीओ 56 टक्के प्रीमियमसह लिस्टिंग जाला. हा स्टॉक 70 टक्के फायदा मिळवून देत आहे.

या IPO ची जोरदार चर्चा, गुंतवणूकदारांना लागला जॅकपॉट
Follow us
| Updated on: Nov 29, 2023 | 3:55 PM

नवी दिल्ली | 29 नोव्हेंबर 2023 : IREDA IPO पैसे वसूल ठरला. गुंतवणूकदारांच्या विश्वासाला हा आयपीओ जागला. त्याने जोरदार नफा मिळवून दिला. आयआरईडीएचा शेअर 32 रुपयांच्या इश्यू प्राईसवर होता. हा शेअर बीएसई आणि एनएसईवर 50 रुपयांवर सूचीबद्ध झाला. या आयपीओला 56 टक्क्यांहून अधिक प्रीमियमसह लिस्टिंग मिळाली. एनएसईवर सूचीबद्ध होताच IREDA च्या शेअरने जवळपास 70 टक्क्यांपर्यंत उसळी घेतली. या सरकारी अर्थ कंपनीचा शेअर 55.70 रुपयांपर्यंत चढला. त्याचा गुंतवणूकदारांना फायदा झाला. त्यांना जोरदार परतावा मिळाला. एक लॉटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना झटपट 12,880 रुपयांची लॉटरी लागली. गुंतवणूकदार एकाच आठवड्यात मालामाल झाले.  यापूर्वी टाटा समूहातील टाटा टेक्नॉलॉजीच्या आयपीओने गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून दिला. त्यानंतर या सरकारी कंपनीने गुंतवणूकदारांना जॅकपॉट लावला.

प्रत्येक शेअरवर जबरदस्त नफा

IREDA IPO च्या शेअरची किंमत 32 रुपये होती. शेअर बाजारात सूचीबद्ध होताना तो 50 रुपयांपर्यंत उसळला. म्हणजे गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरमागे 18 रुपयांची लागलीच कमाई झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याला जोरदार कमाई करता आली. एनएसईवर या शेअरमध्ये तेजीचे सत्र दिसून आले. हा शेअर 60 रुपयांपर्यंत वधारला. त्याने जवळपास 87.5 टक्क्यांचा परतावा दिला.

हे सुद्धा वाचा

12,880 रुपयांची कमाई

IREDA IPO ची इश्यू प्राईस 32 रुपये होती. लिस्टिंगनंतर बीएसईवर हा शेअर 50 रुपयांवर पोहचला. गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 18 रुपयांची कमाई झाली. आयपीओची लॉट साईज 460 शेअर होती. म्हणजे प्रत्येक लॉटवर गुंतवणूकदाराला 8,280 रुपयांचा नफा झाला. तर लिस्टिंगनंतर शेअरमध्ये तेजीचे सत्र कायम आहे. शेअर 60 रुपयांपर्यंत पहोचला. एक लॉटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना झटपट 12,880 रुपयांची लॉटरी लागली.

IPO ची वैशिष्ट्ये

हा आयपीओ सर्वसामान्य गुंतवणकूदारांसाठी 21 नोव्हेंबर रोजी उघडला तर 23 नोव्हेंबर 2023 रोजी बंद झाला. या पब्लिक इश्यूला 38 पटीपर्यंत सब्सक्रिप्शन मिळाले. यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा वाटा 7.73 पट, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांचा हिस्सा 104.57 पट आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांचा वाटा 24.16 पटीपर्यंत सब्सक्राईब झाला. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वाट्यातील 9.80 पटीपर्यंत सब्सक्राईब केले. टाटा टेक्नॉलॉजीच्या आयपीओनंतर IREDA IPO ने गुंतवणूकदारांना लॉटरी लावली.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....