EPFO Alert News : प्रतिक्षा संपली, याच आठवड्यात पीएफ खात्यात येणार लक्ष्मी! पीएफवरील व्याज होणार जमा, खात्यातील शिल्लक तपासली का?

EPFO Interest News : सरकारने व्याजदर जरी सर्वात निच्चांकी केला आहे. पण या आठवड्यात आनंदाची वार्ता येऊन धडकणार आहे. भविष्य निर्वाह निधी खात्यात (PF account) व्याजाची रक्कम जमा होणार आहे.

EPFO Alert News : प्रतिक्षा संपली, याच आठवड्यात पीएफ खात्यात येणार लक्ष्मी! पीएफवरील व्याज होणार जमा, खात्यातील शिल्लक तपासली का?
व्याजाची रक्कम लवकरच खात्यातImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 11:09 AM

EPFO News : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या  (EPFO) कोट्यवधी खातेदारांना या आठवड्यात सुखद धक्का बसू शकतो. त्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम येऊ शकते. येत्या 15 जुलैपर्यंत सदस्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. मोदी सरकारच्या दोन कार्यकाळात (Modi Government-Two Term) ठेवीवरील व्याजदर सातत्याने घसरत आहे. सध्या तो 8.5 टक्क्यांहून 8.1 टक्के या निचांकी स्तरावर आला आहे. 2014-15 मध्ये व्याजदर 8.75 टक्के होता. हा या सरकारच्या सुरुवातीच्या काळातील सर्वाधिक व्याजदर (Highest Interest Rate) होता. त्यानंतर व्याजदर (Interest Rate)सातत्याने कमी-कमी होत तो सध्या 8.1 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे कर्मचारी वर्गात सरकारी धोरणांविषयी नाराजीचा सूर आहे. आता ही नाराजी दूर करण्याचा सरकार प्रयत्न करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच देशातील कोट्यवधी खातेदारांना ही आनंदाची बातमी मिळणार आहे.

15 जुलैपर्यंत व्याज होणार जमा?

या महिन्याच्या सुरुवातीलाच पीएफ खात्यात व्याजाची रक्कम जमा होण्याची चर्चा रंगली होती. परंतू ही गोष्ट खरी ठरली नाही. केंद्र सरकारने पीएफ कर्मचाऱ्यांसाठी 8.1 टक्के व्याज आधीच जाहीर केले आहे. आता ही व्याजाची रक्कम येत्या 15 जुलै रोजी खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वास्तविक पीएफचे व्याज जमा करण्याविषयी EPFO ने अधिकृत माहिती दिलेला नाही. परंतू मीडिया रिपोर्टनुसार याच आठवड्यात 15 जुलैपर्यंत व्याजाची रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.

मिस्ड कॉल करा आणि शिल्लक रक्कमेची माहिती हजर

आता तुम्ही फक्त एका मिस्ड कॉलवर तुमच्या भविष्य निर्वाह निधी खात्याची (PF Account) सर्व माहिती जाणून घेऊ शकता. त्यासाठी ईपीएफओने (EPFO) (011-22901406) हा क्रमांक जारी केला आहे. आपल्याला फक्त आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरुन वर निर्देशीत केलेल्या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. या नंबरवर फोन करताच काही सेकंदाच्या रिंगनंतर फोन डिस्कनेक्ट होईल आणि त्यानंतर मेसेजद्वारे खात्यातील शिल्लक रक्कमेची संपूर्ण माहिती पाठवली जाईल.

व्याजदर सात वर्षांच्या निच्चांकीवर व्याजदर

  1. सीबीटीने व्याजदर ठरवल्यानंतर तो अर्थमंत्रालयाकडे परवानगीसाठी पाठवला जातो.मार्च 2020 मध्ये ईपीएफओने 2019-20 साठी प्रॉव्हिडंट फंड ठेवींवरील व्याज दर 8.5 टक्क्यांवर आणला. हा व्याजदर सात वर्षांच्या निचांकी पातळीवर होता.
  2. 2018-19 मध्ये ईपीएफओवर 8.65 टक्के व्याज देण्यात आले होते. ईपीएफओने 2016-17  आणि 2017-18 मध्ये 8.65 टक्के व्याजही दिले होते.
  3. हे सुद्धा वाचा
  4. 2015-16 मध्ये हा व्याजदर 8.8 टक्के होता. त्याचबरोबर 2013-14 मध्ये 8.75 टक्के व्याज आणि 2014-15 मध्ये 8.75 टक्के व्याज देण्यात आले होते.
  5. मात्र, 2012-13 मध्ये हा व्याजदर 8.5 टक्के होता. 2011-12 मध्ये हे प्रमाण 8.25 टक्के होते.
  6. आर्थिक वर्ष 2020-21 साठी 24 कोटी पीएफ खात्यांमध्ये 8.5 टक्क्यांनी व्याज जमा  केल्याचे ट्विट ईपीएफओने त्यांच्या अधिकृत टि्वटर हँडलवरुन केले होते. त्यानंतर व्याजदरात अजून कपात करत तो 8.1 टक्क्यांवर आणण्यात आला आहे.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.