कोरोना काळात गेल्यास 3 महिन्यांचा पगार मिळणार, मोफत उपचारासह मिळतील या सुविधा

जर एखाद्या कर्मचाऱ्याने स्वत: किंवा कुटुंबातील सदस्यांवर खासगी रुग्णालयात कोरोनाचा उपचार केले तर तो त्या खर्चाचा दावा करु शकतो. (If you lost your job in Corona period, you will get 3 months salary, these facilities along with free treatment)

कोरोना काळात गेल्यास 3 महिन्यांचा पगार मिळणार, मोफत उपचारासह मिळतील या सुविधा
कोरोना काळात गेल्यास 3 महिन्यांचा पगार मिळणार
Follow us
| Updated on: Apr 30, 2021 | 3:26 PM

नवी दिल्ली : कर्मचारी राज्य विमा महामंडळाने कोरोनाच्या संकटात काळात आपल्या कर्मचार्‍यांसाठी विशेष घोषणा केली आहे. ईएसआयसीने म्हटले आहे की कर्मचार्‍यांचे हित आणि त्यांचे जीवनमान जपण्याच्या दृष्टीने, ईएसआयसी आणि त्याच्याशी संबंधित रुग्णालयात कर्मचार्‍यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मोफत उपचार, कोरोना संसर्गामुळे कामावर न गेल्यास अंशतः वेतन आणि इतर कारणांमुळे नोकरी गमावल्या बेरोजगारी भत्ता यासारख्या सुविधा देण्यात येईल. गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचार्‍यांचे नुकसान झाले. म्हणूनच ईएसआयसीने ही विशेष घोषणा केली आहे. (If you lost your job in Corona period, you will get 3 months salary, these facilities along with free treatment)

ईएसआयसीने म्हटले आहे की कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे ग्रस्त असलेले कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यावर ईएसआयसी किंवा त्याच्याशी संबंधित रुग्णालयात विनामूल्य उपचार केले जातील. जर एखाद्या कर्मचाऱ्याने स्वत: किंवा कुटुंबातील सदस्यांवर खासगी रुग्णालयात कोरोनाचा उपचार केले तर तो त्या खर्चाचा दावा करु शकतो.

ईएसआयसीकडे किती कोरोना बेड्सची व्यवस्था

कर्मचारी राज्य विमा योजना ही कमी वेतन देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक प्रकारची सामाजिक सुरक्षा योजना आहे. या अंतर्गत संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचार्‍यांना अपंगत्व, प्रेग्नेन्सी किंवा मृत्यू इत्यादींमध्ये मदत मिळू शकते. एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन देशभरात 21 रुग्णालये चालवित आहेत, त्यापैकी 3,686 कोरोना बेड उपलब्ध आहेत. या रुग्णालयांमध्ये 229 आयसीयू बेड आणि 163 बेंटिलेटर बेड आहेत.

तीन महिने बेरोजगार राहिल्यासही मिळेल पगार

ईएसआयसीने असेही म्हटले आहे की, कोरोना संसर्गामुळे जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना अंत्यसंस्कारासाठी 15,000 रुपये दिले जातील. या व्यतिरिक्त, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे कोणताही कर्मचारी काम करू शकत नाही, तरीही त्यांना या कालावधीत पगार मिळणार आहे. उपचारादरम्यान, कर्मचारी 91 दिवस कामावर गैरहजर राहिला तर तो आजारपणाच्या फायद्याखाली पगाराचा दावा करु शकतो. यावेळी कर्मचार्‍यांना प्रति दिन 70 टक्केच्या हिशोबाने पगार मिळेल.

बेरोजगारी भत्त्याचीही व्यवस्था

जर एखादा कर्मचारी ईएसआयसी अंतर्गत येतो आणि त्यांची संस्था बंद झाली असेल किंवा त्यांना कामावरुन काढून टाकण्यात आले असेल तर त्यांना राजीव गांधी श्रमिक कल्याण योजनेंतर्गत बेरोजगारी भत्त्याचा लाभ 2 वर्षांसाठी मिळेल. तसेच इतर कोणत्याही कारणास्तव जर कर्मचारी बेरोजगार झाला, तर त्याला अटल विमा कल्याण योजनेंतर्गत 90 दिवसापर्यंत आर्थिक मदत दिली जाईल. यावेळी, संबंधित कर्मचाऱ्याला दररोज 50 टक्के हिशोबाने ही मदत मिळेल. यासाठी कर्मचारी ईएसआयसीच्या पोर्टलला भेट देऊन दावा करु शकतात. (If you lost your job in Corona period, you will get 3 months salary, these facilities along with free treatment)

इतर बातम्या

Data Breach | तुमच्या ऑनलाईन अकाऊण्टमधील डेटा लीक झालाय का? इथे तपासा

PHOTO | कोरोनानंतर हार्ट अटॅकपासून वाचण्यासाठी काय करावं?

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.