वर्षाला 300 कोटींचे पॅकेज, अनेक मोठ्या प्रकल्पांचे करतो नेतृत्व, आहे कोण हा भारतीय
Google Prabhakar Raghavan : प्रभाकर राघवन Google मध्ये सध्या उपाध्यक्ष म्हणून कारभार सांभाळत आहेत. एका अहवालानुसार, प्रभाकर राघवन यांना गुगलने 2022 मध्ये जवळपास 300 कोटी रुपयांचा पगार दिला होता. दिग्गज जागतिक कंपन्यांमध्ये भारतीयांचा सध्या बोलबाला आहे.
जगातील दिग्गज आयटी आणि टेक कंपन्यांमध्ये दोन गोष्टी अत्यंत समान आहेत. या दिग्गज कंपन्या एकतर अमेरिकेच्या आहेत आणि दुसरी म्हणजे या कंपन्यांच्या टॉप रँकमध्ये, मोठ्या हुद्दावर, पदावर भारतीय वंशांचीच अधिकारी जास्त आहेत. गुगलपासून ते मायक्रोसॉफ्टपर्यंत टॉप टेक कंपन्यांमध्ये अनेक भारतीयांनी त्यांचा झेंडा रोवला आहे. सुंदर पिचाई, सत्य नडेला, शांतनू नारायणन, नील मोहन, अरविंद कृष्णा, पराग अग्रवाल, संजय मेहरोत्रा आणि निकेस अरोरा यांच्यासह अनेक जण मोठ्या हुद्दावर आहेत. यामध्ये एक नाव प्रभाकर राघवन हे पण आहे. ते गुगलमध्ये सीनियर व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करत आहेत. एका रिपोर्टमधील दाव्यानुसार गुगलने त्यांना पगारापोटी 2022 मध्ये जवळपास 300 कोटी रुपये मोजले होते.
भोपाळ ते अमेरिका व्हाय चेन्नई
भोपाळमध्ये प्रभाकर राघवन यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षणही तिथेच पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी आयआयटी मद्रास येथे बीटेकसाठी प्रवेश घेतला. 1981 मध्ये त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. याशिवाय त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून कम्युटर सायन्समध्ये पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले.
गुगलने दिले 300 कोटींचे पॅकेज
- शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी करियरची वाट चोखंदळली. त्यांनी बरीच वर्षे सर्च इंजिन याहू आणि आयबीएममध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. यादरम्यान त्यांनी एल्गोरिदम, डेटा मायनिंग आणि मशीन लर्निंगवर विशेष लक्ष दिले. जगभरात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची वाढती मागणी लक्षात घेता टेक कंपन्या यावर जातीने लक्ष घालत आहेत.
- या बदलत्या ट्रेंडमुळेच गुगलने प्रभाकर राघवन यांना मोठ्या हुद्दावर रुजू करुन घेतले. प्रभाकर राघवन Google मध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ते याठिकाणी Google सर्च, असिस्टेंट, जाहिरात आणि पेमेंट प्रोडक्ट्सचे सर्व कामावर त्यांची देखरेख आहे. DNA च्या वृत्तानुसार प्रभाकर राघवन यांना गुगलने 2022 मध्ये जवळपास 300 कोटी रुपयांचे वेतन दिले होते.
हे भारतीय मोठ्या हुद्दावर
सुंदर पिचाई, सत्य नडेला, शांतनू नारायणन, नील मोहन, अरविंद कृष्णा, पराग अग्रवाल, संजय मेहरोत्रा, प्रभाकर राघवन, राजेश झा, पवन दावुलुरी आणि निकेस अरोरा यांच्यासह अनेक जण मोठ्या हुद्दावर आहेत.