पाचशे आणि हजाराच्या नोटांबाबत महत्वाची माहीती आली, आरबीआयने केले स्पष्ट

होम लोन घेतलेल्या किंवा घेणाऱ्या नागरिकांचा ईएमआय व्याजाचा दर कायम रहाणार आहे. त्यात वाढ होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

पाचशे आणि हजाराच्या नोटांबाबत महत्वाची माहीती आली, आरबीआयने केले स्पष्ट
shaktikanta-das-rbiImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 1:59 PM

मुंबई : दोन हजार रुपयांच्या नोटांना बदलण्याचे काम चालू राहणार आहे. या नोटा ( Currency ) परत करण्यासाठी पुरेसा अवधी देण्यात आला आहे. बॅंकांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा ( Two Thousand Currency ) परत करण्यासाठी  रांगा लागल्या असल्याचे फारसे चित्र दिसत नाही. परंतू आता पाचशे आणि हजाराच्या नोटाबाबत पुन्हा काय निर्णय सरकार घेतंय याची धाकधूक नागरिकांना लागलेली आहे. परंतू बॅंकाचा रेपो दर कायम ठेवतानाच आता नागरिकांच्या मनातील या प्रश्नावर रिझर्व्ह बॅंकेचे गर्व्हनर शक्तीकांत दास ( Rbi Governor Shaktikanta Das ) यांनी नविन माहिती दिली आहे.

पोस्ट मॉनेटरी पॉलीसी ब्रिफींग करताना भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी प्रेस ब्रिफींग करताना महत्वाची माहीती दिली आहे. आपला पाचशे रुपयांची नोट मागे घेण्याचा किंवा हजाराची नोट पुन्हा नव्याने चलनात आणण्याचा कोणताही हेतू यावेळी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दोन हजाराच्या नोटा बदलून किंवा डीपॉझिट करण्याचा आदेश दिल्यानंतर घेतलेल्या प्रेस ब्रिफींगमध्ये आरबीआय गर्व्हनर यांनी लोकांच्या मनातील भिती दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

1.80 लाख कोटी नोटा परत

आतापर्यंत नागरिकांनी 2000 रूपयांच्या 1.80 लाख कोटी नोटा परत आल्या आहेत. म्हणजे दोन हजाराच्या चलनात असलेल्या नोटांपैकी ही जवळपास निम्मी रक्कम असल्याचे पत्रकारांशी संवाद साधताना शक्तीकांत दास यांनी सांगितले. अगदी शेवटच्या दिवशी नोटा बदलण्यासाठी किंवा डीपॉझिट करण्यासाठी नागरिकांनी बॅंकात गर्दी करू नये आताच नोटा बदलून घ्यावात असेही त्यांनी आवाहन केले आहे. तुम्ही तुमच्या सवडीनूसार बॅंकात जाऊन दोन हजाराची नोटा बदलू किंवा डीपॉझिट करू शकता. नागरिकांनी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दहा ते पंधरा दिवसात गर्दी करु नये असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आयत्या वेळी गर्दी नको

जवळपास दोन हजाराच्या 85 टक्के नोटा बॅंकामध्ये डीपॉझिट झाल्या असून हे अपेक्षेनूसारच घडल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. एमपीसीच्या ताज्या झालेल्या बैठकीनंतर रिझर्व्ह बॅंकेने बॅंकाचा रेपो रेट 6.5% वरच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे होम लोन घेतलेल्या किंवा घेणाऱ्या नागरिकांचा ईएमआय व्याजाचा दर कायम रहाणार आहे. त्यात वाढ होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.