एसबीआय, एचडीएफसी, पीएनबीसह या बँकांच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, 1 एप्रिलपासून बंद होऊ शकते ही सेवा

या बँकांमध्ये स्टेट बँक (एसबीआय), अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय, एचडीएफसी बँक (एचडीएफसी), पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), कोटक महिंद्रा बँक, एलआयसी इत्यादींचा समावेश आहे. (Important news for customers of these banks including SBI, HDFC, PNB, this service may be closed from 1st April)

एसबीआय, एचडीएफसी, पीएनबीसह या बँकांच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, 1 एप्रिलपासून बंद होऊ शकते ही सेवा
Follow us
| Updated on: Mar 28, 2021 | 12:10 AM

नवी दिल्ली : सरकारी संस्था, मार्केटिंग कंपन्या आदींच्या वतीने सामान्य लोकांच्या मोबाईल नंबरवर बल्क एसएमएस पाठविला जातो. यासंदर्भात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) कडक भूमिका घेत नियम कडक केले आहेत. या नियमांचे पालन न करणाऱ्या कंपन्यांची एसएमएस सेवा बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. असे असूनही जवळपास 40 कंपन्या निर्धारीत मानदंडांचे पालन करीत नाहीत. अशा परिस्थितीत ट्रायने अशा 40 डिफॉल्ट कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. या 40 संस्थांमध्ये 17 सरकारी आणि खासगी बँकांचा समावेश आहे. द लाईव्ह मिंटच्या अहवालानुसार या बँकांमध्ये स्टेट बँक (एसबीआय), अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय, एचडीएफसी बँक (एचडीएफसी), पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), कोटक महिंद्रा बँक, एलआयसी इत्यादींचा समावेश आहे. (Important news for customers of these banks including SBI, HDFC, PNB, this service may be closed from 1st April)

कोट्यावधी बँक ग्राहकांवर होतील परिणाम

ईटीच्या अहवालानुसार, सरकारी आणि खासगी बँकांशिवाय फ्लिपकार्ट, नॅशनल स्टॉक एक्सचेंज याशिवाय नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांचादेखील या यादीमध्ये समावेश आहे. ट्रायने 31 मार्च पर्यंत सर्वांना मंजुरी दिली आहे. असे म्हटले जात आहे की 31 मार्च पर्यंत निर्धारीत मानदंडाचे पालन न केल्यास एसएमएस सेवा बंद केल्या जातील. जर असे झाले तर सर्वात मोठा फरक बँकांच्या ग्राहकांमध्ये पडेल. लाखो बँक ग्राहकांना आवश्यक सेवांशी संबंधित एसएमएस मिळणार नाहीत. व्यवहारासाठी आवश्यक असलेल्या ओटीपी सेवेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

ट्रायने दिली 31 मार्च पर्यंत मुदत

याबाबत भूमिका कडक करताना ट्रायने म्हटले आहे की 31 मार्च 2021 पर्यंत सर्व घटकांना विहित मानके पाळावी लागतील. हे न केल्यास, त्यांचे ग्राहकांशी एसएमएस संभाषण 1 एप्रिल 2021 पासून बाधित होऊ शकते. ट्रायने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, टेली-मार्केटिंग कंपन्यांना नियामक मानदंड आणि अनिवार्यता पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला आहे. ग्राहकांना नियामक फायद्यांपासून वंचित ठेवू शकत नाही. 1 एप्रिलपासून नियामक आवश्यकतांचे पालन न करणारे संदेश थांबविले जातील, असा निर्णय घेण्यात आला आहे.

कोणत्या मानकांचे पालन केले पाहिजे?

ट्रायच्या नियमांनुसार व्यावसायिक मजकूर संदेश पाठविणार्‍या संस्थांना टेलिकॉम ऑपरेटरकडे मॅसेज हेडर आणि टेम्पलेट नोंदणी करावी लागेल. या तमाम संस्थांना बँक, कंपन्या आणि इतर घटकांकडे जेव्हा एसएमएस आणि ओटीपी येईल, तेव्हा ब्लॉकचेन प्लॅटफॉर्मवर नोंदणीकृत टेम्पलेटमधून त्याची तपासणी केली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेस एसएमएस स्क्रबिंग असे म्हणतात.

का केली जातेय सक्ती?

ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारीत ट्रायच्या व्यावसायिक संदेशांचे नियमांचा उद्देश बँक फसवणूक, सायबर फ्रॉडवाल्या संदेशांना आळा घालण्यासाठी आहेत. ट्रायने स्क्रबिंग डेटा आणि दूरसंचार कंपन्यांनी सादर केलेल्या अहवालाचे विश्लेषण केले आहे. या संदर्भात, 25 मार्च रोजी टेलि मार्केटिंग कंपन्या / अॅग्रीगेटरसोबत एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. (Important news for customers of these banks including SBI, HDFC, PNB, this service may be closed from 1st April)

इतर बातम्या

होळीच्या पार्श्वभूमीवर तिरोडा पोलिसांचे 3 ठिकाणी छापे; 1 लाख 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त

Deepali Chavan Suicide | संतापलेल्या नवनीत राणांकडून महिला वन अधिकाऱ्यांची खरडपट्टी; वाचा संवाद जसाच्या तसा

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.