निवृत्तीआधी ‘या’ 5 गोष्टींची काळजी घेतली तर कधीच पैशांची अडचण येणार नाही

निवृत्तीनंतर अनेक अडचणींना सामना करावा लागतो. यात सर्वाधिक अडचणी आर्थिक असतात. अचानक उत्पन्न कमी होतं.

निवृत्तीआधी 'या' 5 गोष्टींची काळजी घेतली तर कधीच पैशांची अडचण येणार नाही
SIP
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 5:12 AM

नवी दिल्ली : निवृत्तीनंतर अनेक अडचणींना सामना करावा लागतो. यात सर्वाधिक अडचणी आर्थिक असतात. अचानक उत्पन्न कमी होतं. निवृत्तीनंतरची मिळालेली रक्कम पूर्वनियोजित एखाद्या मोठ्या कामात खर्च होते. दुसरीकडे महागाई वाढते. अशाच निवृत्तीचा चांगला प्लॅन असणं फार आवश्यक आहे. त्यासाठी निवृत्तीसोबत मिळालेले पैसे अशा ठिकाणी गुंतवले पाहिजेत जिथून येणाऱ्या कमाईमुळे कोणतीही आर्थिक अडचण येणार नाही. अशाप्रकारे तुम्ही निवृत्तीनंतर निवांत जगू शकता. चला तर पाहुयात यासाठी नेमक्या कोणत्या 5 गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे (Important tips for people who want to invest after retirement for financial security).

1.गुंतवणुकीवर मिळणारं व्याज आणि महागाई दर तपासा

निवृत्ती रक्कम अशा ठिकाणी गुंतवणूक करा जिथे महागाईच्या दरापेक्षा अधिक व्याज मिळे. उदाहरणार्थ. तुमच्या गुंतवणुकीवर वार्षिक 4 टक्के व्याज मिळत असेल आणि महागाईचा दरही 4 टक्के असेल तर तुम्हाला मिळणारी रक्कम शून्य असेल.

2. ऐनवेळीच्या आजारपणाचा विचार करुन गुंतवणूक करा

वैद्यकीय आपत्कालीन स्थिती लक्षात घेऊनही नियोजन केलं पाहिजे. म्हणूनच अचानक आजारपण किंवा इतर वैद्यकीय कारणाने पैशांची गरज लागली तर काय करावं याचाही विचार करुन ठेवा.

3. ‘पॅसिव्ह इनकम’ म्हणजे काम न करता उत्पन्न मिळेल यावर लक्ष्य द्या

कोणतंही काम न करता केवळ योग्य गुंतवणूक केली तरी उत्पन्न मिळेल यावर भर द्या. यासाठी शेअर बाजारातील गुंतवणूक हाही एक मार्ग आहे. जर तुम्ही रिअल एस्टेटमध्ये गुंतवणूक केलेली असेल तर घर भाड्यातून उत्पन्न मिळेल. इंफॉर्मेटिव प्रोडक्ट सेलिंगचा मार्गही अवलंबता येईल. याशिवाय घरात अधिकची जागा असेल तर तुम्ही छोट्या काळासाठी घर भाड्यानेही देऊ शकता. यातून मिळणाऱ्या पैशात तुम्ही तुमच्या अधिकच्या गरजा भागवू शकता.

4. गंतवणुकीत वैविध्य असावं

निवृत्तीनंतर केलेल्या गुंतवणुकीत वैविध्य असावं. यात काही पैसे नियमित उत्पन्न येईल अशा सेव्हिंग योजनेत गुंतवता येतील. याशिवाय रिअल एस्टेटमध्येही गुंतवणूक करता येईल. यामुळे घरबसल्या उत्पन्न मिळेल. काही पैसे इमर्जंसी फंडसाठी ठेवले पाहिजे. अशा पैशांचा उपयोग केव्हाही करता येतो. याशिवाय म्युचवल फंडातही गुंतवणूक करण्याचा चांगला मार्ग आहे. अधिक उत्पन्नासाठी काही पैसे इक्विटी फंडात आणि फिक्स्ड रिटर्नसाठी गुंतवले पाहिजेत.

5. आरोग्य विमा सर्वात महत्त्वाचा

निवृत्तीनंतर आरोग्य विम्यावर लक्ष दिलं पाहिजे. कोरोनानंतर आरोग्य विमा महत्त्वाचा झालाय. म्हातारपणात डॉक्टर आणि रुग्णालयाच्या चकरा सामान्य गोष्ट होऊन जाते. अशावेळी उपचारासाठी आरोग्य विमा आवश्यक आहे. अन्यथा तुमची सर्व सेव्हिंग आजारपणातच खर्च होऊन जाईल. महागाईच्या या काळात औषधोपचाराचा खर्च प्रचंड वाढलाय. म्हणूनच कोणत्याही परिस्थिती आरोग्य विमा काढा.

हेही वाचा :

Post Office च्या या योजनेत दर महिन्याला केवळ 1724 रुपये गुंतवा, निवृत्तीच्या वेळी एकरकमी 31 लाख रुपये मिळणार

वर्षाला 25000 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतील पूर्ण 38 लाख, निवृत्तीसाठी असं करा प्लॅनिंग

टीम इंडियाच्या आर विनय कुमारचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, ट्विटरवरुन दिली माहिती

व्हिडीओ पाहा :

Important tips for people who want to invest after retirement for financial security

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.