Income Tax : 30 वर्षांपूर्वी कमाईवर इतका भरावा लागत होता कर, टॅक्स स्लॅबचा फोटो व्हायरल

Income Tax : सोशल मीडियावर अर्थसंकल्पानंतर अनेक मीम्स व्हायरल झाले. काहींनी आनंद व्यक्त केला तर काहींनी त्यातून नाराजी व्यक्त केली. परंतु, आता एक पोस्ट व्हायरल होत आहे. 1992 च्या अर्थसंकल्पानंतर नवीन इनकम टॅक्स स्लॅबची ही पोस्ट आहे. ती सध्या चर्चेत आली आहे.

Income Tax : 30 वर्षांपूर्वी कमाईवर इतका भरावा लागत होता कर, टॅक्स स्लॅबचा फोटो व्हायरल
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 11:00 AM

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पाकडे देशातील नागरिकांचे लक्ष लागलेले असते. यंदाही 1 फेब्रुवारीला करदातेच (Tax Payers) नाही तर जनतेचे ही लक्ष लागलेले होते. मध्यमवर्ग तर टीव्ही, मोबाईलवर चिकटून होता. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला. या बजेटमध्ये काय दिलासा मिळेल, याकडे मध्यमवर्ग, शेतकरी, महिला यांचे लक्ष लागले होते. बजेटच्या पंधरा दिवसांअगोदरच मीडियातून त्याविषयीच्या बातम्या येत होत्या. देशातील प्रत्येक घटकाच्या काय अपेक्षा आहेत, याची माहिती मीडियातून येत होत्या. सोशल मीडियावर अर्थसंकल्पानंतर अनेक मीम्स व्हायरल झाले. काहींनी आनंद व्यक्त केला तर काहींनी त्यातून नाराजी व्यक्त केली. परंतु, आता एक पोस्ट व्हायरल होत आहे. 1992 च्या अर्थसंकल्पानंतर नवीन इनकम टॅक्स स्लॅबची (Income tax slabs in budget 1992) ही पोस्ट आहे. ती सध्या चर्चेत आली आहे.

तुम्ही सोशल मीडियावर अनेक जुने बिल आणि पावत्या बघितल्या असतील. ही जुनी बिलं आणि पावत्या समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. यामध्ये मोटारसायकल, सायकल आणि सोन्याच्या आभुषणांच्या किंमती, त्याची पावती. एखाद्या हॉटेलचे, रेस्टॉरंटचे बिल यांचा समावेश आहे. 1992 मध्ये पंतप्रधान नरसिंहराव यांचे सरकार होते. या सरकारमध्ये मनमोहन सिंग हे केंद्रीय अर्थमंत्री होते. त्यांनी इनकम टॅक्स स्लॅब तीन टप्प्यात विभागले होते.

हे सुद्धा वाचा

1992 मध्ये इनकम टॅक्स स्लॅबचे हे छायाचित्र ट्विटरवर @IndiaHistorypic या नावाच्या पेजवर 30 जानेवारी रोजी शेअर करण्यात आले होते. या पोस्टसोबत कॅप्शही टाकण्यात आली होती. 1992 मधील नवीन इनकम टॅक्स स्लॅब, अशी कॅप्शन होती.

या इनकम टॅक्स स्लॅबमध्ये 28000 हजार रुपयांच्या कमाईवर कोणताही कर नव्हता. 28001 हजार ते 50000 रुपयांच्या उत्पन्नावर 20 टक्के कर, 50001 ते 100000 रुपयावर 30 टक्के कर आणि 1 लाख रुपयांवरील कमाईवर 40 टक्के प्राप्तिकर द्यावा लागत होता. या ट्विटवर युझर्सच्या अक्षरशः उड्या पडल्या. या ट्विटला अनेक लाईक्स आणि रीट्विट्स मिळाले आहेत. काही युझर्सने या पोस्टवर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. 30 वर्षांपूर्वीच्या या इनकम टॅक्स स्लॅबच्या अधिकृतपणाविषयी कोणीही पुष्टी केलेली नाही. पण त्याकाळात कर कमी होता, असे युझर्सला वाटत आहे. पण त्याकाळचे 28,000 रुपये ही मोठी रक्कम होती.

देशात कर भरणाऱ्यांची संख्या कमी आहे. भारतात केवळ 1.5 कोटी करदात्यांच्या जीवावरच केंद्र सरकारचे प्राप्तिकर खाते कार्यरत आहे. 132 कोटी लोकसंख्येच्या देशात केवळ 1.5 कोटी करदाते आहेत. हे प्रमाण किती कमी आहे, हे वेगळं सांगायला नको. अमेरिकेतील 60% जनता आयकर भरते. त्या तुलनेने भारताचा आकडा अगदीच नगण्य 6 टक्के आहे.

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.