मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सची जगरहाटी, व्यवसायाचा असा झाला वटवृक्ष
Mukesh Ambani | असा एकही आठवडा जात नाही, ज्यावेळी मुकेश अंबानी, इशा अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी अथवा रिलायन्स, जिओची चर्चा होत नसेल. एक दोन दिवसा आड त्यांच्याविषयीचे वृत्त, बातमी तुमच्या नजरेखालून जात असेलच. या समूहाविषयी, त्याच्या नेत्याविषयीची ही अपडेट तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे.
नवी दिल्ली | 2 नोव्हेंबर 2023 : रिलायन्स हे महा साम्राज्य आहे. कधी भविष्यातील रिटेल डील, कधी रिलायन्स रिटेल, कधी रिलायन्स पेट्रोलियम, कधी जगातील सर्वात मोठी तेलाची रिफायनरी, सौदी अरबपर्यंतची व्यावसायिक आघाडी, कधी 18 मीडिया आणि एंटरटेनमेंटच्या माध्यमातून मीडिया क्षेत्रात प्रवेश करण्याबद्दल, मुंबई इंडियन्स, आलिया भट्टची मॅटर्निटी वेअर कंपनी ममाअर्थ, अलोक इंडस्ट्रीज, अक्षय ऊर्जा, ईव्ही बॅटरी, आता आर्थिक क्षेत्रात जिओ फायनान्सची मुसंडी, रिलायन्स ट्रेंडबद्दल, काल परवा उघडलेल्या लक्झरी मॉल प्लाझाबद्दल. या अगणित अशा यशोगाथा एकाच छताखाली घडत आहे. आपण याची मोजदाद करताना थकून जाऊ पण हा पसारा थांबणार नाही. हा जणू एक वटवृक्ष झाला आहे आणि त्याच्या अगणित फाद्या विस्तारत आहेत.
400 कोटींच्या धमकीने चर्चा
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना धमकीसत्र सुरु आहे. त्यांना गेल्या आठवड्यात शुक्रवारी पहिल्यांदा मेलवर धमकावण्यात आले. 20 कोटींची धमकी देण्यात आली. उत्तर न दिल्याने दुसऱ्या दिवशी पुन्हा धमकी देण्यात आली. 200 कोटींची खंडणी मागण्यात आली. जीवे मारण्याची धमकी देत तिसऱ्यांदा 400 कोटींची धमकी देण्यात आली. पोलिस याप्रकरणी तपास करत आहे. दरम्यान नवीन पिढीसाठी रिलायन्सचे दरवाजे उघडे करण्यात आले. आकाश, इशा आणि अनंत अंबानी हे आता कंपनीच्या संचालक मंडळावर नॉन एक्झिक्युटिव्ह सदस्य म्हणून काम पाहतील.
अशी आहे मुलांच्या खांद्यावर जबाबदारी
- आकाश अंबानी याच्याकडे टेलिकॉम सेक्टरची जबाबदारी आहे. जून 2022 पासून तो रिलायन्स टेलिकॉम युनिटचा अध्यक्ष आहे. सध्या जिओने आघाडी घेतली आहे. ऑपिटकल केबलच्या माध्यमातून लवकरच सर्वात वेगवान इंटरनेट देण्याची त्यांची योजना भारतभर मूर्त रुपात येणार आहे. त्यासाठी अब्जावधींची गुंतवणूक करण्यात आली आहे.
- इशा ही मुकेश अंबानी यांची लाडकी लेक आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचरचा अवघा पसारा तिच्या ताब्यात आहे. या रिटेल कंपनीतंर्गत जगातील अनेक ब्रँड एकवटले आहे. त्यात अनेक कंपन्यांची दरवर्षी भर पडतच आहे. ही कंपनी महसूलात आणि नफ्यात अग्रेसर आहे. मनी कंट्रोलच्या दाव्यानुसार, रिलायन्स रिटेलचा 8,361 कोटींच्या घरात डोलारा आहे.
- अनंत अंबानी हा सर्वात धाकटा मुलगा आहे. तो जिओ प्लॅटफॉर्म, रिलायन्स रिटेलच्या संचालकांपैकी एक आहे. तर त्यांच्याकडे नव्याने अक्षय ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याने राधिका मर्चंटसोबत लग्न केले आहे.
इतकी आहे संपत्ती
मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहे. फोर्ब्सच्या जागतिक श्रीमंतांच्या यादीनुसार, 1 नोव्हेंबर 2023 रोजी त्यांची 89.4 अब्ड डॉलर म्हणजे 7 लाख 44 हजार 450 कोटी रुपयांच्या घरात संपत्ती आहे. ते जागतिक श्रीमंतांच्या यादीत 12 व्या क्रमांकावर आहेत. रिलयान्स पेट्रोकेमिकल्स, टेलिकॉम, फायनान्स यासह रिटेल क्षेत्रात दबदबा आहे.