नवी दिल्ली | 2 नोव्हेंबर 2023 : रिलायन्स हे महा साम्राज्य आहे. कधी भविष्यातील रिटेल डील, कधी रिलायन्स रिटेल, कधी रिलायन्स पेट्रोलियम, कधी जगातील सर्वात मोठी तेलाची रिफायनरी, सौदी अरबपर्यंतची व्यावसायिक आघाडी, कधी 18 मीडिया आणि एंटरटेनमेंटच्या माध्यमातून मीडिया क्षेत्रात प्रवेश करण्याबद्दल, मुंबई इंडियन्स, आलिया भट्टची मॅटर्निटी वेअर कंपनी ममाअर्थ, अलोक इंडस्ट्रीज, अक्षय ऊर्जा, ईव्ही बॅटरी, आता आर्थिक क्षेत्रात जिओ फायनान्सची मुसंडी, रिलायन्स ट्रेंडबद्दल, काल परवा उघडलेल्या लक्झरी मॉल प्लाझाबद्दल. या अगणित अशा यशोगाथा एकाच छताखाली घडत आहे. आपण याची मोजदाद करताना थकून जाऊ पण हा पसारा थांबणार नाही. हा जणू एक वटवृक्ष झाला आहे आणि त्याच्या अगणित फाद्या विस्तारत आहेत.
400 कोटींच्या धमकीने चर्चा
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना धमकीसत्र सुरु आहे. त्यांना गेल्या आठवड्यात शुक्रवारी पहिल्यांदा मेलवर धमकावण्यात आले. 20 कोटींची धमकी देण्यात आली. उत्तर न दिल्याने दुसऱ्या दिवशी पुन्हा धमकी देण्यात आली. 200 कोटींची खंडणी मागण्यात आली. जीवे मारण्याची धमकी देत तिसऱ्यांदा 400 कोटींची धमकी देण्यात आली. पोलिस याप्रकरणी तपास करत आहे. दरम्यान नवीन पिढीसाठी रिलायन्सचे दरवाजे उघडे करण्यात आले. आकाश, इशा आणि अनंत अंबानी हे आता कंपनीच्या संचालक मंडळावर नॉन एक्झिक्युटिव्ह सदस्य म्हणून काम पाहतील.
अशी आहे मुलांच्या खांद्यावर जबाबदारी
मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहे. फोर्ब्सच्या जागतिक श्रीमंतांच्या यादीनुसार, 1 नोव्हेंबर 2023 रोजी त्यांची 89.4 अब्ड डॉलर म्हणजे 7 लाख 44 हजार 450 कोटी रुपयांच्या घरात संपत्ती आहे. ते जागतिक श्रीमंतांच्या यादीत 12 व्या क्रमांकावर आहेत. रिलयान्स पेट्रोकेमिकल्स, टेलिकॉम, फायनान्स यासह रिटेल क्षेत्रात दबदबा आहे.