Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Repo Rate : असा शहाणपणा देगा देवा! या दोन सदस्यांची थोपटा पाठ, रेपो रेटविरोधात उठवले रान

Repo Rate : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीने रेपो दर वाढवून सर्वसामान्यांच्या खिशावर पुन्हा भार टाकला. महागाई आटोक्यात आणण्यासाठी जनतेला महागाईच्या खाईत लोटण्यास दोन सदस्यांनी विरोध केला होता.

Repo Rate : असा शहाणपणा देगा देवा! या दोन सदस्यांची थोपटा पाठ, रेपो रेटविरोधात उठवले रान
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 10:01 AM

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India-RBI) रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्याचा देशातील लाखो कर्जदारांना मोठा फटका बसला. गेल्या दोन वर्षांत त्यांच्या ईएमआयमध्ये कित्येक हजारांची भर पडली आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी आरबीआय सातत्याने रेपो दरात (Repo Rate) वाढ करत आहे. 8 फेब्रुवारी 2023 रोजी आरबीआयच्या पतधोरण समितीने रेपो दरात 0.25 टक्क्यांची वाढ केली. अर्थात पतधोरण समितीच्या (Monetary Policy Committee) बैठकीत रेपो दर वाढीला दोन सदस्यांनी मोठा विरोध केला होता. या समितीत एकूण 6 सदस्य असतात. त्यातील आशिमा गोयल आणि जयंत वर्मा यांनी रेपो दर वाढीला जोरदार विरोध केला होता. सध्या रेपो दर वाढविण्याची गरज नसल्याचे म्हणणे त्यांनी मांडले होते. रेपो दर वाढवल्याने कर्जदारांच्या डोक्यावर ईएमआयचा वाढीव बोजा पडला आहे. अगोदरच जनता महागाईने मेटाकुटीला आली असताना, त्याचा खिसा आरबीआयच्या धोरणामुळे कापल्या गेला.

या समितीचे सदस्य जयंत वर्मा यांनी रेपो दर वाढीला विरोध केला. 2021-22 च्या दुसऱ्या सहामाहीत महागाईविषयी चलनधोरण समाधानकारक होते. तरीही 2022-23 मध्ये जनतेला नाहक महागाईचा रुपाने त्याचा फटका सहन करावा लागत आहे. 2022-23 मधील दुसऱ्या सहामाहीत चलनधोरण आता समाधानकारक म्हणावे लागेल. त्यामुळे 2023-24 मध्ये पुन्हा दर वाढ करण्याची गरज पडणार नाही, अशी मला आशा आहे. महागाई आता कमी होत असल्याचे लक्षात घेण्यात आले नसल्याचे दिसते.

आरबीआयने मे 2022 पासून ते आतापर्यंत रेपो दरात 190 बेसिस प्वॉईंट्सची वृद्धी केली आहे. डिसेंबरपर्यंत रेपो दर 5.90% होता. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय रेपो दरात वाढ केली. रेपो दर 6.25 टक्क्यांवर पोहचला होता. सप्टेंबर महिन्यात महागाईचा दर 7.41% होता. महागाई दर घसरला. ऑक्टोबर महिन्यात महागाई दराने मागील तीनही महिन्यांचे रेकॉर्ड बदलले. ऑक्टोबर महिन्यात महागाई दर घसरून 6.77% वर आला. खाद्यान्न आणि अन्नधान्यांच्या किंमती झाल्याचा हा परिणाम होता.

हे सुद्धा वाचा

7 डिसेंबर रोजी रेपो दरात 35 बीपीएसने वाढ करण्यात आली होती. तर आता या फेब्रुवारी महिन्यात पुन्हा हा दर 25 बीपीएसने वाढला आहे. त्यामुळे रेपो दर 6.50% पर्यंत वाढला आहे. त्याचा फटका सर्वांनाच बसणार आहे. यापूर्वी गेल्या वर्षी आरबीआयने रेपो दरात 2.25 टक्के वाढ केली होती.

आरबीआय गव्हर्नर यांनी आर्थिक वर्ष 2023 मध्ये भारताचा जीडीपी दर 7 टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. तर महागाई दर आर्थिक वर्ष 2023-24 साठी 4 टक्क्यांपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. जागतिक अर्थव्यवस्था आणि महागाईचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरही दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक आव्हाने असतानाही भारतीय अर्थव्यवस्था गतिमान असल्याचा दावा ही त्यांनी केला.

जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे
जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे.
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार.
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय.
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट.
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद.
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र.
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?.
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका.
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी.
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय...
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय....