Income Tax : खूशखबर, 8 लाख रुपायांपर्यंत वाचणार टॅक्स, छदामही भरु नका, अर्थमंत्र्यांनी सांगितला उपाय!
Income Tax : तुम्हाला 8 लाख रुपायांपर्यंत कर वाचविता येणार, असा सांगितला उपाय
नवी दिल्ली : आज ज्या वेतनधारकांचे वेतन 5 लाख रुपयांहून अधिक आहे, ते आतापासूनच प्राप्तिकर (Income Tax) कसा वाचावावा या चिंतेत असतात. पण तुम्हाला 8 लाख रुपयांपर्यंत कर वाचवता येणार आहे. तुमचा पगार 8 लाख असो वा 10 लाख रुपये, तुम्हाला करा भरण्यासाठी छदामही द्यावा लागणार नाही. तुम्हाला ही गोष्ट अविश्वसनीय वाटेल पण यासंबंधीचे अनेक उपाय आहेत. त्याचा उपयोग केल्यास तुम्हाला प्राप्तिकर भरण्यासाठी एक रुपयाही द्यावा लागणार नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी कर वाचविण्याचे अनेक प्रकार शेअर केले आहेत. त्याआधारे तुम्ही लाखो रुपयांची बचत करु शकता. 8 लाख रुपयापर्यंत इनकम टॅक्स कसा वाचवावा हे पाहुयात.
तुम्ही गृहकर्ज घेतले असेल तर प्राप्तिकर कायदा कलम 24 (b) अंतर्गत सवलतीचा फायदा मिळू शकतो. गृहकर्जावर तुम्ही जे व्याज भरता, त्यावर कर सवलतीचा दावा करता येईल. यामध्ये तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंतच्या व्याजावर कर सवलतीचा दावा करता येईल.
याशिवाय गृहकर्जाच्या मूळ रक्कमेवरही तुम्हाला कर सवलतीचा दावा करता येतो. प्राप्तिकर कायदा कलम 80सी अंतर्गत कर सवलत मिळते. यामध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते.यापूर्वी डिडक्शन करत असाल तर दीड लाखांपर्यंतच कर सवलत मिळू शकते.
इनकम टॅक्स अॅक्टच्या कलम 80EEB अंतर्गत कोणतीही इलेक्ट्रिक कार खरेदी कराल तर त्यावर कर सवलत मिळेल. इलेक्ट्रिक वाहन खरेदी केल्यास अथवा वाहन कर्ज घेतल्यास त्यावर 1.5 लाख रुपयांपर्यंत सवलत मिळते.
प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते. त्यामुळे तुम्ही एलआयसी पॉलिसी, पीपीएफ, ईपीएफ, एनएससी सह इतर अनेक योजनांमध्ये रक्कम गुंतवू शकता आणि कर सवलतीसाठी दावा करु शकता.
आरोग्य विमावरही तुम्हाला कर बचत करता येते. सेक्शन 80डी अंतर्गत तुम्ही प्रीमियम क्लेम करु शकता. त्यावर तुम्हाला 25,000 रुपयांपर्यंतची कर सवलत मिळते. जर आई-वडिलांचाही आरोग्य विमा असेल तर त्यावरही 50,000 रुपयांची सवलत मिळते.
भारतातील ज्येष्ठ नागरिक पेन्शन आणि इतर योजनांतील उत्पन्नावर उदरनिर्वाह करतात. त्यांच्या या उत्पन्नावर आता कुठलाच कर त्यांना द्यावा लागणार नाही. त्यांना इनकम टॅक्स रिटर्न भरावा लागणार नाही. आतापर्यंत सर्वच नागरिकांना उत्पन्नानुसार कर भरावा लागत होता. ज्येष्ठांना यामध्ये सवलत देण्यात आली आहे.
अर्थमंत्रालयाने ट्विट करुन याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, देशातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना यावर्षापासून इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची गरज नाही. ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे पेन्शन अथवा इतर योजना याशिवाय उत्पन्नाचा कोणतेही स्त्रोत नाही. त्यांना याचा फायदा होईल.