Income Tax : 1 रुपयांच्या गडबडीने येईल का आयकर खात्याची नोटीस? ITR फाईल करण्यापूर्वी या गोष्टींची काळजी घ्या

Income Tax Notice : यावेळी हजारो करदाते, पहिल्यांदा त्यांचा आयटीआर फाईल करत आहे. विना माहिती आयटीआर फाईल करणे करदात्यांना महागात पडू शकते. त्यांना एका चुकीबद्दल सुद्धा आयकर खात्याकडून नोटीस येऊ शकते. त्यामुळे आयटीआर फाईल करताना काळजी घेणे आवश्यक आहे.

Income Tax : 1 रुपयांच्या गडबडीने येईल का आयकर खात्याची नोटीस? ITR फाईल करण्यापूर्वी या गोष्टींची काळजी घ्या
Income Tax Notice
Follow us
| Updated on: Jul 08, 2024 | 6:52 PM

प्राप्तिकर भरण्याला आता वेग आला आहे. देशातील सर्व करदात्यांना 31 जुलैपूर्वी आयकर भरण्याची संधी आहे. जर करदात्याने या मुदतीनंतर आयकर फाईल केले तर त्याला 5 हजारांचा दंड भरावा लागू शकतो. यंदा लाखो करदाते असे आहेत की ते पहिल्यांदा कराचा भरणा करणार आहे. आयटीआर पहिल्यांदा फाईल करणार आहेत. विना माहिती आयकर भरल्यास त्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. त्यांना आयकर खात्याकडून नोटीस पण येऊ शकते. नोटीस आल्यानंतर करदाते हैराण होतात. त्यामुळे कर भरताना काळजी घेणे आवश्यक आहे. विना माहिती कर भरणे ही डोकेदुखी ठरु शकते. त्यामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञाचा सल्ला आवश्य घ्या.

नोकरदारांसाठी ITR-1

जर तुम्ही पगारदार व्यक्ती आहात आणि तुमचे आर्थिक वर्ष 2020-21 साठी एकूण उत्पन्न 50 लाख रुपयांपर्यंत असेल तर तुमचे आयटीआर-1 फॉर्म भरावा लागेल. तुमच्या पगारात पेन्शनचे उत्पन्न पण सामील असते, हे लक्षात घ्या.

हे सुद्धा वाचा

जर पगाराव्यतिरिक्त पण दुसर्‍या स्त्रोतातून तुमची कमाई होत असेल, त्यात बँक खात्यातील ठेवीवरील व्याज आणि एक गृह मालमत्ता, तर तुम्ही पण आयटीआर-1 फॉर्म द्वारे तुम्ही रिटर्न फाईल करु शकता. शेतीतून तुमचे पाच हजारांचे उत्पन्न होत असेल तर तुम्हाला आयटीआर-1 चा वापर करता येईल.

या लोकांसाठी आहे ITR-2

जर तुमचे वेतन उत्पन्न 50 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला आयटीआर 2 चा वापर करावा लागेल. तुमच्याकडे एका पेक्षा अधिक घरे असतील. परदेशातील मालमत्ता असेल. तुम्हा एखाद्या कंपनीत संचालक पदी असाल अथवा तुमच्याकडे असूचीबद्ध शेअर असतील आणि त्यातून फायदा झाला असेल तर ITR-2 चा तुम्हाला वापर करावा लागेल.

ITR-3 कोणासाठी योग्य?

हा अर्ज व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी, ज्यांचे उत्पन्न पगारातून येत नाही, त्यांच्यासाठी आयटीआर-3 आहे. जर तुम्ही एखाद्या कंपनीत भागीदार आहात, तर तुम्हाला आयटीआर -3 फॉर्मचा वापर करावा लागेल.

ITR-4 कोण भरु शकते?

आयटीआर-4 चा वापर वैयक्तिक आणि हिंदू अविभक्त कुटुंब करु शकते. गेल्या आर्थिक वर्षात ज्यांना त्यांच्या व्यवसायातून आणि व्यापारातून उत्पन्न मिळाले आहे. पण ते प्रिझम्टिव्ह इनकम स्कीमचा (PIS) वापर करु इच्छित असतील तर त्यांना या पद्धतीने आयटीआर भरावा लागेल. आयकर अधिनियम 1961 चे कलम 44AD, 44AE आणि 44ADA अंतर्गत ते त्यांच्या उत्पन्नाचा हिशोब मांडू शकतील.

'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.