Income Tax Return Filing : आयटीआर फॉर्ममध्ये झाला बदल, तुम्ही वाचला तर होईल फायदा

Income Tax : आयकर रिटर्न (ITR) दाखल करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. तुम्ही अद्यापही आयटीआर भरण्याची तयारी केली नसेल अथवा भरण्याच्या तयारीत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची ठरेल.

Income Tax Return Filing : आयटीआर फॉर्ममध्ये झाला बदल, तुम्ही वाचला तर होईल फायदा
आयकर फॉर्ममध्ये काय बदल
Follow us
| Updated on: Jul 04, 2024 | 10:51 AM

प्राप्तिकर रिटर्न (ITR) फाईल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 रोजी आहे. जर तुम्ही अद्याप आयटीआर जमा केला नसेल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्वाची ठरु शकते. आयटीआर फॉर्ममध्ये अनेक महत्वाचे बदल झाले आहेत. ही माहिती आयटीआर भरण्यासाठी तुमच्या उपयोगी ठरु शकते. काय झाला आहे बदल, घ्या जाणून…

यावर्षी मूल्यांकन वर्ष 2024-25 साठी आयकर रिटर्न दाखल करावे लागणार आहे. त्यासाठी आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये तुमचे उत्पन्न, खर्च आणि गुंतवणूक यांचा हिशोब सादर करावा लागणार आहे. तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये, संभ्रम राहू नये यासाठी आयकर विभागाच्या संकेतस्थळावर आयटीआर फॉर्म एसेसमेंट इअरच्या आधारे उपलब्ध आहे.

आयटीआर फॉर्ममध्ये झाले महत्वाचे बदल

हे सुद्धा वाचा

जर तुम्ही येत्या कालावधीत आयटीआर भरत असाल तर तुम्हाला फॉर्ममधील बदलाची माहिती असणे आवश्यक आहे. नवीन आयटीआर फॉर्ममध्ये यावेळी आयकर विभागाने करदात्यांची सविस्तर माहिती मागवली आहे. करदात्यांचा कर सवलतीसाठीचे चुकीचे दावे संपविण्यासाठी आणि त्यांचा संभ्रम दूर करण्यासाठी ही माहिती मागविण्यात येत आहे.

काय झाले बदल

जर तुम्ही आयटीआर भरत असाल तर तुम्हाला आयटीआर फॉर्ममध्ये झालेल्या बदलाची माहिती असणे आवश्यक आहे. नवीन आयटीआर फॉर्ममध्ये यावेळी आयकर विभागाने करदात्यांची अतिरिक्त माहिती, सविस्तर माहिती मागवली आहे. त्यामुळे करदात्यांसह आयकर खात्यातील संवादातील त्रुटी आणि त्यातून होणारा मनस्ताप वाचणार आहे.

1.राजकीय पक्षांना निधी देणाऱ्या करदात्यांना आयकर कायद्याच्या कलम 80GGC अंतर्गत 100 टक्के करत सवलत मिळेल. नवीन फॉर्ममध्ये करदात्यांना निधीसंबंधीच माहिती, तो देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा प्रकार, ब्रेकअप आणि बँका हस्तांतरणाची माहिती द्यावी लागणार आहे.

2. जर कोणी करदाता कलम 80DD अंतर्गत डिडक्शन क्लेम करत असेल तर त्याला डिसेबल्ड डिपेंडेंट्सची माहिती द्यावी लागेल. त्यांचे पॅन आणि आधार कार्ड द्यावे लागेल.

3. बाजारात उलाढाल करणाऱ्या करदात्यांकडून सेस आणि इतर टर्नओव्हरची माहिती मागविण्यात आली आहे. एकाच दिवशी एखादी मालमत्ता खरेदी अथवा विक्री केली असेल तर ही माहिती द्यावी लागणार आहे.

4. आता ज्या लोकांना त्यांच्या जीवन विमा पॉलिसीमध्ये वार्षिक बोनस मिळतो, आयटीआर -2 आणि आयटीआर-3 मध्ये याविषयीची माहिती स्वतंत्र द्यावी लागेल.

5. याशिवाय करदात्यांना त्यांच्या एम्प्लॉई स्टॉक ऑप्शंस (ई-सॉप्स), इतर व्हर्च्युअल अॅसेटची वा ऑनलाईन गेमिंगद्वारे जिंकलेल्या रक्कमेची माहिती द्यावी लागणार आहे.

Non Stop LIVE Update
आमदार अपात्र प्रकरणात सुप्रीम कोर्टात निकाल, काय म्हणतात वकील
आमदार अपात्र प्रकरणात सुप्रीम कोर्टात निकाल, काय म्हणतात वकील.
माझा 'रन रेट' चांगलाय, पुढच्या लोकसभेला येथूनच लढतो - महादेव जानकर
माझा 'रन रेट' चांगलाय, पुढच्या लोकसभेला येथूनच लढतो - महादेव जानकर.
T20 वर्ल्ड कप परेड :'एवढी मोठी गर्दी पाहून हृदय...,' काय म्हणाले पोलीस
T20 वर्ल्ड कप परेड :'एवढी मोठी गर्दी पाहून हृदय...,' काय म्हणाले पोलीस.
निलेश लंके यांचे हमीभावासाठी आंदोलन, पत्नी आणि आईने चुल पेटविली
निलेश लंके यांचे हमीभावासाठी आंदोलन, पत्नी आणि आईने चुल पेटविली.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजने संदर्भात मंत्री तटकरे यांनी दिले आदेश
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजने संदर्भात मंत्री तटकरे यांनी दिले आदेश.
'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे म्हणाले
'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे म्हणाले.
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं..
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं...
'वेळ कशी कोणावर येते...,' क्लीन चिटवर काय म्हणाले रवींद्र वायकर
'वेळ कशी कोणावर येते...,' क्लीन चिटवर काय म्हणाले रवींद्र वायकर.
आगे आगे देखो होता है क्या,, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
आगे आगे देखो होता है क्या,, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा.