नवी दिल्ली: आयकर रिटर्न (Income Tax Return) भरण्यासाठी शेवटचे काही तास राहिले आहेत. असेसमेंट वर्ष 2020-21 साठी आयकर रिटर्न भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. आयकर विभागानं करदात्यांना ITR फाईल करण्याचं आवाहन केलं आहे. करदात्यांनी जर आज ( 10 जानेवारी) रिटर्न भरला नाही तर मोठं नुकसान होऊ शकते. रिटर्न फाईल करण्याची मुदत संपल्यानंतर करदात्यांना मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट दंड भरावा लागू शकतो. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) नं ITR फाईल करण्याची तारीख 10 जानेवारीपर्यंत वाढवली होती. यापूर्वी ITR फाईल करण्याची मुदत 31 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली होती. (Income Tax Return filing today is last day)
टॅक्स कन्सल्टंट मुकेश कुमार झा यांच्या मतानुसार मागील वर्षी दिलेल्या मुदतीत आयकर रिटर्न फाईल करायचा राहून गेल्यास 5 हजार दंड आकारण्यात आला होता. मात्र, यावर्षी 10 जानेवारीनंतर ITR फाईल करणाऱ्यांना 10 हजार दंड भारावा लागणार आहे. हा दंड ज्या व्यक्तीचं कर पात्र उप्तन्न 50 लाखांपेक्षा जास्त असेल त्यांना भरावा लागणार आहे. तर, ज्यांचे उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना 1 हजार रुपये दंड भरावा लागेल.
ITR फाईल करण्यासाठी वारंवार मुदतवाढ
2020-21 या असेसमेंट वर्षासाठीचा ITR फाईल करण्यासाठी पहिल्यांदा 31 जुलै 2020 पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ती वाढवून 30 नोव्हेंबर करण्यात आली. कोरोना संसर्ग आणि इतर कारणांमुळे आयकर विभागानं मुदत पुन्हा एकदा वाढवली. 31 डिसेंबरपर्यंत आयकर रिटर्न फाईल करण्याची मुदत देण्यात आली होती. तर, 30 डिसेंबरला आयकर विभागानं पुन्हा एकदा कालावधी वाढवून 10 जानेवारी केला होता.
ITR पहिल्यांदाच फाईल करत असाल तर काय कराल?
आपण प्रथमच आयटीआर दाखल करत असल्यास आपण हे काम ऑनलाइन माध्यमातून केले पाहिजे. हे काम ऑनलाइन करणे सोपे आहे आणि घरी आरामात बसून केले जाऊ शकते. पेपर मोडच्या तुलनेत ऑनलाईन आयटीआर भरणं सोपं आणि सुरक्षित आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपण हे काम इंटरनेटच्या मदतीने कुठूनही करू शकता. यासाठी आपण प्राप्तिकर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जा. www.incometaxindiaefiling.gov.in आणि दिलेल्या सूचनांचे अनुसरण करा. ITR फाइल करताना वापरकर्त्याच्या आयडी (PAN), संकेतशब्दासह जन्मतारीखही भरावी लागते.
ITR फाईल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
आयकर रिटर्न भरण्यासाठी तुमच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक अकाऊंट नंबर, गुंतवणुकीच्या पावत्या, फॉर्म 16, फॉर्म 26AS असणं आवश्यक आहे.
इन्कम टॅक्स भरायची डोकेदुखी?, काळजी करु नका, SBI अशी करेल तुमची मदत!
Income Tax Return भरण्यासाठी शेवटचे पाच दिवस, आयकर विभागाची ‘झटपट प्रोसेसिंग’ सुविधा
(Income Tax Return filing today is last day)