Income Tax Return: करदात्यांच्या हातात अवघे काही दिवसच शिल्लक; ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार आयटीआर, नंतर भरावा लागणार दंड
तुम्ही आयटीआर (ITR) भरण्यासाठी शेवटच्या दिवसाची वाट पहात बसला तर त्याचा फटका हा तुम्हालाच बसण्याची शक्यता आहे. आयटीआर भरण्यासाठी शेवटचे काही दिवस उरल्यानंतर करदाते आयटीआर भरण्याची घाई करतात. मात्र त्यामुळे अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
मुंबई : जर तुमचा समावेश हा इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरणाऱ्यांच्या यादीत होत असेल किंवा तुम्हाला इन्कम टॅक्स (Income Tax) भरायचा असेल तर आयटीआर भरण्यासाठी शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका. आजच आपला आयटीआर दाखल करा. तुम्ही आयटीआर (ITR) भरण्यासाठी शेवटच्या दिवसाची वाट पहात बसला तर त्याचा फटका हा तुम्हालाच बसण्याची शक्यता आहे. आयटीआर भरण्यासाठी शेवटचे काही दिवस उरल्यानंतर करदाते आयटीआर भरण्याची घाई करतात. त्यामुळे काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्यास तुमच्या आयटीआरला विलंब होऊ शकतो. आर्थिक वर्ष 2021-22 किंवा मुल्यांकन वर्ष 2022-23 साठी आयटीआर भरण्यासाठीची शेवटची तारीखी ही 31 जुलै आहे. त्यामुळे आता आयटीआर भरण्यासाठी तुमच्या हातात अवघे 15 दिवस शिल्लक आहेत. ऐनवेळी घाई करण्यापेक्षा आजच आपला आयटीआर दाखल करून निश्चित व्हा.
मुदतवाढीची शक्यता
आयकर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2021-22 किंवा मुल्यांकन वर्ष 2022-23 साठी आयटीआर भरण्याची शेवटची तारीखी ही 31 जुलै आहे. करदाते 31 जुलैपर्यंत आपला आयटीआर दाखल करू शकतात. मात्र या तारखेनंतर जर तुम्ही आयटीआर दाखल केला तर त्याचा मोठा आर्थिक फटका तुम्हाला बसू शकतो. तुमच्याकडून दंड वसूल केला जाऊ शकतो. आयकर विभागाकडून करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयटीआर भरण्यासाठी एखाद्यावेळेस मुदतवाढ मिळू शकते. गेले दोन वर्ष देशावर कोरोनाचे सावट होते. त्यामुळे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली होती. मगाील दोन वर्षांप्रमानेच याहीवर्षी आयटीआर भरण्यासाठी मुदतवाढ मिळू शकते असा अंदाज आहे.
उत्पन्नाच्या स्त्रोतांवरही कर
महागाई गगनाला भिडली आहे. नुसत्या नोकरीतून मिळणाऱ्या पैशांमधून घर चालवणे कठीण बनले आहे. त्यामुळे नोकरदार वर्ग नोकरीसोबतच इतर अनेक मार्गांनी पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. ज्यामध्ये घर भाड्यातून मिळणारे उत्पन्न, शेअर बाजारात गुंतवणूक केली असल्यास त्यातून मिळणारे उत्पन्न, म्युच्युअल फंडमधून मिळणारा परतावा आणि अन्य प्रकारे मिळवलेले उत्पन्न यांचा समावेश होतो. या सर्वांवर आयकर विभागाकडून नियमानुसार कर आकारण्यात येतो. तुम्ही जर आयकर रिटर्न भरताना एखाद्या उत्पन्नाच्या स्त्रोताची माहिती लपवल्यास आणि ते नंतर आयकर विभागाच्या निर्दशनास आल्यास तुम्हाला रितसह नोटीस योऊ शकते.