ITR फाईल केल्यानंतर ‘हे’ काम करायला विसरु नका, अन्यथा आयकर विभाग करेल कारवाई

ITR भरल्यानंतर 120 दिवसांमध्ये वेरिफिकेशन करणं गरजेचे आहे, अन्यथा आयकर विभागाकडून दंड होऊ शकतो. Income Tax Return verification

ITR फाईल केल्यानंतर 'हे' काम करायला विसरु नका, अन्यथा आयकर विभाग करेल कारवाई
Follow us
| Updated on: Dec 28, 2020 | 11:23 AM

नवी दिल्ली: आयकर रिटर्न(Income Tax Return) भरण्यासाठी शेवटचे चार दिवस शिल्लक आहेत. 31 डिसेंबर 2020 ही रिटर्न भरण्याची शेवटची तारीख आहे. जर तुम्ही आयकर रिटर्न भरला असेल आणि प्रमाणित (Verified) करुन घेतला नाही, तर अडचणीत येऊ शकता. यासाठी तुम्हाला दंड देखील भरावा लागू शकतो आणि आयकर विभागाची नोटीस देखील येऊ शकते. आयकर रिटर्न भरल्यानंतर प्रमाणित करुन घेणं गरजेचे आहे. (Income Tax Return verification is must after filing )

आयकर रिटर्नचे वेरिफिकेशन केल्यानंतरच आयकर विभाग ITR ची प्रोसेस करतो. जर तुम्ही 31 डिसेंबर किंवा त्यापूर्वी ITR भरला आहे. तर, त्यानंतर पुढील 120 दिवसांमध्ये त्याचं वेरिफिकेशन केलं नाही तर आयकर विभाग ITR भरला नाही, असं समजते.

ITR प्रमाणित (Verify) केला नाही तर काय होईल?

ITR भरल्यानंतर विहीत मुदतीत तो वेरिफाय केला नाही तर, ITR वैध मानले जाणार नाही. आयकर रिटर्न भरून देखील वेरिफाय करुन घेतला नाही तर करदात्याला दंड भरावा लागू शकतो किंवा आयकर विभागाची नोटीस मिळू शकते. ITR रिटर्न भरलेल्या दिवसापासून 120 दिवसांच्या आत वेरिफिकेशन केले नाही तर तुम्हाला इनकम टॅक्स रिफंडची रक्कम मिळणार नाही.

आयटीआर असा करा वेरिफाई

ITR अपलोडिंग केल्यानंतर120 दिवसांमध्ये वेरिफाई करुन घेणं आवश्यक असतं.

(I) आयकर रिटर्न भरल्यानंतर ई वेरिफिकेशनसाठी आधार ओटीपी जनरेट करावा लागेल. त्यानंतर आलेला ओटीपी पोर्टलवर भरावा लागेल.

(II) यासाठी नेट बैंकिंगद्वारे ई-फाइलिंग अकाउंटमध्ये लॉगीन करावं लागेल

(III) इलेक्ट्रॉनिक वेरिफिकेशन कोड (EVC) द्वारे वेरिफिकेशन करुन ITR-V त्याची प्रत बंगळूरुला पाठवावी लागेल.

कोरोना विषाणू संसर्ग असूनही यावर्षी आयकर रिटर्न भरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आयटीआर फाईल करण्यासाठी वाढवलेली मुदत हे त्याचे कारण आहे.

झटपट प्रोसेसिंग

आयकर रिटर्न भरण्यासाठी 31 डिसेंबर अंतिम तारीख आहे. यामुळं आयकर विभागानं ‘झटपट प्रोसेसिंग‘ ही सुविधा सुरु केली आहे. तुम्ही जर आतापर्यंत आयकर रिटर्न भरला नसेल तर नव्या सुविधेचा वापर करुन लवकर आयकर रिटर्न भरु शकता. पगारदारांसाठी ही खास सुविधा सुरु करण्यात आली आहे. चार्टर्ड अकाऊंटंट चंद्रकांत मिश्रा यांच्या माहितीनुसार पगारदारासांठी आयकर भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. जे पगारदार आयकर भरणार नाहीत त्यांना 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. आयकर रिटर्न भरताना काही अडचण असल्यास सीएला संपर्क साधू शकता.

संबंधित बातम्या:

इन्कम टॅक्स भरायची डोकेदुखी?, काळजी करु नका, SBI अशी करेल तुमची मदत!

कोरोना काळातील आरोग्य तपासणीवरील खर्चावर Income Tax ची सूट, कसे? जाणून घ्या…

Income Tax Return भरण्यासाठी शेवटचे पाच दिवस, आयकर विभागाची ‘झटपट प्रोसेसिंग’ सुविधा

(Income Tax Return verification is must after filing )

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.