Income Tax Rule | टॅक्स तर नाहीच नाही, पण व्याजामुळे कमाईच कमाई, ही गुंतवणूक कर पात्र नाही
Income Tax Free Investment : जर कमाई करपात्र असेल तर तुम्हाला आयकर भरावाच लागतो. परंतू, इतर अनेक प्रकारची अशी कमाई आहे की जी करपात्र नाही आणि त्यावर व्याज ही मिळते.
Income Tax News : कर भरण्यासाठी मूल्यांकन वर्ष (assessment year) 2022-23 साठी प्राप्तीकर परतावा (Income Tax Return) जमा करण्याची तारखी आता जवळ आली आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात निर्धारीत केलेल्या कमाईपेक्षा अधिकच्या उत्पन्नावर नागरिकांना कर जमा करावा लागतो. त्यांना प्राप्तीकर परतावा (ITR) द्यावा लागतो. जर तुम्ही ही सरकारने निर्धारीत केलेल्या करपात्र उत्पन्नाच्या परीघात येत असाल तर तुम्ही कर चुकवेगिरी करु शकत नाहीत. तुम्हाला अधिकच्या उत्पन्नावर कर जमा करावा लागतो. कर भरणे राष्ट्रीय कर्तव्य समजल्या जाते आणि अनेक नागरिक प्रामाणिकपणे कर ही भरतात. तसेच कर भरताना तुम्हाला गुंतवणुकीच्या (Investment) आधारावर सवलत, सूट ही देण्यात येते. हे एक प्रकारे कर भरण्यासाठीचे प्रोत्साहन असते. एवढंच नाही तर करदात्यांना त्यांच्या अनेक प्राप्त उत्पन्नावर कर जमा करण्याची गरज नसते (Tax Exemption). तर अशाच कमाईचं साधन असणा-या पण करपात्र नसलेल्या उत्पन्नाविषयी आपण माहिती घेऊयात.
कृषी उत्पन्न
देशातील कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी कृषी उत्पन्नावर सरकार कुठलाही कर आकारत नाही. हे उत्पन्न कराच्या परीघात येत नाही. पण शेतकरी कृषी उत्पन्ना व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्त्रोतापासून उत्पन्न घेत असेल तर ते उत्पन्न मात्र करपात्र ठरते. त्यामुळे शेती व्यतिरिक्त इतर कोणतेही उत्पन्न करपात्र ठरते आणि त्यावर कर जमा करावा लागतो.
दीर्घ कालीन उत्पन्न
आर्थिक वर्षात इक्विटी शेअर (Equity Share) आणि इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड्सच्या (Equity oriented Mutual Funds) विक्रीवरील उत्पन्नावर ही कर लागत नाही. हे उत्पन्न कराच्या परीघात येत नाही. जर गुंतवणूकदार 1 ते 3 वर्षांसाठी एखाद्या शेअर वा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणार असेल आणि त्याला त्यातून फायदा, नफा मिळाला असेल तर असे उत्पन्न दीर्घ कालीन लाभात (Long Term Income) येते.
भविष्य निर्वाह निधी
भविष्य निर्वाह निधीत (Provident Fund) पगारदार व्यक्तीची रक्कम जमा होत असते. या जमा रक्कमेवर पगारदार व्यक्तीला व्याज ही मिळते. तसेच ही रक्कम काढताना कुठलाही कर द्यावा लागत नाही. परंतू, त्यासाठी काही अटी व शर्ती आहेत. तुम्ही 5 वर्षांच्या आत पीएफ मधील रक्कम काढाल तर तुमचे उत्पन्न करपात्र ठरते आणि त्यावर कर आकरल्या जातो. परंतू 5 वर्षानंतर रक्कम काढणे गरजेचे असेल तर त्यावर कर लागत नाही.
Gratuity उत्पन्न कर परीघाबाहेर
एखाद्या कंपनीसोबत दीर्घकालीन सेवा बजावल्यास कर्मचाऱ्याला एक बक्षिस मिळते. या बक्षिसीला ग्रॅज्युईटी म्हणतात. सध्याच्या नियमानुसार, संपूर्ण करियरदरम्यान ग्रॅज्युईटीपासून तुम्हची 20 लाखांची कमाई ही करपात्र नाही. पण त्यापुढील उत्पन्न करपात्र आहे. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारी ग्रॅज्युईटी ही संपूर्णपणे कर मुक्त आहे.