Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Income Tax : कर वाचवण्यासाठी हा जोरदार फंडा, बचत तर होईलच, पण मिळेल मोठा परतावा

Income Tax : कर वाचवण्यासाठी तुम्हाला या योजना मदत करु शकतात.

Income Tax : कर वाचवण्यासाठी हा जोरदार फंडा, बचत तर होईलच, पण मिळेल मोठा परतावा
Follow us
| Updated on: Jan 20, 2023 | 6:08 PM

नवी दिल्ली : तुम्ही पगारदार असाल तर तुम्हाला कर वाचविण्यासाठी (Income Tax Saving) अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कर बचतीसह तुम्हाला मोठा परतावाही मिळवता येईल. तुमचे वेतन कर पात्र ठरले तर तुम्हाला त्यावर कर द्यावा लागतो. पण काही योजनांमध्ये (Scheme) गुंतवणूक केल्यास कर तो वाचविता येतोच पण चांगला परतावा मिळत असल्याने गाठीशी मोठी रक्कमही येते. त्यामुळे कर बचतीसाठी पर्याय शोधत असाल तर या योजना तुमच्या मदतीला येतील. 31 मार्च पर्यंत या योजनेत गुंतवणूक करा. त्यामुळे आयटीआर (ITR) भरताना तुम्हाला डिडक्शनसाठी (Deduction) दावा करता येतो.

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीममध्ये (ELSS) तुमची बचत होते. कर वाचेल आणि त्यावर जोरदार परतावाही मिळेल. या म्युच्युअल फंडमध्ये तीनही फायदे होतील. यामध्ये तुम्हाला प्राप्तिकर कायदा कलम 80सी अंतर्गत 1.5 लाख अंतर्गत कर सवलत मिळते.

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूकदाराला 100 रुपयांची एसआयपी (SIP) सुरु करता येते. तर अधिकत्तम रक्कमही गुंतवविता येते. या योजनेत सरासरी 10 ते 12 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळतो. म्युच्युअल फंडात दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास अधिक फायदा होतो.

हे सुद्धा वाचा

पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF) ही कर बचतीसाठी सर्वात लोकप्रिय योजना आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही चांगली योजना आहे. योजनेत प्राप्तिकर कायदा कलम 80सी अंतर्गत 1.5 लाख अंतर्गत कर सवलत मिळते. बचत तर होतेच, त्यावर चांगला परतावा ही मिळतो.

राष्ट्रीय निवृत्ती योजना (NPS) कर बचत योजना आहे. प्राप्तिकर कायदा कलम 80सी अंतर्गत 2 लाख अंतर्गत कर सवलत मिळते. तर कलम सीसीडी (1) अंतर्गत 1.5 लाख रुपये आणि सीसीडी (1बी) अंतर्गत अतिरिक्त 50,000 रुपयांची कर सवलत मिळते. ही योजना चांगली आहे.

प्रोव्हिडंट फंडातील (PF) गुंतवणुकीवर कर सवलत मागता येते. निवृत्तीनंतर रक्कम मिळावी यासाठी ही चांगली योजना आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत (EPF) योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना कलम 80 सी अंतर्गत कर सवलत मिळते. गुंतवणूकदारांन फायदा होतो.

आरोग्य विमा योजनेत (Insurance Policy) गुंतवणूक करणाऱ्यांनाही कर सवलत मिळते. प्राप्तिकर कायदा कलम 80सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत तर सवलत मिळतेच पण याशिवाय त्यांना 25,000 रुपयांची अतिरिक्त सवलतही देण्यात येते.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.