Income Tax website : इनकम टॅक्सची वेबसाईट क्रॅश, पॅनला आधारशी लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस

आर्थिक वर्ष 2019-20 किंवा मूल्यांकन वर्ष 2020-21 ते विलंबित इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत आज म्हणजे 31 मार्च रोजी समाप्त होत आहे. तसेच पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची शेवटची तारीखही 31 मार्च आहे. (Income tax website crash, last day to link PAN to Aadhaar)

Income Tax website : इनकम टॅक्सची वेबसाईट क्रॅश, पॅनला आधारशी लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 7:25 PM

नवी दिल्ली : अधिक लोड आल्यामुळे बुधवारी इनकम टॅक्सची वेबसाईट क्रॅश झाली आहे. आर्थिक वर्ष 2020-21 आर्थिक वर्षाचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बरीच आर्थिक कामे पूर्ण करण्याचा शेवटचा दिवस आहे. हेच कारण आहे की वापरकर्त्यांच्या तांत्रिक दबावामुळे वेबसाईट क्रॅश झाली आहे. आर्थिक वर्ष 2019-20 किंवा मूल्यांकन वर्ष 2020-21 ते विलंबित इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत आज म्हणजे 31 मार्च रोजी समाप्त होत आहे. तसेच पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची शेवटची तारीखही 31 मार्च आहे. (Income tax website crash, last day to link PAN to Aadhaar)

मुदतवाढ देण्याची मागणी

आयकर विभागाची वेबसाईट क्रॅश झाल्यामुळे लोक फार त्रस्त झाले आहेत. याबद्दल सोशल मीडियावर ते पोस्ट करत आहेत. सर्वात आधी बुधवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास आयकर विभागाची साईट क्रॅश झाली, त्यानंतर ती पूर्ववत केली गेली. परंतु त्यानंतरही वेबसाईट वारंवार क्रॅश होत आहे. आता लोक सोशल मीडियावर आयकर विभागाकडे 31 मार्च रोजी होणारी अंतिम मुदत वाढविण्याची मागणी लोक करीत आहेत.

अंतिम मुदतीपर्यंत टॅक्स भरला नाही तर होणार कारवाई

आपण या अंतिम मुदतीपर्यंत इनकम टॅक्स रिटर्न भरु शकला नाहीत तर आपण चालू आर्थिक वर्षात झालेले नुकसान पुढील वर्षात कॅरी फॉरवर्ड करु शकणार नाही. इतकेच नव्हे तर, जर तुमची कर देयता मर्यादेपेक्षा जास्त असेल आणि 31 मार्चच्या अंतिम मुदतीपर्यंत आपण दंडाच्या रकमेसह इनकम टॅक्स रिटर्न भरला नाही, तर आयकर विभाग आपल्याविरूद्ध कठोर कारवाई करू शकेल. उल्लेखनीय आहे की, जे लोक आयकर विभागाने निश्चित केलेल्या अंतिम मुदतीपर्यंत कोणत्याही कारणास्तव इनकम टॅक्स रिटर्न भरु शकणार नाही, त्यांना विलंब शुल्क भरावे लागेल. आपण इनकम टॅक्स भरण्यासाठी किती उशीर लावता आणि आपले उत्पन्न किती आहे यावर हे विलंब शुल्क अवलंबून आहे.

आयटीआर दाखल करण्यासाठी हे कागदपत्र आवश्यक

आयटीआर दाखल करण्यासाठी तुमचे पॅनकार्ड, आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, गुंतवणुकीचा तपशील व त्याचा दाखला / प्रमाणपत्र, फॉर्म -16, फॉर्म -26 AS आदि कागदपत्रे जवळ ठेवावी लागतील. आयटीआर दाखल करताना ही सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत. (Income tax website crash, last day to link PAN to Aadhaar)

इतर बातम्या

New Song : ‘लंडनचा राजा… इटलीची राणी…’, तुम्हाला मिळणार नव्या गाण्याची मेजवाणी

मुलाला संपत्ती तर मुलीला प्रियकरासोबत लग्न, विरोध करणाऱ्या बापासोबत भयानक कृत्य !

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.