एफडीच्या व्याज दरात बँकांकडून घसघशीत वाढ; ग्राहकांना आता मिळतोय फ्लोटिंग एफडीचा पर्याय

महागाईवर नियंत्रण ठेवण्याच्या कसरतीत आरबीआयनं व्याज दरामध्ये मे महिन्यापासून तीन वेळा वाढ केली आहे. अजूनही महागाई कमी झाली नसल्यामुळे व्याज दर आणखी वाढणार आहेत. त्यामुळे सध्या तरी एफडीमधील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.

एफडीच्या व्याज दरात बँकांकडून घसघशीत वाढ; ग्राहकांना आता मिळतोय फ्लोटिंग एफडीचा पर्याय
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 3:16 PM

कोल्हापूरच्या शिवाजी पवार यांनी नुकताच पाच लाखांचा शेतमाल विकला आहे. त्यांना पीक विक्रीमधून मिळालेले पैसे (Money) एफडी (FD) म्हणजेच मुदत ठेवीमध्ये गुंतवायचे (investment) आहेत. शिवाजी सुशिक्षित आहेत पण पैसे किती दिवसांसाठी गुंतवावे हे त्यांना समजत नाहीये. तसेच ते बँकेत गेल्यावर मॅनेजरने फिक्स रेटमध्ये गुंतवणूक करायची आहे की फ्लोटिंगमध्ये हे देखील विचारले. त्यामुळे ते अजूनच गोंधळात पडले. तुम्ही देखील अशाच गोंधळामुळे चिंताग्रस्त असाल तर आज आम्ही तुम्हाला तुमच्या मेहनतीच्या कमाईवर कसा चांगला परतावा मिळू शकतो याची माहिती देणार आहोत.

व्याज दर वाढीचा फायदा

महागाईवर नियंत्रण ठेवण्याच्या कसरतीत आरबीआयनं व्याज दरामध्ये मे महिन्यापासून तीन वेळा वाढ केली आहे. अजूनही महागाई कमी झाली नसल्यामुळे व्याज दर आणखी वाढणार आहेत, असं जाणकारांचे म्हणणं आहे. आरबीआयनं व्याज दरात वाढ केल्यापासून बँकांमध्ये मुदत ठेव योजनेचे व्याजदर वाढवण्याची स्पर्धा सुरू झालीये. कर्जाच्या मागणीत झालेल्या वाढीमुळे FD चे दर अजून वाढण्याची शक्यता आहे. या सर्व कारणांमुळे FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. परंतु शिवाजीसारख्या बहुतांश लोकांना मात्र एफडीमध्ये गुंतवणुकीची रणनिती कशी तयार करावी याबद्दल संभ्रम आहे.

कर्जाची मागणी वाढली

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर कर्जाची मागणी वाढलीये. सध्या देशभरात सणवार सुरू आहेत हे आता वर्ष संपेपर्यंत सुरूच राहणार. सणवारामुळे कर्जाची मागणी आता वाढू शकते. साहजिकच बँका बचतीच्या दरांमध्ये वाढ करू शकतात. त्यामुळे सध्या एफडीमध्ये गुंतवणुकीसाठी योग्य वेळ असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

फ्लोटिंग एफडी म्हणजे काय?

सध्या व्याजदरांमधील वाढ ही कायम राहणार आहे. यामुळेच गुंतवणूकदार दीर्घकालावधीसाठी एफडीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी घाबरत आहेत. ग्राहकांच्या मनातील ही शंका दूर करण्यासाठी बँकांनी फ्लोटिंग एफडीचा नवा पर्याय सुरू केलाय. या योजनेत गुंतवणुकीवर परतावा रेपो रेटनुसार मिळणार आहे. उदाहरणार्थ अॅक्सिस बँक फ्लोटिंग रेट एफडीवर रेपोमध्ये 1.6 टक्के जोडून व्याज देत आहे. रेपोशी निगडीत FD ऑटो आणि होम लोन सारखी काम करते. रेपो रेट वाढले तर FD चा रिटर्न वाढणार. यासाठी गुंतवणूकदारांना कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता करावी लागत नाही. जर रेपो रेट कमी झाला तर FD चा परतावा आपोआप कमी होतो.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.