Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Income tax : प्राप्तिकर परताव्याच्या संख्येत मोठी वाढ; गेल्या आर्थिक वर्षात 14 लाख कोटींपेक्षा अधिक वसुली

2020- 21 या आर्थिक वर्षात प्राप्तिकर परताव्याची संख्या 6.9 कोटी एवढी होती. तर त्यामध्ये वाढ होऊन, आर्थिक वर्ष 2021-2022 मध्ये ती 7.14 कोटींवर पोहोचली आहे.

Income tax : प्राप्तिकर परताव्याच्या संख्येत मोठी वाढ; गेल्या आर्थिक वर्षात 14 लाख कोटींपेक्षा अधिक वसुली
आयकर विभागImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 6:55 AM

नवी दिल्ली : आयकर (Income tax) भरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आर्थिक वर्ष 2020- 21 च्या तुलेनेत मागील आर्थिक वर्ष 2021-2022 मध्ये करदात्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. याबाबत केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या (CBDT)अध्यक्षा संगीता सिंह (Sangeeta Singh) यांनी माहिती दिली. 2020- 21 या आर्थिक वर्षात प्राप्तिकर परताव्याची संख्या 6.9 कोटी एवढी होती. तर त्यामध्ये वाढ होऊन, आर्थिक वर्ष 2021-2022 मध्ये ती 7.14 कोटींवर पोहोचल्याचे संगीता सिंह यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की करदात्यांसोबतच सुधारित रिटर्न भरणाऱ्यांची संख्या देखील वाढल्याने कर वसुलीत वाढ झाली आहे. सामान्यपणे जेव्हा देशाचा आर्थिक विकास दर हा वाढत असतो तेव्हाच करदात्यांच्या संख्येत वाढ होते. आर्थिक घडामोडींना चालना मिळाल्यास खरेदी, विक्रीचे व्यवहार वाढतात आणि यातून करसंकलन देखील वाढते असेही यावेळी संगिता सिंह यांनी सांगितले.

डिजिटल इंडिया मोहिमेचा प्रभाव

पुढे बोलताना संगिता सिंह यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या डिजिटल इंडिया मोहिमेचा प्रभाव दिसून येत आहे. कोरोना काळात अनेक लोकांनी डिजिटल पद्धतीनेच इनकम टॅक्स भरला. केंद्र सरकारच्या वतीने लोकांना कर भरण्यासाठी प्रोहत्साहित केले जात आहे. याचा परिणाम म्हणजे 2020- 21 या आर्थिक वर्षात तब्बल 14 लाख कोटींपेक्षा अधिक कराची वसुली झाली. 2020 च्या तुलनेत हे प्रमाण खूप चांगले आहे. देशासाठी ही चांगली गोष्ट आहे की नागरिक स्वत:हून कर भरण्यासाठी पुढे येत आहेत.

हे सुद्धा वाचा

अपडेट रिटर्न्सची सुविधा

याबाबत बोलताना संगिता सिंह यांनी सांगितले की, सध्या देशात बऱ्यापैकी सर्व आर्थिक व्यवहार हे डिजिट माध्यमातून होत आहेत. त्यामुळे करचोरीला मोठ्याप्रमाणात आळा बसला आहे. तसेच केंद्र सरकारच्या वतीने नागरिकांसाठी अपडेट रिटर्न्स सारखी सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. समजा तुम्ही आयकर रिटर्न्स भरला असेल, मात्र आयकर विभागाला काही अतिरिक्त उत्पन्नाचे स्त्रोत माहीत झाल्यास तुम्ही त्याला अपडेट रिटर्न्सच्या माध्यमातून कव्हर करू शकता असेही सिंह यावेळी म्हणाल्या. अपडेट रिटर्न्सच्या सुविधेमुळे नागरिकांना कर भरणे अधिक सोपे झाले आहे. केंद्र सरकार नागरिकांना आयकर भरण्यासाठी प्रोत्साहित करत असल्याचे पहायला मिळत आहे. करदाते देखील टॅक्स भरून केंद्र सरकारच्या आवाहानाला प्रतिसाद देत आहेत.

'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.