Gold Silver Rates : सोने महाग, चांदीत घसरण, आजचा भाव काय?

Gold Silver Rates : सोन्याच्या किंमतीत वाढ झाली. आज खरेदीला बाहेर पडला तर इतक्या रुपयांची बसेल खिशाला झळ

Gold Silver Rates : सोने महाग, चांदीत घसरण, आजचा भाव काय?
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Jan 20, 2023 | 4:39 PM

नवी दिल्ली : भारतीय सराफा बाजारात (Sarafa Market) आज सोने खरेदीसाठी जाणार असाल तर खिशाला झळ बसू शकते. 20 जानेवारी 2023 रोजी सोने वधारले तर चांदीत घसरण दिसून आली. सोन्याची किंमत (Gold Price) प्रति 10 ग्रॅम 56 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. तर चांदीचा भाव (Silver Price) 68 हजार रुपये प्रति किलोहून अधिक आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,990 रुपये आहे. तर 999 शुद्धतेची चांदी 68,509 रुपये किलो आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (Indian Bullion And Jewellers Association) दराविषयी माहिती दिली. त्यानुसार, 24 कॅरेट शुद्ध सोने 56,670 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, तो आज सकाळी 56,990 रुपयांवर आला. सोन्यात जवळपास 320 रुपयांची वाढ झाली. शुद्धतेच्या आधारावर सोने आणि चांदी हे दोन्ही धातू महागले.

ibjarates.com या अधिकृत संकेतस्थळानुसार, आज सकाळी 995 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा भाव वधारला. हा दर 56,762 रुपयांवर पोहचला. तर 916 शुद्ध सोने आज 52,203 रुपयांवर पोहचले. शुद्ध सोन्यात आज तीनशे रुपयांपर्यंत वाढ दिसून आली. तर चांदीची किंमत घसरली.

हे सुद्धा वाचा

750 शुद्ध सोन्याच्या दर वाढले. सोने 42,743 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आले. 585 शुद्ध सोने आजही महागले. दहा ग्रॅम सोन्याची किंमत 33,339 रुपयांवर पोहचली. तर 999 शुद्ध एक किलो चांदीची किंमत 68,509 रुपये होती.  दोन दिवसांपासून चांदीत सतत घसरण होत आहे.

ऐन लग्नसराईतच सोन्याच्या किंमतींनी भरारी घेतल्याने अर्थातच सर्वच जण चिंतेत आहे. पण सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानण्यात येत असल्याने अनेकांनी सोने खरेदीला प्राधान्य दिले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सप्टेंबर 2022 मध्ये सोने उच्चांकी पातळीवर होते, त्यापेक्षा ते 5-6 टक्के कमी व्यापार करत आहे.

ibja केंद्र सरकारने घोषीत केलेल्या सुट्यांच्या दिवशी, शनिवार आणि रविवारी दर जाहीर करत नाही. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या किरकोळ भाव जाणून घेण्यासाठी ग्राहकांना 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. याशिवाय एसएमएस करुनही किंमती माहिती करुन घेता येईल.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने बेस इंपोर्ट प्राईसमध्ये (Base Import Price) वाढ केली आहे. तर चांदीवरील बेस इंपोर्ट प्राईस घटवली. त्याआधारे सोने-चांदी आयात करणाऱ्या मोठ्या व्यापाऱ्यांवर कर आकारण्यात येणार आहे.

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो.

वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, काळजीवाहू CM म्हणून पाहणार कारभार
शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, काळजीवाहू CM म्हणून पाहणार कारभार.
सत्तास्थापनेपूर्वी शिंदेंचं मोठं ट्विट, 'शिवसैनिकांनी एकत्र येऊ नये..'
सत्तास्थापनेपूर्वी शिंदेंचं मोठं ट्विट, 'शिवसैनिकांनी एकत्र येऊ नये..'.
नवा CM कोण? फडणवीसच मुख्यमंत्री होणार, हायकमांडचा ग्रीन सिग्नल?
नवा CM कोण? फडणवीसच मुख्यमंत्री होणार, हायकमांडचा ग्रीन सिग्नल?.
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.