ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. ओलाने आपल्या 1,441 ई-स्कूटर्स (E-scooters) बाजारातून वापस मागवल्या आहेत. मिळत असलेल्या माहितीनुसार ओलाच्या ई-स्कूटर्सला वारंवार आग (Fire) लागण्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर कंपनीने आपल्या स्कूटर्स वापस बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बोलताना कंपनीच्या वतीने सांगण्यात आले की, पुण्यात 26 मार्च रोजी ओला ई- स्कूटर्सला आग लागली होती. या घटनेची चौकशी सुरू आहे. प्राथमीक चैकशीमध्ये असे आढळून आले आहे की, इतर स्कूटरला ज्या पद्धतीने आग लागली होती, त्या प्रकारची ही घटना नसून, ही एक वेगळी घटना आहे. भविष्यात पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी कंपनीकडून पुन्हा एकदा ई-स्कूटरची तपासणी करण्यात येणार आहे. आमचे अभियंते या स्कूटरची पुन्हा चाचणी घेणार आहेत. त्यामुळे कंपनीने आपल्या ई-स्कूटर्स पुन्हा मागे बोलवण्याचा निर्णय घेतला आहे.
ओलाच्या ईलेक्ट्रिक स्कुटरची निर्मिती भारतामध्येच होते, मात्र त्यासाठी जी लिथियमची बॅटरी वापरण्यात येते, तीची निर्मिती चिनमध्ये होते. चिनकडून जरी बॅटऱ्यांची पूर्ण चाचणी होऊनच भारतात येत असल्या, तरी देखील या बॅटऱ्या चार्जिंग करताना खूप गरम होतात. बँटरी गरम झाल्याने त्या पेट घेण्याची शक्यता अधिक असते. तसेच गाडीचा वेग अधिक ठेवल्यास देखील या बॅटऱ्या गरम होतात. बॅटरी जादा गरम झाल्यास स्कूटर पेट घेण्याची शक्यता अधिक वाढते.
तज्ज्ञानी देखील ईलेक्ट्रिक स्कूटर्सला आग लागण्याचे महत्त्वाचे कारण हे चिनमधून भारतात येणाऱ्या बॅटऱ्याच असल्याचे म्हटले आहे. चिनमध्ये लिथियम बॅटऱ्यांची मोठ्याप्रमाणात निर्मिती करण्यात येते. मात्र यातील अनेक बॅटऱ्या या खराब असतात. किंवा प्रवासामध्ये डॅमेज होण्याची शक्यता देखील असते. या बॅटऱ्या फास्ट चार्ज होतात. मात्र चार्ज होताना त्या गरम देखील होतात. ईलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी चार्ज केल्यानंतर लगेच त्या स्कूटरवरून प्रवास केला तर अशा परिस्थितीमध्ये वाहनाला आग लागण्याची शक्यता अधिक असते, असे ऑटो एक्सपर्ट टूटू धवन यांनी म्हटले आहे. केवळ इलेक्ट्रिक वाहनांमध्येच नव्हे तर पेट्रोल, आणि डिझेलच्या वाहनांना देखील आग लागण्याच्या घटनेमध्ये दहा टक्के घटना या बॅटरींमुळे होतात.
Today Petrol Diesel price : सलग 19 दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर, कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ
Reliance : रिलायन्स-फ्यूचर डील रद्द, 24 हजार कोटींचा व्यवहार बासनात; बँकाचा विरोध