Gautam Adani : गौतम अदानी यांना पुन्हा पाठबळ! अमेरिकेतील या कंपन्यांची मोठी गुंतवणूक
Gautam Adani : हिंडनबर्गच्या रिपोर्टचा शेअर बाजारात परिणाम दिसला असला तरी अदानी ग्रुपवर त्याचा परिणाम झालेला नाही. जून महिन्यात अमेरिकेन फर्मने अदानी समूहात 4242 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
नवी दिल्ली | 17 ऑगस्ट 2023 : अदानी समूहासाठी (Adani Group) जोरदार बातमी आहे. हिंडनबर्ग रिपोर्टनंतर अदानी समूहावर गुंतवणूकदारांचा भरवसा वाढत आहे. त्यामुळे उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या कंपन्यांमधील गुंतवणूक वाढली आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतील गुंतवणूक फर्म जीक्युजी पार्टनर्सने अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये बंपर गुंतवणूक केली. अमेरिकन फर्म GQG ने एकाच फटक्यात अदानी समूहाच्या अदानी पॉवरमध्ये 3.9 टक्क्यांची हिस्सेदारी खरेदी केली. GQG पार्टनर्स इमर्जिंग मार्केट फंड आणि गोल्डमॅन सॅश GQG पार्टनर्स इंटरनॅशनल यांनी अंदानी पॉवर कंपनीत 4242 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
या कंपन्यांचा विक्रीचा सपाटा
एकीकडे अदानी पॉवरमध्ये खरेदी सुरु आहे. पण या कंपन्यांनी वाटा विक्री केला आहे. वर्ल्डवाईड इमर्जिंग मार्केट होल्डिंग कंपनीने 1.2 टक्के वाटा विक्री केला. प्रमोटर एफ्रो एशिया ट्रेड अँड इन्व्हेसमेंटने त्यांचा पूर्ण हिस्सा विक्री केला. प्रमोटर्सनी अदानी पॉवरमधील जवळपास 8.1 टक्के हिस्सेदारी विक्री केली. जून 2023 पर्यंत वर्ल्डवाईड इमर्जिंग मार्केट होल्डिंग कंपनीचा 5%हिस्सा होता. तर एफ्रो एशिया ट्रेड अँड इन्व्हेसमेंटचा 6.88% वाटा होता.
GQG ची धडाधड गुंतवणूक
अमेरिकेतील शॉटर्ट सेलर कंपनी हिंडनबर्गने यावर्षी जानेवारीमध्ये अदानी समूहावार आरोप केले होते. त्यानंतर अदानी समूहात विक्री सत्र सुरु झाले होते. त्याचा मोठा फटका समूहाला बसला. त्याचा फायदा GQG पार्टनर्सने घेतला. या फर्मने अदानी समूहात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. मार्च महिन्यात या फर्मने 15,000 कोटी रुपयांहून अधिकची गुंतवणूक केली. या फर्मने अदानी एंटरप्रायजेससह अदानी समूहाच्या चार कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. तेव्हापासून हा वाटा कमी न होता वाढत आहे.
इतका वाढवला शेअर
जून महिन्यात GQG ने अदानी एंटरप्रायजेज आणि अदानी ग्रीन एनर्जीमध्ये 8,265 कोटी रुपयांची अतिरिक्त खरेदी केली होती. जून 2023 पर्यंत GQG ने अडानी एंटरप्राइजेजमध्ये 2.67% आणि अदानी ग्रीन एनर्जीमध्ये 3.5% हिस्सेदारी होती. जून महिन्यात या फर्मने अदानी ट्रांसमिशनमध्ये 1,676 कोटी रुपये गुंतवले होते.
ही सिमेंट कंपनी ताब्यात
आता अदानी समूहाच्या अंबुजा सिमेंटने आणखी एक सिमेंट कंपनी खिशात घातली आहे. या कंपनीने 5,000 कोटी रुपयांची मोठा करार केला. या अधिग्रहणाची माहिती अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. सांघी इंडस्ट्रीजमध्ये अदानी समूहाने मोठा हिस्सा खरेदी केली. सांघी इंडस्ट्रीज (Sanghi Industries) पश्चिम भारतातील मोठी सिमेंट उत्पादक कंपनी आहे.