Adani Group Loan : डोक्यावर उभा कर्जाचा डोंगर! अंबानी, अदानीपासून हे दिग्गज उसनवारीच्या ओझ्याखाली

Adani Group Loan : मोठं-मोठ्या कंपन्यांची कोट्यवधींची उलाढाल पाहून तुम्हाला या कंपन्यांवर कर्ज असेल याची कल्पनाही नसेल. पण या कंपन्यांवरील कर्जाचे आकडे तुम्हाला अचंबित करतील.

Adani Group Loan : डोक्यावर उभा कर्जाचा डोंगर! अंबानी, अदानीपासून हे दिग्गज उसनवारीच्या ओझ्याखाली
Follow us
| Updated on: Apr 05, 2023 | 10:15 AM

नवी दिल्ली : कर्ज (Loan) केवळ तुमच्याच डोक्यावर असे वाटत असेल तर तुमचा हा समज फोल ठरणारा आहे. मो्ठं-मोठ्या कंपन्यांची कोट्यवधींची उलाढाल पाहून तुम्हाला या कंपन्यांवर कर्ज असेल याची कल्पनाही नसेल. पण या कंपन्यांवरील कर्जाचे आकडे तुम्हाला अचंबित करतील. कर्जाच्या ओझ्यामुळे (Debt on Companies) या कंपन्यांना त्यांचे ड्रीम प्रोजेक्टला ब्रेक लावावा लागला आहे. केवळ गौतम अदानीच (Gautam Adani) कर्जबाजारी नाहीत तर टाटा समूह, रिलायन्स समूह, वेदांता ग्रूप, बजाज ग्रूप कर्जाच्या ओझ्याखाली आहे. या दिग्गजांचे हात दगडाखाली आहेत. देशातील दिग्गज समूहावर कोट्यवधींचे कर्ज आहेत. पण रिस्क है तो इश्क है, असे म्हणतात. जोखीम घेतल्याशिवाय स्वप्न साकारही करता येत नाहीत, नाही का?

टाटा समूहावर पण कर्ज मीठ तयार करण्यापासून ते विमान सेवेपर्यंत टाटा समूहाचा पसारा भलामोठा आहे. पण या टाटा समूहावर पण कर्जाचा डोंगर आहे. या समूहाने कर्ज कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. टाटा समूहावर सप्टेंबर 2022 पर्यंत 2.8 लाख रुपयांचं कर्ज होते. तर मार्च 2020 पर्यंत या समूहावर 3.62 लाख कोटींचे कर्ज होते.

रिलायन्सचे गाडे हे कर्जाच्या खड्यात वर्ष 2020 मध्ये रिलायन्स समूहाने स्वतःला कर्ज मुक्त असल्याची घोषणा केली होती. पण या कंपनीचा पसारा फार मोठा आहे. जगभरातील अनेक उद्योगात हा समूह हात आजमावतोय. त्यामुळे समूहावर कर्ज आहे. सप्टेंबर 2022 पर्यंत रिलायन्सवर 3.16 लाख कोटींचे कर्ज होते. त्यातील 2.64 लाख कोटींचे कर्ज एकाच वर्षात वाढले. रिलायन्सकडे 1.43 लाख कोटींचे रोख रक्कम आहे.

हे सुद्धा वाचा

अदानी समूहावर डोंगर हे नवीन वर्ष, 2023 गौतम अदानी आणि त्यांच्या समूहासाठी अत्यंत वाईट ठरले. हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालाने त्यांचे पंख कापल्या गेले. गुंतवणूकदारांनी या समूहातून गुंतवणूक काढण्याचा सपाटा लावला. अद्यापही हा समूह या धक्क्यातून सावरला नाही. अदानी समूहावर 30 सप्टेंबर 2022 पर्यंत 24.1 दशलक्ष डॉलरचे कर्ज असल्याची चर्चा आहे. काही मीडियातील रिपोर्टनुसार हा आकडा 40 दशलक्ष डॉलरच्या घरात आहे.

वेदांता ग्रुप पण कर्जात बुडाला दिग्गज उद्योजक वेदांता ग्रुप पण कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. हा समूह त्यांचे झिंक शेअर्स विक्री करण्याच्या तयारीत आहे. पण त्याला केंद्र सरकारने खोडा घातल्याची चर्चा रंगली आहे. एका अहवालानुसार, या समूहावर 13 दशलक्ष डॉलरच्या घरात कर्ज आहे. पण कर्ज त्यामानाने जास्त नाही. त्यामुळे हा समूह कर्ज मुक्त होऊ शकतो.

आदित्य बिर्ला समूह व्होडाफोन-आयडियाची मालकी असलेला आदित्य बिर्ला ग्रुप पण कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. या समूहावर एकूण 1.9 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. या कर्जातील मोठा हिस्सा हा टेलिकॉम कंपनीचा आहे. देशातील मोठ्या समूहापैकी असलेल्या या ग्रुपला टेलिकॉम सेक्टरमधून फटका बसला आहे.

महिंद्रा समूहपण कर्जबाजारी आनंद महिंद्रा यांचा महिंद्रा ग्रुपपण कर्जबाजारी आहे. या समूहावर पण कर्ज आहे. गेल्या आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत या समूहावर 83,200 कोटी रुपयांचे कर्ज होते.

Non Stop LIVE Update
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.