आज 15 ऑगस्ट रोजी देश 78 वा स्वतंत्र दिन साजरा करत आहे. बाजारातील तज्ज्ञांनी या दिवशी आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काही स्टॉक सांगितले आहेत. हे स्टॉक गुंतवणूकदारांना आर्थिक मुक्ती देतील. तज्ज्ञांच्या मते, हे शेअर पोर्टफोलिओच चमकवणार नाहीत तर आर्थिक चिंता पण दूर करतील. या स्टॉकमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया सह HAL सारख्या शेअरचा समावेश आहे. हे शेअर गुंतवणूकदारांना मालामाल करतील. तज्ज्ञांच्या मते, हे शेअर गुंतवणूकदारांची आर्थिक चिंता दूर करतील. त्यांना आर्थिक बळ देतील.
हे आहेत स्वातंत्र्याचे 10 स्टॉक्स
इकोनॉमिक्स टाईममधील वृत्तानुसार, बाजारातील तज्ज्ञ मनिष चौधरी यांनी आरती ड्रग्स आणि NOCIL खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आरती ड्रग्स 500 आणि NOCIL हा शेअर 289 मध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. आरती ड्रग्सची टार्गेट प्राईस 600 रुपये आहे. तर NOCIL शेअरची टार्गेट प्राईस 350 रुपये आहे.
सरकारी स्टॉक्स पण करतील मालामाल
शेअर बाजारातील तज्ज्ञ राहुल घोष यांनी फेडरल बँक आणि टाटाच्या वोल्टास शेअरची खरेदीचा सल्ला दिला. गुंतवणूकदार फेडरल बँकेचा शेअर 189 रुपयांचा स्टॉप लॉस लावून कमाई करु शकतात. या शेअरची टार्गेट प्राईस
235 रुपये आहे. वोल्टास शेअर 1490 रुपयांचा स्टॉप लॉस लावून कमाई करु शकतात. या शेअरची टार्गेट प्राईस 1700 रुपये आहे.
याशिवाय क्रांती बाथिनी यांनी HAL, L&T, SBI आणि भारत डायनामिक्स खरेदीचा सल्ला दिला आहे. या स्टॉकमध्ये 15-20% कमाईची संधी आहे. तर मास्टर कॅपिटल सर्व्हिसेजने प्लॅटिनियम इंडस्ट्रीजचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकची टार्गेट प्राईस 401 रुपये ठेवण्यात आली आहे. तर याशिवाय सुयोग टेलिमॅटिक्समध्ये पण कमाईची संधी दिसत आहे. या स्टॉकची टार्गेट प्राईस 1857 रुपये आहे.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.