Independence Day Sale : सवलतीत मिळवा हे 107 शेअर, मग आजमावणार का नशीब

Independence Day Sale : स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म आणि दुकानदारांनी मोठी डिस्काऊंट दिली आहे. सवलत दिली आहे. असाच धमाका सध्या शेअर बाजारात सुरु आहे. अनेक स्टॉकवर सध्या घसरणीची मोठी सूट मिळत आहे.

Independence Day Sale : सवलतीत मिळवा हे 107 शेअर, मग आजमावणार का नशीब
Follow us
| Updated on: Aug 15, 2023 | 3:13 PM

नवी दिल्ली | 15 ऑगस्ट 2023 : स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day Sale) अनेक सवलतींचा पाऊस पडत आहे. ऑनलाईन शॉपिंग स्टोअर्सने तर जोरदार डिस्काऊंट दिले आहे. सवलतीचा पाऊस पाडला आहे. अनेक आकर्षक ऑफर्सने ग्राहकांच्या नजरा खिळल्या आहेत. मोठी सवलत दिली आहे. मॉल्सपासून ते किराणा दुकानापर्यंत अनेकांनी सूट जाहीर केली. त्याचा ग्राहकांना मोठा फायदा झाला. सध्या शेअर बाजारात (Share Market) पण मोठी धमाका ऑफर सुरु आहे. अनेक शेअरची सध्या घसरण सुरु आहे. त्यामुळे शेअर स्वस्तात खरेदीची मोठी संधी चालून आली आहे. तुमची आताची गुंतवणूक भविष्यातील मोठ्या परताव्याची हमी पण ठरु शकते. पण ही जोखीम घेण्याचा निर्णय तुमचा तुम्हाला घ्यावा लागेल.

107 शेअर्सचा धमाका

दलाल स्ट्रीटवर अनेक शेअरमध्ये पण खरेदीसाठी मोठी सवलत मिळत आहे. . बीएसई 500 इंडेक्समधील जवळपास 107 शेअर्समध्ये गुंतवणुकीची संधी आहे. हे शेअर गेल्या 52-आठवड्यातील निच्चांकावर आहे. त्यांच्यात जवळपास 20 टक्के घसरण झाली आहे. ते पूर्वीपेक्षा सवलतीत उपलब्ध आहेत. कोणते आहेत हे शेअर?

हे सुद्धा वाचा

अदानी समूह करु शकतो चांदी

अदानी समूहाचे वासे पुन्हा एकदा फिरले आहे. या समूहातील 8 शेअर 52-आठवड्यातील उच्चांकापेक्षा 50 टक्क्यांपर्यंत घसरण दिसून येत आहेर. यामध्ये अदानी ग्रीन एनर्जी, अदानी एनर्जी सोल्यूशन्स आणि अदानी टोटल गॅस यांचा समावेश आहे. या शेअरमध्ये 52-आठवड्यातील सर्वाधिक 62-84 टक्क्यांपर्यंत घसरण दिसून येत आहे.

हा पण गुंतवणुकीचा पर्याय

अदानी विल्मरमध्ये 52-आठवड्यातील उच्चांकापेक्षा 55 टक्के, अदानी पॉवरमध्ये 33 आणि अदानी एंटरप्राईजेसमध्ये 39 टक्क्यांपर्यंत तूट दिसून येत आहे. नायकामध्ये पण घसरणीचे सत्र आहे. तर नायकाचे व्यवस्थापन करणारी कंपनी एफएसएन ई-कॉमर्सचा शेअर त्याच्या 52-आठवड्यातील उच्चांकापेक्षा 38 टक्क्यांनी घसरला आहे.

फार्मा सेक्टरमध्ये घसरण

याशिवाय काही फार्मा कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. बायोकॉन, मेट्रोपोलिस हेल्थकेअर, लॉरस लॅब्स, ग्रँड फार्मा आणि पीरामल फार्माचे शेअर 52-आठवड्यातील उच्चांकापेक्षा 20-50 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. यामधील गुंतवणूक फायदेशीर ठरु शकते. पण त्याअगोदर बाजारातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

सार्वजनिक क्षेत्रातील बँका

सार्वजनिक क्षेत्रातील बँक युको बँकेत 24 टक्के, पंजाब आणि सिंध बँकेत 26 टक्क्यांपर्यंत घसरण दिसून येत आहे. खासगी क्षेत्रातील बंधन बँकेच्या शेअरमध्ये 28 टक्के, यस बँकेच्या शेअरमध्ये 31 टक्के आणि सिटी युनियन बँकेच्या शेअरमध्ये 37 टक्क्यांची घसरण झाली. काही बँकांचे तिमाही निकाल पण चांगले आहेत.

गुंतवणूकदारांनी काय करावे?

गेल्या एका महिन्यात बेंचमार्क सेन्सेक्सने एक टक्क्यांची सुधारणा दिसून आली. तर बीएसीई स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 4 टक्क्यांहून अधिक उसळी दिसून आली. त्यामुळे बाजार आगेकूच करु शकतो, असा अंदाज समोर येत आहे. बाजारातील तज्ज्ञानुसार चार टक्के घौडदौड होत असली तरी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना सतर्क राहणे आवश्यक आहे. बाजाराचा रोख लक्षात न घेताच गुंतवणूक करणे तोट्याचे ठरु शकते.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.