5G spectrum auction | आता देशात 5G चं वारं! आजपासून स्पेक्ट्रमची लिलाव प्रक्रिया, 15 ऑगस्टला डिजिटल वेगवान क्रांती पर्व

India 5G spectrum auction | भारताच्या 76 व्या स्वातंत्र्य दिनी देशात 5G सेवा दणक्यात सुरु होत आहे. आजपासून 5G स्पेक्ट्रमची लिलाव प्रक्रिया सुरु होत आहे. झी बिझनेसने सूत्रांच्या आधारे ही माहिती दिली आहे.

5G spectrum auction | आता देशात 5G चं वारं! आजपासून स्पेक्ट्रमची लिलाव प्रक्रिया, 15 ऑगस्टला डिजिटल वेगवान क्रांती पर्व
5G ची देशात नांदीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 10:48 AM

India 5G spectrum auction | आता लवकरच भारतात 5G चं वेगवान वारं वाहणार आहे. 76 वर्षांच्या स्वातंत्र्याला साक्षी ठेऊन येत्या 15 ऑगस्ट 2022 रोजी पासून देशात 5G चं क्रांती पर्व अवतरेल. तुमचा मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉप, स्मार्ट टिव्ही वरील इंटरनेट (Internet) धुमशान धावेल. मोबाईल्सवर पीडीएफ फाईल्स काही सेंकदात, अख्खा पिक्चर काही सेंकदात येऊन पडेल. कारण आजपासून आजपासून 5G स्पेक्ट्रमची लिलाव प्रक्रिया (auction Process) सुरु होत आहे. मंगळवारपासून देशाच्या विविध भागांमध्ये 5G सेवेची चाचणी सुरू आहे. या लिलाव प्रक्रियेत 4 कंपन्या (Companies) सहभागी होणार आहेत. यामध्ये रिलायन्स, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि अदानी डेटा नेटवर्कचा (Data Network) समावेश आहे. या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून देशात 5G सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. 5G स्पेक्ट्रम (5G spectrum ) च्या लिलावात, कंपन्यांनी 21800 कोटी रुपयांचे अर्नेस्ट मनी जमा केले आहेत. या दरम्यान केवळ 72 GHz स्पेक्ट्रमचा लिलाव होणार आहे.

15 ऑगस्टचा मुहुर्त

या 15 ऑगस्ट रोजी 5G सेवा कोणत्याही एका टप्प्यावर सुरू केली जाऊ शकते. झी बिझनेसने सूत्रांच्या आधारे ही माहिती दिली आहे. 5G स्पेक्ट्रमच्या या लिलावातून सरकारला 80 ते 90 हजार कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्यापर्यंत 5G सेवा देशभर सुरू होण्याची दाट शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

14 ठिकाणी चाचणी सुरू आहे

या पंधरवाड्यात देशातील 14 ठिकाणी 5G सेवेची चाचणी सुरू करण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 5G सेवा 15 ऑगस्टला कोणत्याही क्षणी सुरू होऊ शकते. देशातील 4 प्रमुख दूरसंचार कंपन्यांनी या लिलावात भाग घेतला असून त्यांनी अमानत रक्कमही जमा केली आहे.

कोणी किती EMD केले जमा

रिलायन्स जिओ – 14000 कोटी भारती एअरटेल – 5500 कोटी व्होडाफोन आयडिया – 2200 कोटी अदानी डेटा नेटवर्क्स – 100 कोटी

या फ्रिक्वेन्सी बँडमध्ये लिलाव

ही लिलाव प्रक्रिया 600 MHz, 700 MHz, 800 MHz, 900 MHz, 1800 MHz, 2100 MHz, 2300 MHz, 3300 MHz (मध्यम), 26 GHz (उच्च) फ्रिक्वेन्सी बँडमध्ये होणार आहे. याशिवाय कंपन्यांना स्पेक्ट्रमच्या किंमती 20 समान EMI मध्ये देण्याची सुविधा दिली जाईल. त्याचबरोबर खासगी कॅप्टिव्ह नेटवर्क उभारण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

बोली लावणाऱ्यांमध्ये भारतातील तीनही प्रमुख मोबाइल ऑपरेटर्सचा समावेश आहे. त्यात रिलायन्स जिओ, मार्केट लीडर, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया. चौथा स्पर्धक भारतीय अब्जाधीश गौतम अदानी यांनी अचानक या लिलाव प्रक्रियेत उडी घेतली.

5G स्पेक्ट्रमचे एकूण 72 गिगाहर्ट्ज ब्लॉकवर असतील. लिलाव प्रक्रियेत विजेत्याला 20 वर्षांसाठी हक्क राखून ठेवतील.

एकूण, चार बोलीदारांनी $2.7 अब्ज (218 अब्ज भारतीय रुपये) अनामत रकमेमध्ये ठेवले आहेत, ही कराराची पुष्टी करण्यासाठी आवश्यक असलेली अनिवार्य रक्कम आहे. जमा केलेली अनामत रक्कमेतून कंपनी या प्रक्रियेतून किती स्पेक्ट्रम खरेदी करू इच्छिते याचे संकेत मिळातात.

सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.