Privatization Of Banks | सरकारी बँकांचं खासगीकरण, SBI सह देशातील अनेक बँकांचे कर्मचारी संपावर
केंद्र सरकारने सरकारी बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली होती (Privatization Of Government Banks).
मुंबई : केंद्र सरकारने सरकारी बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली होती (Privatization Of Government Banks). सरकारच्या या निर्णयाविरोधात देशभरातील बँका कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर आहेत. सरकारी बँकांचं खासगीकरण करण्याच्या मुद्द्याला विरोध करण्यासाठी देशातील सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं. आज सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच 15 आणि 16 मार्चला हा संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे आज मुंबईसह अनेक राज्यातील बँका बंद आहेत. त्यामुळे या संपाचा सामान्य माणासाच्या जीवनावर परिणाम होतो आहे (Banks On Strike On 15 And 16 March Against Privatization Of Government Banks).
या संपाचा बँकिंग सुविधांवरही मोठा परिणाम होऊ शकतो. संपामुळे चेक क्लीअरन्स किंवा लोन मंजुरी सारख्या सुविधांना अडचण येऊ शकते. सोमवारी मंगळवारी बँका बंद असल्याने ग्राहकांची मात्र गैरसोय होणार आहे. या संपात महाराष्ट्रातील तब्बल दहा हजाराहून जास्त शाखेतील कर्मचारी सहभागी होणार आहे.
Maharashtra: The United Forum of Bank Union (UFBU), has called a two-day nationwide strike today and tomorrow, against the privatisation of Public Sector Banks and ‘retrograde banking reforms’. Visuals from Mumbai. pic.twitter.com/lmLGJaXNfv
— ANI (@ANI) March 15, 2021
बँकांकडून संपाबाबत ग्राहकांना पूर्वकल्पना
दरम्यान, स्टेट बँकेसह इतर बँकांनी आपल्या ग्राहकांना याबाबत आधीच माहिती दिली होती. कर्मचाऱ्यांचा जर संप होईळ तर त्याचा बँकेच्या कामकाजांवर परिणाम होईल. बँकेच्या प्रत्येक शाखेतील कामकाजावर त्याचा प्रभाव पडेल, असं ग्राहकांना आधीच सूचित करण्यात आलं आहे. तसेच कामकाज सुरळीत चालावे यासाठी योग्य पावलं उचलू, असं आश्वासन बँकांकडून देण्यात आलंय.
10 लाख कर्मचारी संपावर जातील
युनायटेड फोरम ऑफ बँकिंग यूनियनने याबाबत माहिती दिली आहे. या यूनियनमध्ये बँक कर्मचाऱ्यांच्या 9 संघटना सहभागी आहेत. दोन दिवसीय संपात देशभरातील जवळपास 10 लाख कर्मचारी संपावर जातील, असा दावा युनायटेड फोरम ऑफ बँकिंग यूनियनने केला आहे (Privatization Of Government Banks All Banks On Strike On 15 And 16 March).
दोन बँकांचं विलगीकरण होणार
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गेल्या महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर केलं तेव्हा देशातील दोन बँकांचं खासगीकरण केलं जाईल, अशी घोषणा त्यांनी केली होती. देशात सध्या 12 सरकारी बँक आहेत. यापैकी दोन बँकांचं खासगीकरण केलं तर देशात फक्त दहा बँक सरकारी राहतील. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षात 14 सार्वजनिक बँकांचं विलनीकरण करण्यात आलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.
Banks On Strike On 15 And 16 March Against Privatization Of Government Banks
संबंधित बातम्या :
Bank Strike : पुढचे दोन दिवस बँक बंद राहणार, SBI सह देशातील अनेक बँकांच्या कर्मचाऱ्यांचा संप
रोज फक्त 130 रुपयांच्या गुंतवणुकीवर लाखो कमवाल, LIC ची सगळ्यात फायद्याची योजना