India Biggest Economy | ‘लगान’ वसूल! इंग्लंडला धोबीपछाड, जगातील 5 वी मोठी अर्थव्यवस्था

India Biggest Economy | ग्रेट ब्रिटनला आस्मान दाखवत, भारतीय अर्थव्यवस्थनेने जागतिक पातळीवर पाचवे स्थान पटकावले आहे. आर्थिक मोर्चावर भारताने मजबूत दावेदारी ठोकली आहे. भारतीय सांख्यिकीय विभागाच्या आकडेवारीनुसार, जून 2022 मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर 13.5 टक्के आहे.

India Biggest Economy | 'लगान' वसूल! इंग्लंडला धोबीपछाड, जगातील 5 वी मोठी अर्थव्यवस्था
भारतीय अर्थव्यवस्थेची हनुमान उडीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 11:56 AM

India Biggest Economy | अवघ्या पाऊणशे वर्षापूर्वी भारताने (Bharat, India) स्वातंत्र्यावेळी नियतीशी करार केला होता. उज्जवल भविष्याची आशा बांधली होती. कधीच सत्तेचा सूर्य न मावळणाऱ्या द ग्रेट ब्रिटनच्या (Britain) जोखडातून आपण उणे-पुरे पाऊणशे वर्षे पुढे आलो आहोत आणि आता आपण ब्रिटनकडून लगान वसूल केला आहे. दुगना लगान तर भारतीयांनी दिलाच नाही. पण ब्रिटनला धोबीपछाड देत पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था (India Biggest Economy )म्हणून शिक्का उमटवला आहे. ही काही छोटी गोष्ट घडली नाही. हा फार मोठा परिणाम आहे. भूराजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहे. विकसीत राष्ट्रांवर विकसनशील भारताने दिलेली ही मात मोठी घडामोड आहे. आर्थिक मोर्चावर भारताने मजबूत दावेदारी ठोकली आहे. जीडीपी(GDP) आकड्यांवरुन भारताने पहिल्या तिमाहीत आगेकूच केली होती. भारतीय सांख्यिकीय विभागाच्या (NSO)आकडेवारीनुसार, जून 2022 मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर 13.5 टक्के आहे.जगावर राज्य करणाऱ्या इंग्लंडची अर्थव्यवस्था सहाव्या स्थानी घसरली आहे. भारतीय

जीडीपी आधारे आघाडी

जागतिक अर्थव्यवस्थांमधील आघाडीची ही क्रमवारीता अमेरिकन डॉलर आधारे करण्यात येते. याशिवाय आंतरराष्ट्रीय नाणे निधी (IMF) च्या आकड्यांनुसार, जीडीपी(GDP) आकड्यांवरुन भारताने पहिल्या तिमाहीत आगेकूच केली होती. जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये भारताने मजबूत दावेदारी ठोकली.

ब्रिटन पिछाडीवर का?

आर्थिक मोर्च्यावर ब्रिटनची माघार कशामुळे झाली? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर सध्या तिथली राजकीय अस्थिरतेने त्यांना सर्वच आघाड्यावर झटका दिला आहे. नवीन पंतप्रधान निवड होईपर्यंत तिथे अस्थिरता आहे. नवीन सरकारपुढे महागाई आणि सुस्त अर्थव्यवस्थेचे मोठे आव्हान राहणार आहे. दुसरीकडे काही तज्ज्ञांचा विश्वास आहे की, भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर येत्या काही दिवसात 7 टक्क्यांचा टप्पाही पार करेल.

हे सुद्धा वाचा

अडथळ्यांविरोधात मजबूत दावेदारी

भारती आणि इंग्लंडची अर्थव्यवस्था डॉलरच्या आधारे समजून घेतल्यास, जागतिक नाणेनिधीच्या आकड्यांनी त्यावर प्रकाश टाकला आहे. मार्च महिन्यापर्यंतच्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था 854.7 अरब डॉलर होती. ब्रिटेनची अर्थव्यवस्था 816 अरब डॉलर होती. आकड्यांनुसार, जगभरातील अर्थव्यवस्था सुस्तावल्या आहेत. त्यांच्यावर मंदीचे सावट आहे. सर्व संकटांचे आव्हान असले तरी भारतीय अर्थव्यवस्थेने मजबूत दावेदारी ठोकली आहे.

जून तिमाहीचे आकडे

या आठवड्यात जून महिन्याच्या तिमाहीचे आकडे समोर आले आहेत. त्यात जून 2022 तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेने 13.5 टक्क्यांची चमकदार कामगिरी बजावली आहे. अनेक संस्थांचा अंदाजही आर्थिक वृद्धीदर चांगला राहणार असल्याचे सांगत आहेत. जूनच्या तिमाहीत अमेरिकन अर्थव्यवस्थेत वृद्धी दरात 0.6 टक्क्याची घसरण झाली आहे. परिणामी अर्थव्यवस्थेचा आकार 1.6 टक्क्यांनी कमी झाला आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.