तीन कट्टर विरोधक जगावर राज्य करणार; गोऱ्या साहेबांसह जपानची हवा निघणार

India-China-Pakistan : जगाच्या अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलून जाईल, असे आता तुम्हाला कोणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार आहे. पाकिस्तान सध्या भीकेला लागलेला आहे. पण पाकिस्तान भविष्यात टॉप-10 अर्थव्यवस्थांपैकी एक असेल यावर तर तुम्ही बिलकूल विश्वास ठेवणार नाहीत...

तीन कट्टर विरोधक जगावर राज्य करणार; गोऱ्या साहेबांसह जपानची हवा निघणार
चीन, भारत, पाकिस्तान करणार जगावर राज्य
Follow us
| Updated on: Apr 13, 2024 | 11:47 AM

गेल्या काही महिन्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ष 2047 पर्यंत भारत विकसीत राष्ट्र होईल, असा दावा करत आहेत. अर्थात त्यासाठी अजून बऱ्याच वर्षांचा पल्ला गाठायचा आहे. येत्या दोन ते तीन वर्षांत भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते, हे लक्ष्य भारत निश्चित कालावधीत गाठेल. पण पाकिस्तान टॉप-10 देशात येईल, हे भाकित अनेकांच्या काही पचनी पडताना दिसत नाही. चीनची अर्थव्यवस्था सध्या नाजूक अवस्थेतून जात असली तरी ती अनेकांना मात देणार असल्याचे भाकित आहे. म्हणजे भारतासह त्याचे दोन हाडवैरी जगावर राज्य करतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

चीन होईल दादा

हे सुद्धा वाचा

जगातील सर्वात मोठी गुंतवणूक फर्म गोल्डमॅन सॅशने हा अंदाज वर्तविला आहे. या संस्थेनुसार, येत्या काही वर्षात जगाचा आर्थिक नकाशाच नाही तर नेतृ्त्व पण बदलणार आहे. सध्या अमेरिका हा जगाचा दादा आहे. पण काही वर्षातच त्याचा हा मुकूट चीन खेचून घेणार आहे. चीन जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येणार आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारत असेल तर टॉप-10 अर्थव्यवस्थेत पाकिस्तान पण असणार आहे.

जपान-युके यादीतून बाहेर

या फर्मनुसार, जगावर राज्य करणारा इंग्लंड आणि आशियातील दुसरी सर्वात शक्तीशाली अर्थव्यवस्था असलेला जपान टॉप-10 यादीतून बाहेर फेकले जाईल. तर या यादीत युरोपमधील केवळ जर्मनी हा देश असेल. इतरही अनेक अंदाज या फर्मने नोंदवले आहेत.

50 वर्षांनी काय असेल स्थिती

  • गोल्डमॅन शैस यांच्या दाव्यानुसार, पुढील 50 वर्षांनी म्हणजे वर्ष 2075 मध्ये जगात मोठा बदल झालेला असेल. जगातील अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलेला असेल. अमेरिका जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था, महाशक्ती नसेल. तर हा मुकूट चीनच्या डोई असेल. युरोपचा सध्याचा वरचष्मा पण राहणार नाही. केवळ जर्मनी या तीव्र स्पर्धेत आघाडीवर असेल.
  • युके आणि जपान या यादीतून बाहेर फेकले जातील. टॉप-10 यादीत आशियाचा दबदबा असेल. चीनसोबतच भारत आणि इंडोनेशिया मोठा चमत्कार करतील. या भविष्यातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असतील. जगाचा आर्थिक नकाशा पूर्णपणे बदलेल. सुकाणू आशिया राष्ट्रांच्या हाती असेल.

कधी घडेल हा बदल

  • चीनची सध्याची आर्थिक स्थिती नाजूक असली तरी 2050 पर्यंत चीन सर्वात मोठी झेप घेईल. चीन जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल. येत्या 25 वर्षात भारत आणि चीन मोठी घौडदौड करतील. भारत चीनला आव्हान उभं करेल. तर इंडोनेशिया पण ताकदीने समोर येईल. या यादीत सर्वांना धक्का पाकिस्तान देणार आहे.
  • येत्या 50 वर्षांत भारताचा जीडीपी 52.5 ट्रिलियन डॉलर असण्याचा अंदाज आहे. तर अमेरिकाचा जीडीप 51.5 ट्रिलियन डॉलरहून अधिक असेल. चीनचा जीडीपी 57 ट्रिलियन डॉलरच्या जवळपास असेल.
Non Stop LIVE Update
बारामतीत दादांच्या कार्यकर्त्यांची धमकी ? काय म्हणाल्या शर्मिला पवार
बारामतीत दादांच्या कार्यकर्त्यांची धमकी ? काय म्हणाल्या शर्मिला पवार.
युगेंद्र पवारांची आई मतदानकेंद्रावर; दादांच्या कार्यकर्त्यांवर भडकल्या
युगेंद्र पवारांची आई मतदानकेंद्रावर; दादांच्या कार्यकर्त्यांवर भडकल्या.
'तुझा मर्डर फिक्स...',कांदेंची भुजबळांना उघड धमकी, हायव्होल्टेज ड्रामा
'तुझा मर्डर फिक्स...',कांदेंची भुजबळांना उघड धमकी, हायव्होल्टेज ड्रामा.
सरवणकरांच्या धनुष्यबाणाला अमित ठाकरेंचा आधार, आमने-सामने आलेत अन्...
सरवणकरांच्या धनुष्यबाणाला अमित ठाकरेंचा आधार, आमने-सामने आलेत अन्....
उद्धव ठाकरेंनी वांद्रे पूर्वेत कुटुंबासह केलं मतदान, नागरिकांना आवाहन
उद्धव ठाकरेंनी वांद्रे पूर्वेत कुटुंबासह केलं मतदान, नागरिकांना आवाहन.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कुटुंबियांसह बजावलं मतदानाचं कर्तव्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कुटुंबियांसह बजावलं मतदानाचं कर्तव्य.
देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कुटुंबासह नागपुरात बजावला मतदानाचा हक्क
देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कुटुंबासह नागपुरात बजावला मतदानाचा हक्क.
कांदेंनी बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी आडवली, नेमकं काय घडल
कांदेंनी बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी आडवली, नेमकं काय घडल.
'राऊतांचाच कट जिहाद झालाय, जिहादची भाषा करूनही..',भाजप नेत्याचा घणाघात
'राऊतांचाच कट जिहाद झालाय, जिहादची भाषा करूनही..',भाजप नेत्याचा घणाघात.
अजित पवार भल्या सकाळी मतदानाला, बारामती काटेवाडीत बजावला मतदानाचा हक्क
अजित पवार भल्या सकाळी मतदानाला, बारामती काटेवाडीत बजावला मतदानाचा हक्क.