Demat Accounts : नवीन गुंतवणूकदारांनाही शेअर बाजाराची भूरळ, डिमॅट खातेदारांची संख्या इतकी वाढली

Accounts : कोरोनाची भीती कमी झाल्यापासून शेअर बाजारात नशीब आजमावणाऱ्यांची संख्या इतकी वाढली आहे.

Demat Accounts : नवीन गुंतवणूकदारांनाही शेअर बाजाराची भूरळ, डिमॅट खातेदारांची संख्या इतकी वाढली
Follow us
| Updated on: Jan 15, 2023 | 9:44 PM

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारात (Share Market) सातत्याने धमाके होत आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचा धडाका लावला आहे. परंतु, शेअर बाजारात कमाईची संधी मिळते, यावर अनेकांचा विश्वास आहे. त्यामुळेच शेअर बाजाराच्या मैदानात अनेक नव गुंतवणूकदार (Investors) नशीब आजमावत आहेत. कोरोनाची भीती कमी झाल्यानंतर नवीन गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे वळला आहे. सरत्या वर्षाच्या डिसेंबर महिन्यात डीमॅट खात्यांची (Demat Accounts) संख्या 34 टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गुंतवणुकीसाठी शेअर बाजार ही पहिली पसंती असल्याचे स्पष्ट होत आहे.

कधी काळी जुगार म्हणून ओळख असलेल्या शेअर बाजाराकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे. आता देशात 10.8 कोटी डीमॅट खाते झाले आहेत. डिमॅट खात्यांची संख्या दहा कोटींच्या वर पोहचण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांपेक्षा भारतीय गुंतवणूकदारांवर शेअर बाजाराचे पुढारपण दिसून येते.

कोरोना काळातही शेअर बाजारात नवीन गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पैसा गुंतविला होता. एकीकडे कोरोनाचा कहर वाढत असताना बाजारात गुंतवणूकदारांची संख्या वाढत होती. कोरोना पूर्व काळात डीमॅट खातेदारांची संख्या 4 कोटींच्या आसपास होती. ही संख्या आता दहा कोटींच्या पुढे गेली आहे.

हे सुद्धा वाचा

डिमटरियलाईजेशन अकाऊंट म्हणजे डीमॅट खाते असते. हे एक प्रकारे बँक खात्या सारखेच काम करते. या खात्यात तुम्ही खरेदी केलेले शेअर आणि इलेक्ट्रॉनिक फॉर्म ठेवण्यात येतात. शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी डीमॅट खाते अनिवार्य आहे. तरच तुम्ही व्यवहार करु शकता.

मीडिया अहवालानुसार, शेअर बाजारात व्यवहारासाठी डीमॅट खाते अनिवार्य आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात डीमॅट खात्याची संख्या वाढून 10.8 कोटी झाली. डिसेंबर 2022 मध्ये डीमॅट खात्याची डिसेबंर 2021 मधील खात्यापेक्षा 34 टक्क्यांनी वाढली. डिसेबंर 2021 मध्ये ही संख्या 8.1 कोटी होती.

शेअर बाजारात जोरदार परतावा मिळणे, खाते उघडण्याची प्रक्रिया सुटसुटीत आणि सोपे असणे, बचतीच्या सवयीतून दीर्घकालीन परतावा यामुळे देशात डीमॅट खात्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सप्टेंबर ते डिसेंबर या काळात डीमॅट खातेदारांची संख्या वाढली आहे.

आकड्यानुसार, डीमॅट खात्याची संख्या वाढत असली तरी सक्रीय वापरकर्त्यांची संख्या मात्र कमी होत आहे. बाजारात सक्रिय खातेदारांची संख्या घटत आहे. डिसेंबर 2022 मध्ये सक्रिय वापरकर्त्यांच्या संख्येत 3.5 कोटींची संख्या आहे.

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.