रत्न आणि दागिन्यांच्या निर्यातीत 56 टक्क्यांची हनुमान उडी; भारतीयांनी केली एकूण 39 अब्ज डॉलरची निर्यात तर भारतीयांचे सुवर्णवेड कायम, 46 अब्ज डॉलरचे सोने आयात
गेल्या आर्थिक वर्षात भारताने रत्न आणि दागिन्यांच्या निर्यातीत हनुमान उडी घेतली.भारतीयांनी 56टक्के म्हणजे एकूण 39 अब्ज डॉलरची निर्यात केली तर भारतीयांचे सुवर्णवेड कायम असून आयातीत 33 टक्के तेजी नोंदवत एकूण 46 अब्ज डॉलरचे सोने आयात केले.
गेल्या आर्थिक वर्षात भारताने रत्न आणि दागिन्यांच्या निर्यातीत (Gems and Jewellery exports) हनुमान उडी घेतली. भारतीयांनी 56टक्के म्हणजे एकूण 39.15 अब्ज डॉलरची निर्यात केली. 2020-21 या आर्थिक वर्षात भारताने 25.40 अब्ज डॉलरची निर्यात केली होती. भारतीय निर्यातीत रत्न आणि दागिने व्यवसायाचा मोठा हातभार लागतो. तर भारतीयांचे सुवर्णवेड कायम असून आयातीत 33 टक्के तेजी नोंदवत एकूण 46.14 अब्ज डॉलरचे सोने आयात केले. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये भारताने 36.42 अब्ज डॉलरचे सोने आयात केले आहे. या तेजीने वाढलेल्या सुवर्ण आयातीचा (Gold Imports)सध्याच्या वित्तीय खात्यातील तूटीवर (Current Account Deficit) परिणाम दिसून आला आहे. या वित्त वर्षाचा विचार करता भारताने जेवढी सोने आयात केली आहे. त्यापेक्षा दागिन्यांची कमी निर्यात केली आहे.
मार्च महिन्यात रत्न आणि दागिन्यांची एकूण निर्यात 4.33 टक्क्यांहून 3.39 अब्ज डॉलरवर पोहचली होती. जी गेल्या आर्थिक वर्षात याचा कालावधीत 3.40 अब्ज डॉलरच्या तुलनेत 0.46 टक्के कमी आहे.रत्ने आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेने ( Gems and Jewellery Export Promotion Council ) निर्यातीसाठी कंबर कसली आहे. परिषदेचे अध्यक्ष कोलिन शहा यांनी स्पष्ट केले आहे की, जागतिक बाजारात भारताच्या निर्यातीत 54 टक्के वाढ दिसून आली. त्यांनी सांगितले की, 39.15 अब्ज डॉलरच्या वार्षिक निर्यातीसोबतच भारत या व्यवसायात 400 अब्ज डॉलरचे निर्यात लक्ष्य ठेऊन आहे. त्यात आतापर्यंत 10 टक्के योगदान देण्यात यश आले आहे.
पॉलिश्ड डायमंडला सर्वाधिक मागणी
रत्न आणि दागिन्यांच्या एकूण निर्यातीत पैलू पाडलेल्या आणि चकाकी आणलेल्या (Polished) हि-यांना सर्वाधिक मागणी आहे. अशा हि-यांची एकूण निर्यातीतील वाटा 62 टक्के म्हणजे 24.23 अब्ज डॉलर आहे. अमेरिका, संयुक्त अरब अमिरात, बेल्जियम आणि इजराईलमध्ये या हि-यांना सर्वाधिक मागणी आहे. नुकतेच भारताने संयुक्त अरब अमिरात आणि ऑस्ट्रेलियासोबत मुक्त व्यापार करार (Free Trade Agreement) केला आहे. त्यामुळे ज्वेलरी आणि जेम्स उद्योगाला आणखी उभारी मिळेल. पैलू पाडलेल्या आणि चकाकी आणलेल्या (Polished) हि-यांना सर्वाधिक मागणी आहे. त्यांची एकूण निर्यात 24.23 अब्ज डॉलर आहे. या व्यवसायात 50.33 टक्क्यांची वार्षिक उलाढाल वाढली आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात अशा हि-यांची निर्यात 16.29 अब्ज डॉलर होती. तर सोन्याच्या आभुषणाच्या निर्यातीत 86 टक्के वृद्धी दिसून आली. या दागिन्यांचा निर्यातीत एकूण 9.13 अब्ज डॉलर वाटा होता. आर्थिक वर्ष 2021 मध्ये हा वाटा 4.94 अब्ज डॉलर होता. चांदीच्या दागिन्यांची निर्यात 2.721 अब्ज डॉलर होती. रंगीत खड्डे आणि रत्नांची (gemstone) निर्यात 66.82 टक्क्यांची वृद्धी दिसून आली. त्यांची एकूण निर्यात 311 अब्ज डॉलर होती.