MOSFL : 1200 कोटी रुपयांचे शेअर केले दान, कोण आहेत हे दानशूर

MOSFL : भारताला दोन नवीन दानशूर मिळाले. त्यांनी त्यांच्याकडील 10 टक्के शेअर दान केले. त्यांचे एकूण मूल्य 1200 कोटी रुपये आहे. समाजाला आपण काही देणे लागतो, या विचाराने केले प्रेरीत..कोण आहेत हे दोघे..

MOSFL : 1200 कोटी रुपयांचे शेअर केले दान, कोण आहेत हे दानशूर
Follow us
| Updated on: Jul 29, 2023 | 3:49 PM

नवी दिल्ली | 29 जुलै 2023 : समाजाला आपण काही देणे लागतो, हा विचार फार कमी जणांमध्ये दिसून येतो. प्रचंड कमाई करणारे अनेक जण कंजुष असतात. त्यांच्याकडे अफाट संपत्ती असताना समाजासाठी काही करण्याची दानत त्यांच्यात नसते. पण काही जण याला अपवाद आहे. काही उद्योगपतींनी, श्रीमंतांनी सेवा भाव जपण्यासाठी खास फाऊंडेशनची स्थापना केली आहे. त्यांनी केलेल्या दानातील रक्कमेतून अनेकांच्या शिक्षणाचा भार उचलण्यात येतो. काहींवर उपचार करण्यात येतात. लोक कल्याण करण्यात येते. भारताला दोन नवीन दानशूर मिळाले. त्यांनी त्यांच्याकडील 10 टक्के शेअर दान (Share Donate) केले. त्यांचे एकूण मूल्य 1200 कोटी रुपये आहे. समाजाला आपण काही देणे लागतो, या विचाराने केले प्रेरीत..कोण आहेत हे दोघे..

या दोघांनी केले शेअर दान

मोतीलाल ओसवाल फायनेन्शिअल सर्व्हिसेज (MOSFL) हे नाव तर लोकप्रिय आहे. या ब्रोकर कंपनीचे प्रमोटर्स मोतीलाल ओसवाल आणि रामेदव अग्रवाल यांनी हे पाऊल टाकले. दोघांनी 5-5 टक्के इक्विटी शेअर दान करण्याचा निर्णय घेतला. कंपनीच्या एकूण इक्विटी शेअरपैकी हे प्रमाण 10 टक्के आहे.

हे सुद्धा वाचा

इतके आहे प्रमाण

मोतीलाल ओसवाल 73,97,556 इक्विटी शेअर तर रामदेव अग्रवाल 73,97,556 इक्विटी शेअर दान करतील. MOSFL कंपनीने स्टॉक एक्सचेंजला या दानाची माहिती दिली. त्यानुसार, पुढील 10 वर्षांच्या आत ही रक्कम खर्च करण्यात येईल. 27 जुलै रोजी कंपनीच्या शेअरप्रमाणे, दान केलेल्या या शेअर्सची एकूण किंमत 1210.24 कोटी रुपये होती.

वॉरेन बफेचा आदर्श

मोतीलाल ओसवाल आणि रामदेव अग्रवाला हे वॉरेन बफे यांना आदर्श मानतात. त्यांच्या मार्गावर चालण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. यापूर्वी वॉरेन बफे यांनी पाच फाऊंडेशनला दान केला होता. त्यामुळे त्यांचा एकूण दान धर्म 50 अब्ज डॉलरहून अधिक झाली आहे. हे दान 2006 मध्ये त्यांच्या एकूण संपत्तीपेक्षा अधिक आहे.

मोठ्या संघर्षानंतर मिळवले यश

पश्चिम राजस्थान मधील एका गावातून मोतीलाल ओसवाल आले. त्यांनी कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास केला. मुंबईत आल्यावर त्यांचा संघर्ष संपला नाही. त्यांनी उच्च शिक्षण घेतले. ते सीए झाले. मित्र रामदेव अग्रवाल यांच्या मदतीने त्यांनी मोतीलाल ओसवाल फायनेन्शिअल सर्व्हिसेज सुरु केले.

नॉलेज फर्स्टची किमया

नॉलेज फर्स्ट हा उपक्रम त्यांनी सुरु केला. त्यासाठी त्यांनी निधी दिला. त्यांनी क्रिशकुल नावाची संस्था स्थापन केली. शेतकऱ्यांना शिक्षित करणे हा त्यामागील उद्देश होता.

समाजाला देण्याची प्रेरणा

ज्या शाळेत, कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. हॉस्टेलमध्ये राहिले. त्यासाठी अनेकांनी दानधर्म केला. त्यामुळेच माझ्यासारखे अनेक जण शिकू शकले. त्यासाठी मी कृतज्ञ आहे. त्यामुळे समाजाला देण्याची प्रेरणा मिळाल्याचे मोतीलाल ओसवाल यांनी सांगितले.

देण्यात मोठा आनंद

देण्यात मोठा आनंद आहे. हा आनंद शब्दात व्यक्त करता येऊ शकत नाही. मी तर आता देण्याचा धडा गिरवत असल्याचे रामदेव अग्रवाल यांनी सांगितले. शेअर इक्विटी जास्त वाढेल. त्याचा सर्वांना फायदा होईल.

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.