रशियाच्या ऐवजी या मुस्लीम देशातून कच्चे तेल आयात करतो भारत, हे 5 देश सर्वात मोठे सप्लायर
भारतात त्याचा जुना मित्र असलेल्या रशियातून कच्चे तेल आयात करीत होता. परंतू रशियातून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीत डिसेंबर महिन्यात घसरण झाली आहे. त्याऐवजी भारत या मुस्लीम देशातून तेल आय़ात करीत आहे...
Crude Oil Import: भारत त्याचा मित्र रशियातून क्रुड ऑईल म्हणजे कच्चे तेल आयात करीत होता. परंतू त्यात आता घसरण आली आहे. डिसेंबर महिन्यांत रशियातून होणारी कच्च्या तेलाची आयात १३.२ टक्के घटून प्रति दिनाच्या हिशेबाने १.३९ अब्ज बॅरल इतके राहीले आहे. तर नोव्हेंबरमध्ये हा आकडा १.६१ अब्ज बॅरल प्रति दिन इतका होता. लंडन येथील कमोडिटी डेटा एनालिटिक्स प्रोव्हायडर वोर्टेक्सा यांच्या आकडेवारीतून ही बाब जाहीर झाली आहे. डिसेंबरमध्ये जगभरात कच्च्या तेलाच्या निर्यातीच्या बाबतीत रशिया पहिल्या क्रमांकावर राहीला आहे. यात ३१ टक्के कच्च्या तेलाची आयात एकट्या भारताने केली आहे.
हे पाच देश कच्च्या तेलाचे सर्वात मोठे पुरवठा दर
कच्च्या तेलाची एकूण आयात महिना दर महिन्याला सुमारे चार टक्के वाढून ४.४६ अब्ज बॅरल प्रतिदिन पर्यंत पोहचला आहे. रशियाच्या तुलनेत भारताने कच्च्या तेलाची सर्वाधिक आयात इराककडून केली आहे. वोर्टेक्सामध्ये मार्केट एनालिस्ट झेवियर्स टॅग यांनी ‘द फायनान्सियल एक्सप्रेस’ला ही माहिती दिली आहे. त्यानुसार डिसेंबरमध्ये जगातील ज्या विविध देशातून कच्च्या तेलाची आयात झाली. त्या देशात रशिया,इराक, सौदी अरब, संयुक्त अरब अमिराती आणि अंगोला या देशांचा समावेश आहे.या अंगोला या देशाने अमेरिकेला मागे टाकत कच्च्या तेलाचा पाचवा सर्वात मोठा पुरवठादार बनला आहे.रशियातून भारताची तेल आयात घटण्यामागे भारतातील रिफायनरी आता आफ्रीका आणि मध्य पूर्वेतून तेल आयात करीत आहेत असे झेवियर्स टॅग यांनी म्हटले आहे.
या दोन देशांतून भारतात सर्वाधिक कच्चे तेल येते..
भारत रशिया आणि सौदी अरबमधून सर्वाधिक कच्च्या तेलाची आयात करतो. परंतू डिसेंबर महिन्यात या दोन देशांना मागे टाकत कच्च्या तेलांच्या आयातीत संयुक्त अरब अमिरात आणि इराकची भागीदारी वाढली आहे. भारतात कच्च्या तेलाच्या आयातीत इराकचा वाटा वाढून २३ टक्के झाला आहे, आधी तो १६ टक्के होता. भारताच्या पेट्रोलियम मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी भारताने कच्चे तेल आयात करण्यासाठी १४३ अब्ज डॉलर खर्च केले आहेत. ज्यात ६१ टक्के मध्य पूर्व ( इराण, इराक, सौदी अरेबिया ), १६ % आफ्रिकेतून, १७ % दक्षिण अमेरिकेतून आणि केवळ 0.1% रशियामधून तेल आयातीसाठी खर्च केले आहेत.
आकड्यांनुसार भारताने इराककडून गेल्या महिन्यात कच्च्या तेलाची आयात ४८.३ टक्के वाढून १.०३ अब्ज बॅरल प्रतिदिन केली आहे. तरीही मध्य पूर्वच्या तुलनेत भारताने प्रति बॅरलवरील डिसकाऊंटपाहून कच्च्या तेलाच्या आयातीच्या बाबतीत रशियाला प्राधान्य दिले आहे.