Population : संकट कसलं, ही तर संधी! लोकसंख्या वाढीमुळे अर्थव्यवस्थेला बुस्टर डोस

Population : सर्वाधिक लोकसंख्येचा रेकॉर्ड अखेर भारताने नावे केलाच. चीनला याबाबतीत तरी भारताने पिछाडीवर टाकले. काहींना ही बाब संकट वाटत असेल पण तज्ज्ञांच्या मते, या संकटातच एक संधी दडलेली आहे..

Population : संकट कसलं, ही तर संधी! लोकसंख्या वाढीमुळे अर्थव्यवस्थेला बुस्टर डोस
संधी आहे ही
Follow us
| Updated on: Apr 20, 2023 | 10:13 AM

नवी दिल्ली : सर्वाधिक लोकसंख्येचा रेकॉर्ड (Population Record) अखेर भारताने नावे केलाच. चीनला याबाबतीत तरी भारताने पिछाडीवर टाकले. भारत आता 142.86 कोटी लोकसंख्येचे घर आहे. चीनला भारताने लोकसंख्येत मागे टाकले आहे. चीनची (China) लोकसंख्या भारताच्या तुलनेत 29 लाखांनी कमी आहे. आज चीनची लोकसंख्या 142.57 कोटी आहे. अर्थात वाढती लोकसंख्या सर्वच स्त्रोतांवर, संसाधनांवर, सोयी-सुविधांवर प्रभाव टाकते. त्यामुळे खर्चाचे बजेट कोलमडते, हा सार्वत्रिक अनुभव आहे. पण या संकटातच एक संधी दडलेली आहे. तज्ज्ञांच्या मते, लोकसंख्या वाढीचा बाऊ करण्याची गरज नाही. लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न करतानाच, हीच लोकसंख्या आपली शक्ती ठरु शकते. कसे ते पाहुयात..

तीन दशकं बॅटिंग आता तुम्ही अंदाज बांधत असाल की, भारतीय लोकसंख्या नियंत्रणात येईल. तर ही प्रक्रिया काही लागलीच होणार नाही. भारतीय तीन दशकं बॅटिंग सुरुच ठेवतील. त्यामुळे लोकसंख्येचा वृद्धी दर कायम असेल. संयुक्त राष्ट्र संघटनेने विश्लेषण केल्याप्रमाणे 30 वर्षे लोकसंख्येचा वृद्धी दर कायम राहिल. त्यानंतर लोकसंख्येत घसरण होईल.

वाढती लोकसंख्या, संकट की संधी वाढती लोकसंख्येमुळे अनेक गोष्टींवर ताण येतो. एवढ्या मोठ्या लोकसंख्यांचे नियंत्रण, व्यवस्थापन, त्यांचे शिक्षण, पोटभरण्यासाठी हाताला काम मिळण्याची संधी, सरकारी यंत्रणेवर येणारा प्रचंड ताण व इतर खर्चाचे वाढते प्रमाण यासह अनेक संकट आहेत. चीनच्या प्रतिनिधीने याविषयी मात्र बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते, लोकसंख्या वृद्धीच्या आकडेवारी जाऊ नका, पण त्याच्या गुणात्मक फायद्यावर लक्ष केंद्रीत करा. आज चीनकडे 90 कोटी कार्यक्षम, प्रशिक्षित, वेलस्कील्ड लोकसंख्या आहे. चीनच्या गतिमान विकासाचे गुपीत याच्यातच तर दडलं आहे.

हे सुद्धा वाचा

चीनला कसली चिंता चीन लोकसंख्येच्या बाबतीत आतापर्यंत आघाडीवर होता. त्याच्याकडे 90 कोटी कार्यक्षम लोकसंख्या आहे. तरीही चीनला चिंता सतावत आहेत. कारण चीनच्या लोकसंख्येतील मोठा वर्ग आता वृद्ध होत आहे. चीनमध्ये जवळपास 26.4 कोटी लोक 60 वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत. तर 2035 पर्यंत ही संख्या 40 कोटी होण्याची शक्यता आहे. म्हणजे जवळपास 30 टक्के लोकसंख्या चीनच्या विकासात मोठे योगदान देऊ शकणार नाही.

भारत जगातील सर्वात तरुण देश तर भारताची स्थिती अगदी विपरीत आहे. भारताची 25 टक्के लोकसंख्या 0-14 वर्षांची आहे. म्हणजे येत्या दशकात ही लोकसंख्या भारताच्या विकासाला चालना देण्यासाठी योगदान देऊ शकते. त्यामुळे भारताला विकास दर गाठता येऊ शकते. भारताची 18 टक्के लोकसंख्या 10 ते 19 वर्षे, 26 टक्के लोकसंख्या 10 ते 24 वर्षे आणि 68 टक्के लोकसंख्या 15 ते 64 वर्षे वयोगटातील आहे. केवळ 7 टक्के लोकसंख्या 65 वर्षांवरील असेल.

नियोजन केल्यास मोठा फायदा संयुक्त राष्ट्र संघाच्या दाव्यानुसार, भारताने तरुणाईला योग्य दिशा दिल्यास, भारताचा विकासाचा झपाटा काही औरच राहील. 15 ते 25 वर्षे वयोगटातील 25.4 कोटी जनतेला संशोधन, नाविन्यपूर्णता आणि उपाय यासाठी प्रशिक्षित केल्यास भारताला मोठा फायदा होईल. 2050 पर्यंत भारताची लोकसंख्या वाढून 166.8 कोटी होईल. तर चीनची लोकसंख्या घटून 131.7 कोटी होईल.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.