मनी ऑर्डरचे युग संपले; आता DakPay अ‍ॅपने पाठवा तात्काळ पैसे

आता DakPay या अ‍ॅपमुळे पैसे पाठवणे आणखीनच सोपे झाले आहे. मंगळवारी या अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले. | DakPay IPPB

मनी ऑर्डरचे युग संपले; आता DakPay अ‍ॅपने पाठवा तात्काळ पैसे
भारतीय पोस्ट विभागात बंपर भरती
Follow us
| Updated on: Dec 16, 2020 | 12:31 PM

नवी दिल्ली: भारतीय टपाल सेवेच्या पेमेंट बँकेकडून ग्राहकांसाठी आता नवी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी पेमेंट बँकेकडून DakPay हे नवे अ‍ॅप सुरु करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने ग्राहकांना तात्काळ पैसे हस्तांतरित करता येतील. (India Post Payments Bank IPPB can now operate their)

पूर्वीच्या काळी टपाल खात्याची मनी ऑर्डरची सेवा खूपच लोकप्रिय होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी ही सेवाही बंद करण्यात आली होती. त्याजागी ई-मनी ऑर्डर सेवा सुरु करण्यात आली होती. त्यामध्ये इंटरनेटद्वारे तात्काळ पैसे पाठवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती.

मात्र, आता DakPay या अ‍ॅपमुळे पैसे पाठवणे आणखीनच सोपे झाले आहे. मंगळवारी या अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले. त्यामुळे ग्राहकांना बँकिंग आणि पैशांची डिजिटल देवाणघेवाण करता येईल. या पेमेंटला यूपीआयशी (UPI) जोडण्यात आले आहे. त्यामुळे आता पोस्टाच्या ग्राहकांना गुगल पे, फोन पे आणि इतर पेमेंट अ‍ॅपसारखे व्यवहार करता येणार आहेत.

केंद्रीय दूरसंचारमंत्र्यांनी काय म्हटले?

केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी DakPay या अ‍ॅपच्या सुविधेची प्रशंसा केली. या अ‍ॅपमुळे दुर्गम भागात राहणाऱ्या किंवा बँकेत खाते नसणाऱ्या लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्यास मदत होईल.

कशी मिळणार ही सुविधा? DakPay या अ‍ॅपच्या माध्यमातून डोमेस्टिक मनी ट्रान्सफर, क्यूआर कोड स्कॅन आणि यूपीआयच्या माध्यमातून डिजिटल व्यवहार करता येतील. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक पोस्ट पेमेंट बैंक (आईपीपीबी) खात्यामध्येही पैसे पाठवू शकतात. तसेच दुकानांमध्ये खरेदीसाठीही DakPay चा वापर केला जाऊ शकतो.

इतर बातम्या:

ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना IFSC कोड चुकीचा टाकला? जाणून घ्या पुढे काय होईल…

SBI आणि भारत पेट्रोलियमचे क्रेडिट कार्ड लाँच; ग्राहकांना मिळणार जबरदस्त फायदा

खाते उघडण्याच्या नियमात RBI कडून बदल; ग्राहकांना होणार मोठा फायदा

(India Post Payments Bank IPPB can now operate their)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.