India Q1 GDP Growth : सत्तर हत्तीचे आले बळ! पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्था अशी सूसाट

India Q1 GDP Growth : यापूर्वी मार्च महिन्याच्या तिमाहीत भारताचा आर्थिक वृद्धी दर 6.1 टक्के होता. तर आर्थिक वर्ष 2022-23 या दरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेने त्याहून अधिकची चढाई करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. जागतिक अर्थव्यवस्था आणि जगातील महासत्ता सुत्तावल्या असताना भारताने हा मोठा पल्ला गाठला हे विशेष.

India Q1 GDP Growth : सत्तर हत्तीचे आले बळ! पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्था अशी सूसाट
Follow us
| Updated on: Aug 31, 2023 | 6:56 PM

नवी दिल्ली | 31 ऑगस्ट 2023 : भारतीय अर्थव्यवस्थेने (Indian Economy) जगातील अनेक संस्थांना धक्का दिला. भारतीय अर्थव्यवस्था सध्या सूसाट आहे. जगात मंदीचे वारे वाहत आहे. कोरोनाने चीनचे बळ कमी झाले आहे. सध्या तर चीन अनेक संकटांनी घेरल्या जात आहे. चीनची अर्थव्यवस्था आता आणखी धक्के सहन करण्याच्या स्थितीत नाही. अनेक जागतिक ब्रँडनी चीनमधून काढता पाय घेतला आहे. अशावेळी भारतीय अर्थव्यवस्थेने मोठा पल्ला गाठला आहे. जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमधील सर्वात वेगवान अर्थव्यवस्थेचा किताब भारताने पटकावला आहे. जागतिक अर्थतज्ज्ञ या आघाडीमुळे हैराण झाले आहे. भारताचा विकास दर (Growth Rate) गेल्या एकाच वर्षांत ठसठशीतपणे जगाचा नकाशावर उमटला आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत तिसऱ्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न भारत निर्धारीत वेळेतच पूर्ण करु शकेल, असा सूर अनेक तज्ज्ञ आळवत आहे.

अशी मारली मुसंडी

भारतीय अर्थव्यवस्थेने जोरदार मुसंडी मारली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने या भरभराटीचे आकडे मांडले. त्यानुसार, मार्च महिन्याच्या तिमाहीत भारताचा आर्थिक वृद्धी दर 6.1 टक्के होता. तर आर्थिक वर्ष 2022-23 या दरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेने त्याहून अधिकची चढाई केली. अधिकृत आकडेवारीनुसार, पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेने 7.8 टक्क्यांचा वृद्धी दर नोंदवला. हा जगातील प्रमुख अर्थव्यवस्थेपेक्षा पण अधिकचा विकास दर आहे.

हे सुद्धा वाचा

या घटकांनी तारले अर्थव्यवस्थेला

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने आकडेवारी सादर केली. पहिल्या तिमाहीच्या जीडीपीचे आकडे गुरुवारी संध्याकाळी जाहीर करण्यात आले. त्यानुसार भारतीय अर्थव्यवस्था सध्या जोरात धावत आहे. केंद्र सरकारने विकास कामांसाठी सढळ हाताने निधी खर्च केला. बाजारात ग्राहकांनी मोठी मागणी नोंदवली. सेवा क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. या क्षेत्राने मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. या घटकांनी अर्थव्यवस्थेला तारले आहे. यापूर्वी जुलै महिन्याच्या कोर सेक्टरमध्ये वृद्धी दर कमी झाला होता. तो जूनच्या 8.3 टक्क्यांहून थेट 8 टक्क्यांपर्यंत घसरला होता.

गेल्यावर्षी काय होते आकडे

  1. गेल्यावर्षीच्या तिमाहीत म्हणजे जून 2022 मध्ये भारताचा जीडीपी वृद्धी दर 13.1 टक्के होता.
  2. यावर्षी वृद्धी दर चांगलाच प्रभावित झाला आहे. तरीही आकड्यांनी सर्वांना सूखद धक्का दिला.
  3. पहिल्या तिमाहीत कृषी क्षेत्राने 3.5 टक्क्यांच्या दराने वृद्धी नोंदवली.
  4. तर बांधकाम क्षेत्राचा विकास दर 7.9 टक्के राहिला.
  5. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरने निराश केले.
  6. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये घसरण होऊन तो 4.7 टक्क्यांवर आला.

केंद्रीय बँकेचा अंदाज काय

अनेक तज्ज्ञ अंदाज बांधत होते की जून तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था जोरदार प्रदर्शन करेल. तर भारतीय रिझर्व्ह बँकेने पहिल्या तिमाहीत जीडीपी ग्रोथ रेट 8 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला होता. रिझर्व्ह बँकेनुसार, देशाचा आर्थिक वृद्धी दर चालू आर्थिक वर्षांच्या चार तिमाहींमध्ये क्रमशः 8 टक्के, 6.5 टक्के, 6 टक्के आणि 5.7 टक्के असेल. चालू आर्थिक वर्षांत भारताचा विकास दर 6.5 टक्के असेल असा अंदाज आरबीआयने नोंदवला आहे.

काही संस्थांनी बदलले सूर

जगातील काही संस्थांनी यापूर्वी भारतीय अर्थव्यवस्था मोठी भरारी घेऊ शकणार नाही, ती चीनपेक्षा पण कमी प्रगती करेल, असा अंदाज वर्तवला होता. पण आता त्यांनी सूर बदलले आहेत. मुसळधार पाऊस आणि हवामान बदलाचा मोठा फटका भारताला बसत आहे. देशातील काही राज्यात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे जून, जुलै महिन्यात महागाईने डोके वर काढले. अनेक संस्थांनी भारताचा विकास दर 5.9 ते 6.3 टक्क्यांदरम्यान असेल, असा अंदाज वर्तवला आहे.

Non Stop LIVE Update
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे.
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?.
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?.
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक.
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील.
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री.
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस.
लाडकी बहिण कोणाची ?महायुतीत श्रेयवाद सुरुच, तीन पक्षात स्पर्धा
लाडकी बहिण कोणाची ?महायुतीत श्रेयवाद सुरुच, तीन पक्षात स्पर्धा.