Service Sector Growth : रोजगाराच्या ट्रॅकवर देश लवकरच सूसाट, सेवा क्षेत्रातील आकड्यांनी वाढवला उत्साह

Service Sector Growth : देशात रोजगाराबाबतच्या आकड्यांनी उत्साहात भर घातली आहे.

Service Sector Growth : रोजगाराच्या ट्रॅकवर देश लवकरच सूसाट, सेवा क्षेत्रातील आकड्यांनी वाढवला उत्साह
सेवा क्षेत्रात उत्साहाचे वातावरणImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jan 04, 2023 | 8:29 PM

नवी दिल्ली : सेवा क्षेत्रात (Service Sector) भारताने नेत्रदीपक प्रगती केली आहे. एकीकडे मंदीच्या बाता झोडल्या जात असताना, भारताने रोजगाराच्या (Employment) आघाडीवर आगेकूच करण्याचा प्रण केला आहे. सरत्या वर्षातील आकड्यांनी भारतीय सेवा क्षेत्रात उत्साहाचे आणि उत्सवाचे वातावरण आहे. डिसेंबर 2022 मधील सेवा क्षेत्रातील घौडदौडीने गेल्या 6 महिन्यातील उच्चांकी पातळी गाठली आहे. जून 2022 नंतर देशातील सेवा क्षेत्राने चमकदार कामगिरी केली आहे. सेवा क्षेत्राने जोरदार वृद्धी दराची (Service Sector Growth) नोंद केल्याने केंद्र सरकारची चिंता कमी होण्याची शक्यता आहे.

विविध सेवांच्या मागणीत वृद्धी झाल्याने उत्पादन वाढण्याची शक्यता बळावली आहे. देशातील सर्व्हिस सेक्टरच्या प्रगतीबाबत सोमवारी महत्वपूर्ण आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात त्याचा अनुकूल परिणाम सर्वच क्षेत्रात दिसून येईल.

S&P Global India Service PMI हा निर्देशांक त्यासाठी महत्वपूर्ण ठरला आहे. नोव्हेंबर महिन्यात हा निर्देशांक 56.4 होता. आता त्यात वृद्धी झाली आहे. हा निर्देशांक आता 58.5 टक्के वाढला आहे. प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यात वाढ झाल्याने उत्साह दुणावला आहे.

हे सुद्धा वाचा

ऑक्टोबर महिन्यात हा निर्देशांक 55.1 होता. या निर्देशांकाचे एक वैशिष्ट्ये म्हणजे गेल्या 17 महिन्यांपासून हा निर्देशांक सातत्याने 50 अंकांहून अधिक आहे. PMI जर 50 अंकांच्या पुढे असेल तर त्याचा अर्थ सेवा क्षेत्र सातत्याने विस्तारत आहे. तर या निर्धारीत लक्ष्यापेक्षा त्यात घसरण ही धोक्याची नांदी ठरते.

S&P Global Market चे संयुक्त निदेशक पॉलियाना डी लीमा यांनी सेवा क्षेत्रातील हा विस्तार मागणीत वृद्धीचा पुरावा असल्याचे म्हटले आहे. यामुळे कंपन्यांचे उत्पादन वाढण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. या सेक्टरमध्ये जवळपास 31 टक्के वृद्धीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.