Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निर्यातीसाठी ठरवलेलं टार्गेट भारत सरकारनं 9 दिवस आधीच पूर्ण केलं! 400 अब्ज डॉलर्सचं लक्ष्य गाठण्यात यश

Narendra Modi : तब्बल 400 अब्ज डॉलरच्या वस्तूंच्या निर्यातीचं लक्ष्य गाठण्यात भारताला यश आलं आहे. पहिल्यांदा भारतात निर्यातीमधील हा विक्रमी आकडा गाठण्यात यश आलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

निर्यातीसाठी ठरवलेलं टार्गेट भारत सरकारनं 9 दिवस आधीच पूर्ण केलं! 400 अब्ज डॉलर्सचं लक्ष्य गाठण्यात यश
पहिल्यांच भारतानं टार्गेट पूर्ण केल्याबद्दल मोदींनीही केलं अभिनंदनImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 12:13 PM

नवी दिल्ली : कोरोनानंतर आता युक्रेन आणि रशियामधील (Russia Ukraine Crisis) ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीतही भारतानं (Government of India) एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. पहिल्यांदाच देशानं निर्यातीचं आपलं निर्धारीत लक्ष्य गाठलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी याबाबतची माहिती ट्वीट करत दिली आहे. तब्बल 400 अब्ज डॉलरच्या वस्तूंच्या निर्यातीचं लक्ष्य गाठण्यात भारताला यश आलं आहे. पहिल्यांदा भारतात निर्यातीमधील हा विक्रमी आकडा गाठण्यात यश आलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या यशाबद्दल मोदींनी देशातील वेगवेगळ्या क्षेत्रातील योगदान दिलेल्यांचे आभारही मानले आहेत. शेतकरी, उत्पादक, निर्यातदार, एमएसएमई क्षेत्रातील लोकांनी केलेल्या मेहनतीमुळे आणि कामगिरीमुळे हे लक्ष्य गाठता आलं असल्याचा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे. आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीकोनातून गाठलेला हा एक मैलाचा दगड आहे, असंही मोदींनी म्हटलंय.

9 दिवस आधीच टार्गेट पूर्ण!

भारत सरकारनं चारशे अब्ज डॉलरच्या निर्यातीचं लक्ष्य निश्चित केलं होतं. हे लक्ष्य भारतानं निर्धारीत वेळेच्या 9 दिवस आधीच पूर्ण केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत दररोज जवळपास एक अब्ज डॉलर्स किंमतीच्या वस्तूंची निर्यात करतो. जवळपास 46 दशलक्ष डॉलर किंमतीचा माल दररोज वेगवेगळ्या देशात निर्यात केला जात असल्याचीही माहिती समोर आली आहे.

सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार कोणत्या गोष्टींची किती निर्यात झाली, त्यावरही एक नजर टाकुयात..

  1. पेट्रोलियम 34.54%
  2. इलेक्ट्रॉनिक वस्तू 32.04%
  3. अभियांत्रिकी वस्तू 33.01%
  4. कापूस धागा 25.38%
  5. रसायनं 18.02%

निर्यात वाढूनही चिंता कायम!

एकीकडे निर्यातीचं टार्गेट जरी पूर्ण झालं असलं तरिही रशिया-युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या आणि इतर वस्तूंच्या किंमती या वाढलेल्या आहेत. वाढत्या व्यापार तुटीबद्दल जाणकारांनी चिंता व्यक्त केली आहे.

निवडणुकांनंतर गॅसचीही दरवाढ

एकीकडे पाच राज्यांतील निवडणुकांच्या दरन्यान गॅसचे दर वाढलेले नव्हते. दरम्यान, निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरात गॅस सिलिंडरच्या किंमती 950 ते 1000 रुपयांवर पोहोचल्या आहेत. दरम्यान, आता घाऊक डिझेल खरेदीत 25 रुपयांची वाढ केल्यामुळे रेल्वे प्रवासही महागण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

संबंधित बातम्या :

एफडीमध्ये गुंतवणूक करायचीये? या दहा बँकांबद्दल जाणून घ्या ज्या देतात सर्वोत्तम व्याज

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ, मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरातले काय आहेत भाव?

Ajit Pawar : व्यापाऱ्यांना ‘अभय’, 10 हजार रुपयांची थकबाकी माफ; राज्य सरकारचा मोठा निर्णय

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.