देशी स्वॅगने चीनचे दिवाळे! ड्रॅगनला इतक्या लाख कोटींचा बसला फटका
China | या दिवाळीत चीनचे दिवाळे निघाले आहे. व्होकल फॉर लोकल या योजनेचा चीनमधील बाजारपेठेला मोठा फटका बसला आहे. स्वदेशी वस्तूंची धूम आहे. ग्राहकच नाही तर वितरक पण या दिवाळीत स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देत आहे. चीनला या देशी स्वॅगचा मोठा फटका बसला आहे. इतक्या लाख कोटींचे नुकसान झाले आहे.
नवी दिल्ली | 9 नोव्हेंबर 2023 : आर्थिक मोर्चावर चीनचे कंबरडे मोडले आहे. चीनला आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यात यंदाची दिवाळी चीनसाठी फिक्की ठरली आहे. केंद्र सरकारची व्होकल फॉर लोकलने मोठा बदल घडवला आहे. नागरिक मोठ्या प्रमाणात स्वदेशी वस्तू खरेदी करत आहे. त्यामुळे चीनला एक लाख कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शुक्रवारी धनत्रयोदशी आहे. त्यापूर्वीच बाजारात खरेदीचे पर्व सुरु झाले आहे. देशभरातील बाजारात उत्साह ओसंडून वाहत आहे. राजधानी दिल्लीसह देशभरात 50 हजार कोटी रुपयांच्या विक्रीचा अंदाज आहे. स्थानिक उत्पादनं वाढली आहेत, ती अधिक वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. चीनच्या वस्तूंना बाजाराने झिडकारले आहे.
बाजारात चैतन्याची लाट
देशातील व्यापाऱ्यांची संघटना कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या बदलाने आनंदी झाली आहे. राष्ट्रीयअध्यक्ष बी. सी. भारतिया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी देशातील रिटेल व्यापार वाढण्याचा अंदाज वर्तवला. गुरुवार आणि शुक्रवारी बाजारात जवळपास 50 हजार कोटी रुपयांची उलाढाल होईल अशी शक्यता त्यांनी वर्तवली. सध्या बाजार पूर्णपणे व्होकल फॉर लोकल असा असल्याचा दावा त्यांनी केला. नागरिकांनी पण त्याला जोरदार प्रतिसाद दिला. चीनी वस्तूकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचा दावा व्यापारी संघटनेने केला आहे.
चीनचे दिवाळे
सेमीकंडक्टर चिप्सपासून ते सर्व प्रकारच्या वस्तूपर्यंत भारताने चीनवरील अवलंबून राहण्याचे धोरण कमी केले आहे. देशातील अर्थव्यवस्थेला आर्थिक पाठबळ दिले आहे. गेल्या पाच वर्षांत देशात सेमीकंडक्टर, मटेरियल्स, ऑटो कम्पोनेंट्स आणि मॅकेनिकल मशनरी यांच्या निर्यातीत तेजी आली आहे. भारताकडून अमेरिकेला सेमीकंडक्टर आणि मटेरियल्सची निर्यात 143 टक्क्यांनी वाढली आहे. तर चीनच्या निर्यातीत सध्या 29 टक्क्यांची घसरण झाली आहे. भारताचे ऑटो कम्पोनेट निर्यात 65 टक्के तर मॅकेनिकल मशनरीची निर्यात 70 टक्क्यांनी वधारली आहे. एका अहवालानुसार, भारताची निर्यात 2018 ते 2022 या दरम्यान 23 अब्ज डॉलरने वाढली आहे. तर चीनकडून अमेरिकेला करण्यात येणाऱ्या निर्यातीत 10 टक्क्यांची घसरण झाली आहे.