Indian GDP : भारत सर्वात मोठी अर्थसत्ता होणार! अजून लागतील इतकी वर्षे, गौतम अदानी यांची भविष्यवाणी काय?

Indian GDP : भारत येत्या काही वर्षात जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्यासंबंधी अदानी यांचा दावा काय आहे..

Indian GDP : भारत सर्वात मोठी अर्थसत्ता होणार! अजून लागतील इतकी वर्षे, गौतम अदानी यांची भविष्यवाणी काय?
महासत्तेच्या स्वप्नांना पंखImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 19, 2022 | 5:14 PM

नवी दिल्ली : भारत येत्या आठ वर्षांत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थसत्ता, महासत्ता  (World’s Third largest Economy) होईल. तर अजून 25 वर्षांनी जागतिक अर्थव्यवस्था होण्यापासून देशाला कोणीही रोखू शकणार नाही. हा दावा जगातील तिसरी सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी केला आहे. भारताचा सध्याचा आर्थिक रोडमॅप पाहता हे लक्ष्य साध्य करता येणार आहे.

भारत 2030 साली जगातील तिसरी अर्थसत्ता होईल. तर 2050 मध्ये भारत जगातील दुसरी अर्थव्यवस्था असेल. अदानी समूहाचे (Adani Group) संचालक गौतम अदानी यांनी हा दावा केला आहे. मुंबई येथे आयोजीत वर्ल्ड काँग्रेस ऑफ अकाऊंटेंट्स 2022 मध्ये त्यांनी हे वक्तव्य केले होते.

गौतम अदानी यांच्या दाव्यानुसार, येत्या तीन दशकांमध्ये भारत उद्योजकता (Entrepreneurship) कार्यक्रमात गतीने पुढे जाईल. भारताने 2021 मध्ये जागतिक स्तरावर रिअल टाईम ट्रॅन्झॅक्शनमध्ये इतिहास रचला.

हे सुद्धा वाचा

अमेरिका, फ्रान्स, कॅनडा आणि जर्मनीच्या एकूण व्यवहारांपेक्षा हा आकडा 6 पट जास्त आहे. या सर्व देशांनी चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी    (4th industrial revolution) तयारी पूर्ण केली आहे. यामध्ये मानव आणि मशीन यांच्यात सुसंवाद राहील.

भारतात वेगाने वाढणारे स्टार्टअप्स भारतीय व्हेंचर कॅपिटलला प्रोत्साहन देतील. मोठा निधी उभारण्यास मदत करतील. भारतात पहिल्या व्हीसी फंडिंगमध्ये, निधीत केवळ आठ वर्षांतच 50 अरबचा टप्पा ओलांडला आहे.

भारत ग्रीन पॉवर क्षेत्रात गतीने पुढे जात आहे. सौर ऊर्जा आणि ग्रीन हायड्रोजन या भविष्यातील मोठ्या संधी आहेत. ऊर्जेचे पूनर्वापर करण्यासाठी हे क्षेत्र मोठ्या प्रमाणात विकसीत होत असल्याचे अदानी यांनी सांगितले.

या घडामोडी पाहता, भारत 2050 सालापर्यंत ग्रीन एनर्जी(Green Energy) वितरीत करणारा मोठा निर्यातक असेल, असा विश्वास गौतम अदानी यांनी व्यक्त केला. आपल्या 30 मिनिटांच्या भाषणात त्यांनी अनेक विषयावर मते व्यक्त केली.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.