India Vs China : भारतच देणार चीनला धोबीपछाड! आनंद महिंद्रा यांचे गणित तर समजून घ्या

India Vs China : भारत सध्या सर्वाधिक वेगाने प्रगती करणारी अर्थव्यवस्था पुन्हा समोर आली आहे. तर जगातील अनेक महाशक्ती सुस्तावल्या आहेत. त्यामुळे भारत चीनला धोबीपछाड देईल, असा नवा आशावाद उदयाला येत आहे, उद्योजक आनंद महिंद्रा यांनी त्याचे एक गणित मांडले आहे.

India Vs China : भारतच देणार चीनला धोबीपछाड! आनंद महिंद्रा यांचे गणित तर समजून घ्या
Follow us
| Updated on: Aug 06, 2023 | 8:43 AM

नवी दिल्ली | 06 ऑगस्ट 2023 : सध्या जागतिक अर्थव्यवस्था (Global Economy) सुस्तावली आहे. तर काही ठिकाणी मंदी सदृश्य वातावरण आहे. जगातील अनेक देशांना रशिया-युक्रेन युद्धाचा फटका बसला आहे. या सर्व वातावरणात जगाचे भारताकडे लक्ष लागले आहे. भारताची अर्थव्यवस्था मोठ्या जोमाने आगेकूच करत आहे. भारताने टॉप-10 अर्थव्यवस्थेमध्ये अवघ्या काही वर्षांतच पाचव्या स्थान झेप घेतली आहे. येत्या चार वर्षांत भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था (World Third Economy) असेल असा अंदाज अनेक मानांकन संस्थांनी वर्तवला आहे. लवकरच भारत जर्मनी आणि जपानला मागे टाकण्याची शक्यता आहे. तर जगातील अनेक महाशक्ती सुस्तावल्या आहेत. त्यामुळे भारत चीनला पण धोबीपछाड देईल, असा नवा आशावाद उदयाला येत आहे, उद्योजक आनंद महिंद्रा (Businessman Anand Mahindra) यांनी त्याचे एक गणित मांडले आहे.

भारताविषयीचा चष्मा बदलला

काही वर्षांपूर्वी भारत मोठी भरारी घेऊ शकणार नाही, असा अंदाज जागतिक संस्था नोंदवत होत्या. पण भारतीय अर्थव्यवस्थेने झपाट्याने पाऊल टाकले. त्यानंतर भारताकडे पाहण्याचा चष्मा या संस्थांना बदलावा लागला. या संस्थांना भारतीय अर्थव्यवस्थेविषयी अचानक विश्वास वाटायला लागला.

हे सुद्धा वाचा

काय वर्तविला अंदाज

गोल्डमॅन, एसबीआय, एसअँडपी, मूडीज या संस्थासह इतर फर्मने भारत काही दिवसांत जागतिक अर्थव्यवस्थेतील खास भिडू असेल यावर शिक्कामोर्तब केले आहे. 2075 पर्यंत भारत अमेरिकेला मागे टाकेल, असा अंदाज आहे. तर चीनला 2047 मध्ये धोबीपछाड देईल. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी नेमका हाच धाग पकडला आहे.

आनंद महिंद्राचे म्हणणे काय

नव्या भारताच्या या रुपाबद्दल आणि आर्थिक महाशक्ती म्हणून उदयाविषयी आनंद महिंद्रा अनेक दिवसांपासून भाकित वर्तवित आहेत. त्यांनी पुन्हा एकदा भारत आर्थिक महाशक्ती असेल असा दावा केला आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत महिंद्रा अँड महिंद्राच्या मोठा पल्ला गाठला. या कार्यक्रमात ते बोलत होते.

भारत फायद्यात

यावेळी आनंद महिंद्रा यांनी भारत कसा फायद्यात आहे, याचे गणित मांडले. सध्याच्या भू-राजकीय घडामोडींचा मोठा फायदा भारताला होत आहे. चीनला सोडून अनेक जागतिक कंपन्यांनी भारतात नांगर टाकल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय उत्पादन कंपन्या चीनी कंपन्यांच्या तुलनेत जास्त पिछाडीवर नाहीत. जग लवकरच चीनला बेदखल करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कारणामुळे कंपन्या भारतात

केवळ भू-राजकीय तणाव व चीनच्या महत्वकांक्षेचाच फटका या देशाला बसला नाही. भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या जोमाने आणि नेटाने आगेकूच करत आहेत. जागतिक कंपन्या त्यामुळे भारताकडे आशेने पाहत आहेत. भारतात निर्मिती, उत्पादन खर्च कमी असल्याने जागतिक कंपन्यांना फायदा होत आहे. त्यामुळेच Apple, Samsung, Boeing आणि Toshiba सारख्या कंपन्या भारतात कारखाने उभारत असल्याचा दावा त्यांनी केला.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.