Gold Mines : KGF जा विसरुन! देशाचा सोनेरी इतिहास उलगडणार, या खाणीतून सोने येणार!
Gold Mines : KGF कधी काळी देशाच्या राजकारणाचा केंद्र बिंदू होता. सोने आता या खाणीतून येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने खास योजना आखली आहे. या योजनेला यश मिळाल्यास देशात सोने स्वस्त होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : केजीएफ म्हणजे कोलार गोल्ड फील्ड (KGF) बंद झाल्यानंतर देशातील सोन्याचे उत्पादन जवळपास बंदच झाले होते. त्यानंतर भारतात सोने शोधण्याचे प्रयत्न झाले. पण त्याला पाठबळ मिळाले नाही. व्यापक प्रमाणात सोन्याची (Gold Mine) शोध मोहिम राबविण्यात आली नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा फारसा वापर झाला नाही. केंद्र सरकारने आता हे मारक धोरण बदलले. केंद्राने देशातच सोन्याचे उत्पादन वाढविण्यावर भर दिला. त्यासाठी व्यापक शोध मोहिमा आखण्यात आला. त्याला मोठा निधी आणि आधुनिक तंत्रज्ञानाची, सॅटेलाईट मॅपिंगसह इतर पाठबळ देण्यात आले. त्याचे परिणाम आश्चर्यकारक आहे.
दक्षिणेत सोन्याचा साठा त्यासाठी देशात अनेक ठिकाणी सर्व्हेक्षण करण्यात आले. खनिज मंत्रालयाने याविषयीचे आकडे जाहीर केले आहेत. त्यानुसार, भारताचे एकूण सोने भांडार 70.1 टन (4.1 जी/टन वर 17.2 एमटी) आहे. देशात सर्वाधिक सोने दक्षिण भारतात आहे. कर्नाटक राज्यातच 88 टक्के सोने साठा आहे. हे सोने बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने जवळपास 500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
याठिकाणी शोध मोहिम आंध्र प्रदेशातील चिगारगुंटा-बिसनाथम गोल्ड ब्लॉक भाडेपट्यावर देण्यासाठी NMDC आता पूर्णपणे तयार आहे. खाणीत काम करण्याची योजनेसाठी गेल्या वर्षीच राज्य सरकारने या कंपनीला लेटर ऑफ इंटेंट दिले आहे.
सोनेच सोने मीडिया रिपोर्टसनुसार, खाणीत काम सुरु करण्यासाठी कंपनीला लेटर ऑफ इंटेट देण्यात आले आहे. स्वाक्षरी होताच तीन वर्षात गोल्ड ब्लॉक भाडेपट्यावर करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. एनएमडीसीला आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात ही खाण मिळाली आहे. या खाणीतून 18.3 लाख टन सोने बाहेर येण्याची शक्यता आहे. प्रत्येक एक लाख टनातून 5.15 ग्रॅम सोने निघण्याची शक्यता आहे.
500 कोटींची गुंतवणूक एनएमडीसीने सोन्याची खाण लिजवर देण्यासंबंधी एक कंसल्टेंटची नियुक्ती केली आहे. ही संस्था या खाणी संबंधीच्या सर्व परवानग्या मिळवेल, ज्यामध्ये पर्यावरणासंबंधीच्या मंजुरीचा पण समावेश आहे. अर्थात केंद्र सरकारने याविषयीचा तपशील अद्याप जाहीर केलेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, सोने शोधण्याच्या मोहिमेसाठी केंद्र सरकारने 500 कोटींची गुंतवणूक केली आहे.
भारताचे जगावेगळे सुवर्णप्रेम चीननंतर जगात भारतात सर्वाधिक सोन्याची आयात करण्यात येते. लग्न, समारंभ, विविध सण, उत्सवात भारतीय संस्कृतीत सोन्याला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे देशात सोन्याची मागणी जास्त आहे. भारत त्याच्या गरजेच्या 90 टक्के सोन्याची आयात करतो. त्यासाठी देशातून दरवर्षी अब्ज डॉलर खर्च होतो.