Indian Billionaires : संपत्तीचे पायीशी लोळण, ललनांचा आजूबाजूला गराडा, कधी होते हे 5 जण अब्जाधीश, आता आली कडकी, कर्माने नशिबी आणली बदनामी

Indian Businessmen : दौलत, प्रसिद्धी आणि ललनांचा गराडा असे आलिशान जीवन जगणाऱ्या या भारतीय अब्जाधीशांची अवस्था आता ना घर का ना घाट का अशी झाली आहे. बँकांची फसवणूक, लोकांची लुबाडणूक अशा अनेक प्रकारामुळे त्यांच्यावर लक्ष्मी रुसली. त्यातील अनेकांची अवस्था वाईट आहे.

Indian Billionaires : संपत्तीचे पायीशी लोळण, ललनांचा आजूबाजूला गराडा, कधी होते हे 5 जण अब्जाधीश, आता आली कडकी, कर्माने नशिबी आणली बदनामी
अब्जाधीश असे झाले कंगाल
Follow us
| Updated on: Aug 24, 2024 | 9:51 AM

कधीकाळी संपत्ती, प्रसिद्धीच्या शिखरावर असणारी दिग्गज भारतीय उद्योगपती आता भि‍केला लागल्याचे चित्र आहे. ललनांच्या गराड्यात राहणाऱ्या यातील काही उद्योजकांना आता तुरुंगाची हवा खावी लागली आहे. तर काही जण कारागृहात जाण्यापासून वाचण्यासाठी आटापिटा करत आहेत. बँका, सरकार, प्रशासन आणि लोकांना गंडा घालून आलिशान जीवन जगण्याचे त्यांचे स्वप्न फार काळ टिकले नाही. त्यांच्यावर लक्ष्मी रुसली. त्यातील काहींची अवस्था दयनीय झाली आहे.

विजय माल्या – या अब्जाधीशाला कोण ओळखत नाही? Kingfisher हा एकेकाळी प्रत्येकाच्या तोंडावरील परवलीचा शब्द होता. किंगफिशर बिअर, एअरलाईन्स, मॅगिझिन्स, सुंदर मॉडेल्स आणि बरंच काही. विजय माल्या पैशात लोळत होता, म्हटले तरं वावगं ठरणार नाही. पण त्याला सध्या फरार घोषीत करण्यात आले आहे. त्याच्यावर 17 बँकांना 9 हजार कोटींचा चुना लावल्याचा आरोप आहे. माल्या मार्च 2016 पासून इंग्लंडमध्ये आहे.

मेहुल चोकसी – कोरोनाअगोदर 2018 पासून मेहुल चोकसीचे नाव चर्चेत आले. त्याने भारतीय बँकिंग सिस्टिमला मोठा हादरा दिला. तो पंजाब नॅशनल बँकेला 14,000 कोटींचा चुना लावून फरार झाला. सहा वर्षापूर्वी त्याची संपत्ती जवळपास 1150 कोटी रुपये होती. गीतांजली ग्रुपच्या माध्यमातून त्याने हा घोटाळा केला होता.

हे सुद्धा वाचा

नीरव मोदी – पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यातील सूत्रधार म्हणजे नीरव मोदी. त्याने एका झटक्यात या बँकेला दिवसा तारे दाखवले. नीरव मोदी हा गुजरातमधील हिरा व्यापारी होता. केवळ सहा वर्षांत त्याची संपत्ती 13 हजार कोटी रुपयांवर पोहचली. पण आता तो कंगाल झाला आहे. तो सध्या लंडन पोलिसांच्या ताब्यात आहे.

राणा कपूर – राणा कपूर हा यस बँकेचा संस्थापक आणि सीईओ होता. आता त्याचे दुसरे घर तुरुंग झाले आहे. पदाचा दुरुपयोग करुन कुटुंबातील सदस्यांना मोठा फायदा मिळवून देण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे बँकांना मोठा फटका बसला आहे. त्याच्या मागे ईडीचा ससेमीरा आहे.

वेणुगोपाल धूत – मराठवाड्यातीलच नाही तर देशातील हे बडे नाव. व्हिडिओकॉन समूहाचे प्रमुख असलेल्या वेणुगोपाल धूत यांना फसवणूक प्रकरणात तुरुंगाची हवा खावी लागली आहे. आयसीआयसीआय बँकेला चुना लावल्याप्रकरणात त्यांना अटक करण्यात आली. बँकेच्या चंदा कोचर यांच्यावर पण धूत यांना बेकायदेशीर कर्ज मिळवून दिल्याचा आरोप आहे. कधी काळी संपत्ती पायळी लोळण घेत असताना आज कंपनीने दिवाळखोरी घोषीत करण्यासाठी अर्ज केला आहे.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.