Indian Economy | जगातील 5 वी दमदार अर्थव्यवस्था; पण 100 श्रीमंत देशांच्या यादीत भारताला स्थान नाही
Indian Economy | जगातील अनेक सर्वात श्रीमंत देश, जगातील सर्वात छोटी राष्ट्रे आहेत. कोरोना सारखी महामारी आणि आर्थिक मंदीने त्यांच्या अर्थव्यवस्थेवर कुठलाच परिणाम केला नाही. उलट त्यांची वार्षिक उलाढाल वाढत आहे. जगातील पाचवी अर्थव्यवस्था असलेल्या भारताला श्रीमंत देशांच्या पंक्तीत स्थान का बरं मिळालं नाही?
नवी दिल्ली | 26 January 2024 : भारतीय अर्थव्यवस्थेने कोरोना संकटानंतर चमकदार कामगिरी दाखवली आहे. मोठं-मोठ्या अर्थव्यवस्थांना भारत आता आव्हान देत आहे. दहाव्या स्थानावरुन भारताने सूसाट पाचवे स्थान गाठले आहे. तर एका अंदाजानुसार 2027 पर्यंत भारत हा जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल. पण इतके मोठे स्थान पटकावल्यानंतरही भारत, 100 श्रीमंत देशांच्या यादीत नाही, हे वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. भारताच्या छोट्या राज्याऐवढे देश श्रीमंत देशांच्या यादीत अग्रेसर आहेत. पण भारत श्रीमंत देशांच्या पंक्तीत नाही. त्यामागे काय कारण?
जगातील सर्वात श्रीमंत देशाची गोष्ट
- जगातील 10 सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत आशियातील 4 आणि युरोपातील 5 देशांचा समावेश आहे. पश्चिम युरोपमधील सर्वात श्रीमंत देश लक्झमबर्ग हा जगातील सर्वात श्रीमंत देश आहे. हा देश बेल्जियम, फ्रान्स आणि जर्मनीदरम्यान आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा देश युरोपातील 7 वा सर्वात छोटा देश आहे. या देशातील लोकसंख्या केवळ 6.50 लाख इतकी आहे.
- लक्झेमबर्ग सरकार देशातील संपत्तीचा मोठा वाटा हा नागरिकांना चांगल्या दर्जाच्या आवास सुविधा देण्यासाठी, आरोग्य सुविधा आणि शिक्षणावर खर्च करते. लक्झेमबर्ग हे एक विकसीत राष्ट्र आहे. या देशातील प्रति व्यक्ती उत्पन्न सर्वाधिक 143,320 डॉलर इतकी आहे. हा देश युरोपीय संघ, संयुक्त राष्ट्र संघ, नाटो आणि ओईसीडीचा संस्थापक सदस्य आहे.
सर्वात श्रीमंत देशात भारत कुठे?
हे सुद्धा वाचा
- GDPवरील कॅपिटा रॅकिंग 2023 नुसार, भारत 129 व्या स्थानवर आहेत. सर्व श्रीमंत देशांच्या यादीत भारताला 129 वे स्थान आहे. भारताचा जीडीपी प्रति व्यक्ती उत्पन्न 2673 डॉलर (2.21 लाख रुपये) इतके आहे. पण जागतिक जीडीपी रँकिंगचा विचार करता भारत 5 व्या क्रमांकावर आहे.
- IMF नुसार, 2027 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल. 2014 मध्ये भारत या यादीत 10 व्या स्थानावर होता. प्रति व्यक्ती जीडीपी उत्पन्नाबाबत भारताची स्थिती शेजारील बांगलादेश, श्रीलंकेपेक्षा पण वाईट असल्याचे म्हटले जाते.
- 2027 पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था तयार करण्यासाठी भारताला वार्षिक 8 टक्के वेगाने वाढ करावी लागेल. आयएमएफच्या अंदाजानुसार, 2027 मध्ये भारतीय सरासरी वार्षिक कॅपिटा जीडीपी 3466 डॉलर होईल. पण त्यामुळे कॅपिटा रँकिंगमध्ये कुठलीही सुधारणा होणार नाही.
भारत श्रीमंतांच्या यादीत का नाही ?
- भारताची अर्थव्यवस्था मोठ्या गतीने वाढत आहे. पण या वृद्धीचा फायदा भारतातील सर्वसामान्य नागरिकांना मिळत नसल्याने भारत श्रीमंतांच्या यादीत पोहचलेला नाही. देशातील आर्थिक असमानता ही मोठी समस्या आहे. देशातील काही थोड्या लोकांच्या हातात मोठा पैसा आहे तर एक मोठा वर्ग गरीब आहे. ही विषमता पण मारक ठरली आहे.
- ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या रिपोर्टनुसार भारतातील केवळ 1 टक्के लोकसंख्येकडे देशातील जवळपास 40 टक्के संपत्ती आहे. याचा अर्थ एका छोटा वर्ग अत्यंत श्रीमंत आहे. तर मोठी लोकसंख्या आर्थिक रुपाने कमकूवत आहे.
- भारतातील पायाभूत सुविधांचा अभाव ही पण मोठी अडचण आहे. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, राहणीमान या मानकांवर देशातील मोठी जनता अडचणींचा समाना करत आहे. मोठी लोकसंख्या आजही गरीबी रेषेच्या खाली आहे.